Skip to content

YCMOU Result 2024 मोबाईलमध्ये पहा फक्त 2 मिनिटात.

YCMOU Result 2024

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत मे जून 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल YCMOU Result 2024 विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. काही अभ्यासक्रमांचा निकाल सध्या प्रसिद्ध झाला असून काही अभ्यासक्रमांचा निकाल अजून प्रसिद्ध व्हावयाचा आहे. सदर निकाल आपण आपल्या फोनमध्ये पाहून डाऊनलोड करून घेऊ शकतो हा निकाल कसा पाहायचा याविषयीची माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

How to check YCMOU Result 2024?

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या YCMOU Result 2024 पाहण्यासाठी खालील टप्प्याप्रमाणे कृती करा.

 • सर्वात प्रथम आपल्या फोन मधील ब्राउझर ओपन करा.
 • ब्राउझर ओपन केल्यानातर सर्च बॉक्स मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) नाशिकचे अधिकृत संकेतस्थळ टाईप करा. https://ycmou.digitaluniversity.ac/
 • त्यानंतर आपल्यासमोर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मुख्य पान खालीलप्रमाणे ओपन होईल
YCMOU Result 2024
YCMOU Home Page
 • या पेजवर आपल्याला आडव्या बारमध्ये रिझल्ट नावाची टॅब दिसेल, त्या तवर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्या टॅब वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
Ycmou Result 2024
 • या नवीन पेजवर आपल्याला डाव्या बाजूच्या बारमध्ये मे – जून 2024 रिझल्ट ( May- June 2024 Result new) नावाची टॅब दिसेल. त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे.
 • त्यानंतर आपल्यासमोर एक पुढील पेज ओपन होईल.
 • या पेजवर आपल्याला ज्या ज्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले आहेत; त्या अभ्यासक्रमाची यादी डाव्या बाजूला दिसेल. त्यानंतरच्या कॉलम मध्ये आपल्याला सदर अभ्यासक्रमाचे निकाल कधी जाहीर झाले त्याची तारीख दिसेल. आणि सर्वात शेवटच्या कॉल मध्ये आपल्याला त्या अभ्यासक्रमाचा रिझल्ट पाहण्यासाठी क्लिक करण्यासाठी Click Here नावाची टॅब दिसेल.
 • ज्या अभ्यासक्रमाचा निकाल आपल्याला पहावयाचा आहे ते अभ्यासक्रमासमोरील प्लीज यार या टॅब वर क्लिक करा त्यानंतर आपण रिझल्ट पाहण्याच्या पेजवर जाईल.
Ycmou result 2024
Ycmou Result 2024
 • अशा प्रकारचे पेज ओपन झाल्यानंतर Exam Event दिसेल त्याच्या समोरील बॉक्स मध्ये छोट्या बाणावर क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर निरनिराळे एक्झाम इव्हेंट दिसतील. आपल्याला मे जून 2024 मध्ये दिलेल्या परीक्षेचा निकाल पाहावयाचा असल्याने मे जून 2024 वर क्लिक करा.
 • जर आपल्याला मागील परीक्षेचा निकाल पाहायचा असेल तर त्या परीक्षेचा इव्हेंट सिलेक्ट करा.
 • त्यानंतर त्याच्या खालील बॉक्समध्ये PRN Number किंवा आपला परीक्षेचा बैठक क्रमांक टाकायचा आहे.
 • त्याच्या खाली कॅपच्या कोड साठी जो बॉक्स दिला आहे त्या बॉक्समध्ये त्याच्यावरील भागांमध्ये असलेला कोड टाका.
 • संपूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री केल्यानंतर शेवटी असणाऱ्या सर्च या टॅब वर क्लिक करा.
 • सर्च वरती क्लिक केलं तर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला आपले नाव, परीक्षा क्रमांक, अभ्यासक्रमाचे नाव इत्यादी माहिती दिसेल ते तपासून रिझल्ट पहा या टॅब वर क्लिक करा.
 • त्यानंतर आपल्यासमोर एका नवीन पेजवर रिझल्ट दिसेल. तरी जर पहा डाऊनलोड करून घ्या.

अशाप्रकारे आपण YCMOU Result 2024 पाहू शकतो. त्याचबरोबर यापूर्वीचा रिजल्ट सुद्धा याच पद्धतीने फक्त एक्झाम इव्हेंट बदलून पाहू शकता. म्हणजेच जर आपल्याला डिसेंबर २०२३ चा निकाल पाहायचा असेल तर exam event डिसेंबर २०२३ निवडा आणि आपला PRN नंबर टाकून सर्च करा. आपण जुना निकाल पाहू शकतो.

YCMOU Home Assignment 2024

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत घेतलेल्या परीक्षांचे निकाल YCMOU Result 2024 हे एकाच वेळी प्रसिद्ध होत नाही. निरनिराळ्या अभ्यासक्रमाचे निकाल निरनिराळ्या तारखेला जाहीर केले जातात. जसजसे निकाल जाहीर केले जातात तसतसे जाहीर झालेल्या निकालांच्या यादीमध्ये ते ऍड केले जातात. सध्या आपला निकाल जाहीर झाला नसल्यास आणखी काही दिवसानंतर निकाल तपासू शकता. सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर केले जातात.

वरील प्रक्रिये बरोबरच आपण शेवटच्या निकालाच्या पेजवर जावू इच्छित असाल तर पुढे दिलेल्या Click Here वर क्लिक करून आपण निकालाच्या पेजवर जाऊ शकता. निकालाच्या पेजवर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

1 thought on “YCMOU Result 2024 मोबाईलमध्ये पहा फक्त 2 मिनिटात.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *