Skip to content

वासरू स्वाध्याय | Vasaru swadhay iyatta pachavi

  • by
वासरू

इयत्ता पाचवीच्या पुस्तकातील वासरू या कवितेचे कवी आहेत अनिल. अनिल या कवींचे पूर्ण नाव आत्माराम रावजी देशपांडे आहे. आत्माराम रावजी देशपांडे हे आपल्या अनिल या टोपण नावाने कविता लेखन करतात.

एक स्वच्छंदी वासरू मनात येईल तिकडे रानात फिरत असते. जिकडे मन होईल तिकडे आपला कळप सोडून ते फिरते. रानात चरायला सोडल्यानंतर इतर गुरं ही आपल्या कळपामध्ये चरत असतात, मात्र हे वासरू मन मानेल तिकडे उड्या मारत फिरते.

कानात वारे भरल्याप्रमाणे वासरू सगळ्या रानात गोल गोल फिरत असते. कोणतेही बंधन न पाळता स्वच्छंदी कशाचीही जाणीव न ठेवता ते जी वाट दिसेल त्या वाटेने संपूर्ण रान भर भटकत असते.

भटकत असताना त्याला स्वतःची जाणीव ही राहत नाही, तहान भूक विसरून दिसेल ते रान पायाखाली घालण्यात साठी ते फिरत राहते. दिवसभर उड्या मारल्यानंतर ते खूप थकून जाते आणि शेवटी त्याला आपल्या कळपाची, आईचे आठवण त्याला येते.

आठवण आल्यानंतर ते लगेच मागे जा जाण्याचा प्रयत्न करते. मात्र त्याला मागे जाण्यासाठी वाट सापडत नाही. ते जास्तच दूरवर भटकत जाते.

त्याला कळपाची आठवण येईपर्यंत संध्याकाळ व्हायला येते. अंधार पडू लागल्यावर ते घाबरून जाते. आईला शोधण्यासाठी ते हंबरू लागते. अशाप्रकारे संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आईची आठवण येऊन ते हंबरू लागते तेव्हा त्याची आई सुद्धा त्याला शोधत त्याच्याजवळ येते.

दिवसभर उंडरणारे वासरू संध्याकाळी आईला भेटण्यासाठी व्याकुळ होते. तिच्या ओढीने तिला शोधू लागते. अशाप्रकारे स्वच्छंदी अशा वासराचे वर्णन कवींनी या कवितेमध्ये केलेले आहे. स्वच्छंदीपणे फिरताना त्याला कशाचीही जाणीव नसते. मात्र अंधार पडू लागतात ते आपल्या कळपाच्या दिशेने जाऊ लागते.

या कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहूयात.

 वासरू

इयत्ता – पाचवी.

विषय – मराठी.

वासरू

प्र १) खालील प्रश्नांची दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा.

१) रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते ?

वासरू ओढाळ होते. त्याला रानात एकटेच खूप फिरायचे होते. रानात फिरायला मिळावे म्हणून ते आपला कळप सोडून जाते.

२) तहानभूक विसरून वासरू काय करते ?

तहानभूक विसरून वासरू साऱ्या रानभर हुंदडते. सगळे रान पायाखाली घालते. वाटेल तिथे धावते.

३) वासराला कळपाची आठवण केव्हा होते ?

वासरू एकटेच भान विसरून, तहानभूक विसरून रानोमाळ हिंडत होते. सारे रान पायाखाली घालते. जेव्हा पळण्याचा, उड्या मारण्याचा उत्साह संपून गेला, अंधार पडू लागल्यावर ते थकले तेव्हा त्याला कळपाची आठवण होते.

 प्र २) पुढील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा व लिहा. 

१) भूक, तहान विसरून वासरू रानात सगळीकडे फिरते.

विसरूनी भान, भूक नि तहान

पायांखाली रान, घाली सारे.

२) वासरू रानात फिरून फिरून थकले, की त्याचा उत्साह कमी होतो. मग त्याला आपला कळप आठवू लागतो.

थकुनिया खूप सरता हुरूप,

आठवे कळप तयालागी.

३) वासरू कळपाकडे परत यायला निघते, पण त्याला रस्ता सापडत नाही. ते दूर जाऊ लागते. असे भटकल्यामुळे ते आणखीनच थकून जाते.

फिरू जाता मागे दूर जाऊ लागे,

आणखीच भागे भटकत.

प्र ३)’ मोकाट – अफाट – वाट ‘ याप्रमाणे शेवटचे अक्षर समान असलेले शब्द शोधा.

१) वासरू – फिरू – घेरू     २) वारे – न्यारे – फिरे

३) भान – तहान – रान        ४) मागे – लागे – भागे

५) खूप – हुरूप – कळप    ६) अंधारू – हंबरू – लेकरू

प्र ४) ‘ सोडूनिया,थकूनिया ‘ यांसारखे शब्द कवितेत आले आहेत. ते नेहमी ‘ सोडूनिया, थकूनिया ‘ असे लिहितात. या शब्दाप्रमाणे पुढील शब्द लिहा.

१) जेवून – जेवुनिया        २) झोपून – झोपुनिया

३) खेळून – खेळुनिया      ४) येऊन – येउनिया

५) जाऊन – जाउनिया     ६) बोलून –  बोलुनिया

प्र ५)  ‘ रानमाळ ‘ सारखे पाच जोडशब्द लिहा.

१) रानेवने    २) झाडेझुडपे  ३) पानेफुले

४) पाऊसपाणी  ५) ओढेनाले

प्र ६) पुढील  वाक्प्रचाराचा अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा.

१) कानांमध्ये वारे भरणे – हुरळून जाणे. 

एक रेडकू रानामध्ये दिवसभर कानामध्ये वारे भरल्यासारखे हुंदडते.

खूप दिवसानंतर मैदानावर खेळायला गेलेला विजय कानात वारे भरल्यासारखा पळू लागला.

२) हुरळून जाणे – मनातून आनंदी होणे.

आई-बाबांनी नेहाच्या निबंधाची स्तुती करताच ती हुरळून गेली.

धावण्याच्या शर्यतीत सोहमचा पहिला क्रमांक आला तेव्हा सर्वजण त्याच्या भोवती गोळा झाल्यावर तो हरवून गेला.

३) रान पायाखाली घालणे – सगळीकडे फिरणे.

आपली हरवलेली गाय शोधण्यासाठी माधवने सारे रान पायाखाली घातले.

हैबतीची गाय सापडत नव्हती तेव्हा त्याने तिला शोधण्यासाठी सर्व रान पायाखाली घातले.

४) सगळीकडे फिरणे – इकडेतिकडे फिरणे.

 उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुमित कोकणात गेला की गावभर सगळीकडे फिरतो.

पहिल्यांदाच मॉल मध्ये गेलेला राजू सगळीकडे फिरू लागला.

५) तहानभूक विसरणे – मग्न होणे.

 दिवसभर खेळताना मयुरी तहानभूक विसरली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकांचे वाचन करताना तहानभूक विसरून जायचे.

६) मग्न होणे – गुंग होणे.

समिर कविता वाचण्यात मग्न होतो.

निसर्ग चित्र काढताना कविता मग्न होऊन गेली.

७) हुरूप येणे – उत्साह येणे.

दिवसभर शेतात काम करायला बाबांना हूरूप येतो.

शिक्षकांची पाठीवर शाब्बासकीची थाप मिळतात दिव्याला अभ्यासासाठी आणखी हुरूप आला.

८) मोकाट सुटणे – स्वैर फिरणे.

कळपापासून दूर झालेले कोकरू रानात मोकाट सुटले.

शाळेला सुट्ट्या पडतात मुले मोकाट सुटली.

अति तिथे माती स्वाध्याय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *