छत्रपती राजश्री शाहू महाराज स्वाध्याय 5 वी

छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 मध्ये कागल येथील घाटगे घराण्यात झाला. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंत असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते.

17 मार्च 1884 मध्ये आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले व त्यांचे शाहू असे ठेवण्यात आले. 1894 मध्ये त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला आणि ते कोल्हापूर संस्थानचे राजे झाले.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज भाषण / निबंध

शाहू महाराजांनी तळागाळापर्यंत शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. सर्वात प्रथम त्यांनी आपल्या संस्थानात मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केले. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रति महिना एक रुपये दंड आकारण्याची कायदेशीर तरतूद त्यांनी केली. यावरून त्यांची तळागाळात शिक्षण पोहचवण्याची जी तळमळ आहे ते दिसून येते. त्याचबरोबर पुढील शिक्षणासाठी मुलांना शहरात यावे लागत होते म्हणून त्यांनी सर्व धर्मीयांसाठी स्वतंत्र अशी वसतीगृहे कोल्हापूर शहरांमध्ये स्थापन केली.

समाजातील जातीभेद नष्ट व्हावेत यासाठी प्रयत्न केले. मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आरक्षणाची सुरुवात केली. देशात सर्वात प्रथम त्यांनी मागासवर्गीयांसाठी 50 टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली.

शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांचा वृत्तपत्रासाठी खूप सहकार्य केले. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, लोककला व कुस्ती या क्षेत्रातील कलावंतांना प्रोत्साहन व राजाश्रय देऊन त्यांना सहकार्य केले. अशा या महान राजाचा मृत्यू 6 मे 1922 रोजी झाला.

अशा या महान राजा विषयी माहिती देणारा छत्रपती राजश्री शाहू महाराज हा पाठ आहे. या पाठातून शाहू महाराजांची सर्वसामान्य जनते विषयी असणारी तळमळ, शेतकऱ्या विषयी असणारी सामाजिक भूमिका, त्यांच्यावरील प्रेम याची जाणीव आपल्याला होते. या पाठावर आधारित प्रश्न उत्तरे आपण पाहणार आहोत.

छत्रपती राजश्री शाहू महाराज स्वाध्याय

प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या ?

पावसाळा कोरडा गेल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या.

२) लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले ?

‘ इतका चांगला राजा मिळाला नि आता अस्मानी संकट आलं,’ असे लोक शाहू महाराजांविषयी बोलू लागले.

३) पाण्याच्या प्रश्ना संबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला ?

पाण्याच्या प्रश्ना संबंधी उपाय म्हणून महाराजांनी  विहिरीतील गाळ काढा. विहिरी खोदा. दरबारातून लागेल तेवढा खर्च करा ‘ असा आदेश दिला.

४) रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली ?

रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी ‘ शिशु संगोपन गृह ‘ ही योजना सुरू केली.

प्र २)  दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

१) शाहू महाराजांचा जीव वर खाली का होऊ लागला ?

दुष्काळाने थैमान घातल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची स्थिती हालाखीची झाली जनावरे उपाशी राहिली. शेतकरी गाव सोडून जाऊ लागले. राने – वने करपून गेली. गोरगरिबांचे असे हाल पाहून शाहू महाराजांचा जीव वर खाली होऊ लागला.

२) नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोणकोणत्या तालुक्यांचा दौरा केला ? त्या ठिकाणची परिस्थिती कशी होती ?

नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी भुदरगड, पन्हाळा, व शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा केला. तेथील हिरवीगार राने उन्हाने करपून गेली होती.

३) महाराजांनी व्यापाऱ्यांना कोणती विनंती केली ?

महाराजांनी व्यापाऱ्यांना अशी विनंती केली की, तुम्ही धान्याच्या किमती कमी करा. तुम्ही धान्याची विक्री खरेदीच्या किमतीत केली, तर प्रजा तुम्हांला दुवा देईल. तुमचे नुकसान किंवा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ.

४) जित्राबांसाठी महाराजांनी कोणकोणत्या सोयी केल्या?

महाराजांनी जित्राबांसाठी छावण्या उभ्या केल्या. तिथपर्यंत जनावरे आणण्याची व्यवस्था केली. त्यांना वैरण व दाणागोटा पुरवला. संस्थानाच्या मालकीच्या जंगलात गुरे चरायला मोकळीक देण्यात आली.

५) महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे का ठरवले ?

दुष्काळात प्रजेला धान्य आणून दिले, जनावरांना पाणी पुरवले तरी तेवढ्यावर प्रजेचे भागत नाही. बाकीच्या वस्तू विकत घ्यायला लोकांकडे पैसा नव्हता. म्हणून लोकांना पैसा मिळवून देण्यासाठी महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे ठरवले.

६) महाराजांनी शिशु संगोपन गृह चालू करण्याचा हुकूम का दिला ?

रोजगार हमी योजनेच्या कामावर बायका येत होत्या. त्या काम करत असताना त्यांची पोरे-बाळे झाडाखाली, इकडे- तिकडे फिरत असतात, ते उपाशी राहतात, रडतात, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, हे महाराजांनी हेरले. म्हणून या चिल्ल्यापिल्ल्यांची कामाच्या ठिकाणी जवळच व्यवस्था करण्यासाठी महाराजांनी शिशु संगोपन गृह चालू करण्याचा हुकूम दिला.

प्र ३) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

१) दुष्काळ × सुकाळ

२) तोटा × नफा

३) सुपीक × नापीक

४) स्वस्त × महाग

५) लक्ष  × दुर्लक्ष

प्र ४) या पाठांमध्ये ‘ बिनव्याजी ‘ हा शब्द आला आहे. तुम्हांला माहीत असलेले असे उपसर्गयुक्त शब्द लिहा.

१) बिनधास्त

२) बिनदिक्कत

३) गैरहजर

४) बेपर्वा

५) नापसंत

प्र ५) पुढील वाक्यांतील क्रियापदे अधोरेखित करा.

१) समीरने पुरणपोळी खाल्ली.

२) शाळा सुरू झाली.

३) मुलींनी टाळ्या वाजवल्या.

४) शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले.

५) रमेशने अभ्यास केला.

६) वैष्णवी सुदंर गाते.

प्र ६) कंसातील क्रियापदे योजून पुढील वाक्ये पूर्ण करा.

( लागला, गेले, सोडले, करतात ) 

१) तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले.

२) एखादे संकट आल्यावर मुलगा एकमेकींना सावध करतात.

३) त्याने घर सोडले व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला.

Best Mutual Funds for SIP.

Leave a Comment