एक होती समई या इयत्ता नववीच्या पाठाचे लेखक आहेत उत्तम कांबळे. एक होती समई या पाठामध्ये लेखकाने आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले अशा समाजसेविका व शिक्षणतज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय करून दिला आहे.
अनुताई वाघ यांनी रानावनात भटकणाऱ्या आदिवासी लोकांना जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयोगी ठरणारे औपचारिक शिक्षण देण्याचे खूप अवघड काम केले आहे. ज्यांच्यासाठी अनुताई वाघ हे कार्य करत होत्या सुरुवातीला त्यांचाच या कामाला विरोध होता. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्या विरोधामागील कारणे होती. या सर्व गोष्टीवर मात करून अनुताईंनी अनेकांच्या मनातील अंधार दूर करण्याचे काम निरपेक्ष वृत्तीने केले. एक होती समई पाठावर आधारित स्वाध्याय खालील प्रमाणे आहे.
एक होती समई स्वाध्याय
प्र. १. खालील चौकटी पूर्ण करा.
(अ) कोसबाडच्या टेकडीवरील समई म्हणून ओळख – समाजसेविका व शिक्षण तज्ञ अनुतई वाघ
(आ) रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था – ग्राम बाल शिक्षा केंद्र
(इ) आयुष्याचा पाया भक्कम करणारे- प्राथमिक शिक्षण
(ई) भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणार – आदिवासी बालक
प्र. २. एक होती समई पाठाच्या आधारे खालील घटनांचे परिणाम लिहा.
घटना | परिणाम |
(अ ) ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले | पतीच्या निधनाचा दुःखाचा डोंगर टाचे खाली चिडत अनुताई मोठ्या जिद्दीन उभे राहिल्या. |
(आ) ताराबाईंचे निधन. | ताराबाईंच्या निधनानंतर अनुताई वाघ बाल ग्राम शिक्षा केंद्र संस्थेच्या संचालक झाल्या. |
(इ) अनुताईंचे निधन. | कसबाडच्या परिसरातील आदिवासी दुःखी झाले, त्यांचे डोळे पाणावले. |
प्र. ३. कार्यक्षेत्र लिहा.
शिक्षणक्षेत्राव्यतिरिक्त असलेली अनुताईंची कार्यक्षेत्रे
१) महिला विकास २) आरोग्य
३) अंधश्रद्धा निर्मूलन ४) बालकल्याण
५) स्वच्छता ६) कुटुंब कल्याण
७)मूकबधिरासाठी शिक्षण
प्र. ४.एक होती समई पाठाच्या आधारे का ते लिहा.
(अ) शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं.
एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या सर्व गोष्टी अनुताई वाघ यांनी केल्या. एकाच वेळी अनेक प्रयोग, असेही त्यांच्या कामाचे स्वरूप होते. शिक्षणासाठी नवनवीन प्रयोग करण्याच्या पद्धती मुळे केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचे सातत्याने आकर्षण राहिले होते.
(आ) अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला.
अनुताई वाघ यांनी कोसबाडच्या टेकडीवरील आदिवासींना औपचारिक शिक्षण देण्याचे काम स्वीकारले होते. आदिवासी समाजामध्ये रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होत्या. त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले नव्हते. या कारणांमुळे अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला.
प्र. ५. खालील शब्दांमधील कल्पना स्पष्ट करा.
१) भातुकलीचा खेळ : भातुकलीचा खेळ हा लहान मुलांमध्ये विशेषता मुलींमध्ये लोकप्रिय असलेला एक खेळ आहे. या खेळांमध्ये एका कुटुंबाचा खोटा खोटा संसार उभारला जातो. दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेला स्वयंपाक त्यासाठी लागणारी भांडी अशाप्रकारेच्या साहित्याच्या सहाय्याने हा खेळ खेळाला जातो. यामध्ये बाहुला बाहुली चे अनन्य साधारण महत्व असते. त्यांचे लग्नही लावले जाते. थोडक्यात भातुकलीचा खेळ म्हणजे बाहुला बाहुलींचा प्रतीकात्मक संसार होय.
२) ज्ञानयज्ञ : यज्ञ म्हणजे विधीपूर्वक पेटवलेला अग्नी व त्यामध्ये अर्पण केले जाणाऱ्या निरनिराळ्या पदार्थांची आहुती होय. या आहुतीच्या माध्यमातून आपण दिलेले दान परमेश्वरापर्यंत पोहोचते अशी श्रद्धा आहे. अनुताईंनी शिक्षणाचा प्रसार करताना आपल्या संपूर्ण आयुष्याची आहुती त्यासाठी दिली म्हणून त्यांचे कार्य म्हणजे ज्ञानयज्ञ होय.
३) ज्ञानगंगा: गंगा नदी ही आपल्या देशातील पवित्र नदी मानली जाते. गंगेमध्ये स्नान करणे हे पुण्य मानले जाते. गंगेमध्ये न्हाऊन निघल्याने आपले सर्व पाप धुऊन जाते; इतके पावित्र्य तिच्यामध्ये मानले जाते. अनुताईंनी अशाच प्रकारे ज्ञानाची गंगा आदिवासींच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवली. त्यांचे जीवन पवित्र आणि समृद्ध बनवले. अशाप्रकारे ज्ञानाची गंगा समाजापर्यंत पोहोचवण्याच्या कार्याला ज्ञानगंगा म्हटले जाते.
४) पाऊलखुणा: कोणताही सजीव चालताना वाटेवर त्याच्या पायाचे ठसे उमटतात. त्या ठशावरून आपण त्या सजीवाचा अंदाज करत असतो. जसे जंगलामध्ये फिरताना प्राण्यांच्या ठशावरून त्या जंगलात आढळणारे प्राणी कोणते? ते कोणत्या दिशेला गेले? याचा अभ्यास करता येतो. त्याचप्रमाणे अनुताईंनी अवलंबलेला शिक्षण प्रसाराचा मार्ग आणि त्यांचे कार्य या त्यांनी मागे सोडलेल्या पाऊल खुणा आहेत. या पाऊल खुणा सदैव जपून ठेवणे आवश्यक आहे आणि हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.
६. खालील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा.
(अ) व्रताने स्वतःला बांधणाऱ्या- व्रथस्थ
(आ) नेमाने स्वतःला बांधणारा- नेमस्त
(इ) गावातील रहिवासी- ग्रामस्थ
( ई ) तिराईताच्या भूमिकेतून बघणारा- त्रयस्थ
इतिहासाची साधने स्वाध्याय इयत्ता 9 वी
प्र.७) खाली दिलेल्या शब्दांचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.
- अनाथ x सनाथ
- दुश्चीन्ह x सुश्चीन्ह
- सुपीक x नापिक
- पुरोगामी x प्रतिगामी
- स्वदेशी x परदेशी
- विजातीय x सजातीय
प्र. ८) स्वमत
१) अनुताई वाघ यांना दिलेल्या समईच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दात लिहा.
समई ही स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देते. तिचा मंद प्रकाश परिसर उजळून टाकतो. मनाला शांती मिळते. आपल्याला होणाऱ्या त्रासाचा विचार न करता सदैव तेवत राहत दुसऱ्यांना प्रकाश देते. त्याचप्रमाणे अनुताई वाघ यांनी आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता आदिवासी मुलांच्या घरोघरी जाऊन त्यांना शिक्षण देण्याचे, ज्ञानाचा प्रकाश त्यांच्या आयुष्यामध्ये पाडण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. हे कार्य करत असताना त्यांनी दिलेली मायेची उबही महत्वाची होती. समई प्रमाणे संयमी वृत्तीने व सातत्याने स्वतः जळत दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचे काम अनुताई यांनी केले म्हणून त्यांना दिलेली समईची उपमा सार्थ आहे.
२) ‘समय हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे’ या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दररोज संध्याकाळी देवाच्या समोर समई लावली जाते. देवासमोरची समई सातत्याने तेवत ठेवली जाते. या कामामध्ये नियमितपणे सातत्य ठेवले जाते. या कार्यामध्ये खंड पडू दिला जात नाही. त्याचप्रमाणे ही समई मंद प्रकाश सदैव देत राहतो. त्यामध्ये तीव्रता नसते. तिच्या प्रकाशाचा ना डोळ्यांना त्रास होतो, ना त्वचेला दाहक उष्णता जाणवते. अशाप्रकारे समई मंद प्रकाश डोळ्यांना, मनाला शांत करणारा असतो. म्हणूनच समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे असे मला वाटते.
एक होती समई या पाठावर आधारित काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता.