अति तिथं माती स्वाध्याय इयत्ता 5 वी

अति तिथं माती हा द. म. मिरासदार लिखित एक विनोदी नाटक आहे. नाटकाची सुरुवात विक्रमादित्य महाराजांच्या दरबारातील प्रसंगाने होते. महाराजांची आगमन दरबारात होते. ते सिंहासनावर विराजमान होतात. आपल्या प्रधानजी जवळ राज्याची एकूण हाल विचारतात त्यातही विनोदी पद्धतीने प्रधानजी कडून उत्तरे दिली जातात.

त्यानंतर दरबारात गवई आपले गाणे सादर करतात. गवई निघालेली गाणी महाराजांना खूप आवडते. संगीत कलेसाठी काहीतरी करण्यासाठी महाराजांना एक विनोदी युक्ती सुचते.

संगीताला उत्तेजन देण्यासाठी महाराजांनी आपल्या राज्यात दोन्ही दिली की कोणीही साधं बोलायचं नाही आज पासून सगळ्यांनी गाण्यातच बोलायचं. जो कोणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा दिली जाणार होती. शिक्षेमध्ये सुळावर चढवणे हत्तीच्या पायी देऊन कडेलोट करणे अशा शिक्षा होत्या.

या दवंडीमुळे संपूर्ण राज्यात एक विनोदी वातावरण निर्मिती होते. सर्व लोक गाण्यातच बोलू लागल्याने खूपच गोंधळ निर्माण होतो. इतकच काय तर नवरा बायको भांडताना सुद्धा गाण्यातच भांडू लागतात. हे सगळे वाचताना एक आनंदी वातावरण निर्माण होते.

स्वतः राजा सुद्धा आपल्या बायकोसोबत बोलताना, दरबारात बोलताना गाण्यातच बोलायला लागतो. शेवटी या गाण्याच्या आदेशामुळे राजाचीच अडचण निर्माण होते. राजाच्या राजवाड्याला आग लागते आणि ही बातमी सुद्धा सेवक गाण्यातच देत असतो. त्यामुळे राजा खूप चिडतो आणि आपली आज्ञा मागे घेतो.

अशाप्रकारे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. या पाठात महाराजांनी गायक कलेला उत्तेजन देण्यासाठी दिलेली आज्ञा ही विनोदी आहे. सर्व राज्यांमध्ये ती बंधनकारक केल्याने राजाला आणि संपूर्ण राज्याला संकटात टाकणारी ठरते. म्हणून म्हटले जाते अति तिथं माती.

अति तिथं माती विषय – मराठी.

इयत्ता – पाचवी.

  प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली?

संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने ‘ राज्यात सगळ्यांनी गाण्यातच बोलायचे ‘ ही आज्ञा केली.

२) जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन का सांगू शकला नाही ?

जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सुद्धा गाऊनच सांगायची असल्यामुळे सेवक बातमी सांगताना ताना घेत राहिला; म्हणून ती बातमी सेवक राजाला पटकन सांगू शकला नाही.

३) ही नाटिका तुम्हांला वर्गात सादर करायची आहे. त्यासाठी किती मुले लागतील ?

ही नाटिका आम्हांला वर्गात सादर करण्यासाठी मुख्य दहा पात्रे व इतर दरबारी, प्रजाजन मिळून वर्गातील सर्व मुले लागतील.

प्र २) दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा.

१) चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते, हे पाठातील कोणकोणत्या वाक्यांवरून कळते ?

चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते, हे प्रधानजींच्या पुढील वाक्यांवरून कळते – प्रधानजी : गोरगरीब भरपूर कष्ट करीत आहेत. फक्त चोर तेवढे चोऱ्या करीत आहेत. चार-दोन साथीचे रोग आले. त्यात शे-पाचशे माणसे गेली.

२) या पाठातील कोणती वाक्ये वाचून तुम्हांला हसू येते ?

अति तिथं माती या पाठातील पुढील वाक्ये वाचून आम्हांला हसू येते –

महाराज : गवईबुवा, तबल्यावर पेटी वाजवून दाखवता ? नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा.

नवरा : ए माझे आई, नकोस खिंकाळू ! हा चाललो बाजारला, आणून देतो माल तुला.

नवरा : आणितो मी आणितो तेल, तूप,मीठ,वांगी आणखी ती काय सांगी ?

महाराज : ( गात ) आज तुझे तोंड सुकले कशाने ?

राणी : ( गात ) या पडशाने मज गांजियले.

( सटासट शिंकते )

३) चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते, हे कोणत्या वाक्यांवरून कळते ?

चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते, हे पुढील वाक्यांवरून कळते –

महाराज : गवईबुवा तुम्हांला काय येतं ? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता ?  नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा. ( गवईबुवा गाणे बेसूर आवाजात म्हणतात.)

महाराज : वा ! गवईबुवा तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे.

प्र ४) महाराजांची कोणती आज्ञा अमलात आणणे शक्य नाही, असे तुम्हांला वाटते ? असे का वाटते ? 

‘ सगळ्या लोकांनी गाण्यातच बोलायचे ‘ ही महाराजांची अमलात आणणे शक्य नाही. कारण काही महत्त्वाच्या गोष्टी गाण्यात सांगितल्याने उशीर होतो. तसेच व्यवहारिक गोष्टी गाण्यात सांगितल्याने घोटाळा होतो. शिवाय प्रत्येकाला गाणे येतेच असे नाही. आणि दुःखद घटना गात गात सांगणेही चुकीचे वाटते.

प्र ५) या पाठाला ‘ अति तिथं माती  ‘ हे नाव का दिले असावे?

या नाट्यप्रवेशातील चक्रमादित्य महाराजांनी कोणताही विवेक न करता राज्यातील लोकांना गाण्यातून बोलण्याची आज्ञा केली. त्यामुळे प्रत्येकाची बोलताना पंचाईत झाली. एवढेच नव्हे तर राजवाड्याला आग लागली ही बातमी सेवक गाण्यातून देताना जर उशीर झाला असता, तर राजवाडा जळून खाक झाला असता. अशा प्रकारे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट; म्हणून या पाठाला ‘ अति तिथं माती ‘ हे नाव दिले.

प्र ६) वांग्यांसाठी, कांद्यांसाठी कोणकोणती विशेषणे अति तिथं माती या पाठात आली आहेत? वांगी, कांदे यासाठी तुम्ही आणखी कोणती विशेषणे वापराल?

अति तिथं माती पाठातील विशेषणे :

१) वांगी – शेर दोन शेर, छान, सुरेख.

२) कांदे – पांढरा फेक, स्वच्छ, सुरेख.

आणखी विशेषणे :

१) वांगी – चवदार, सुंदर, जांभळी.

२) कांदे – गोल, रसदार, कडक.

प्र ७) चोरीमारी, गोरगरीब यांसारखे पाठातील इतर जोडशब्द शोधा व लिहा.

१) रोगराई

२) नवरा-बायको

३) केरकचरा

४) आरडाओरड

प्र ८) ‘ अ ‘आणि ‘ ब ‘ गटात परस्परांचे विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. त्यांच्या जोड्या जुळवून लिहा. प्रत्येक जोडीसाठी एक-एक वाक्य लिहा.

‘ अ ‘ गट.                   ‘  ब ‘ गट

१) रुंद                        अरुंद

२) गोरगरीब                  श्रीमंत

३) रोख                        उधार

४) सुंदर                       कुरूप

५) हजर                      गैरहजर

६) मान                      अपमान

७) भरभर                  सावकाश

८) उद्योगी                 आळशी

१) रुंद × अरुंद

वाक्य : माझ्या घरासमोरील रस्ता रुंद आहे. पण माझ्या शाळेसमोरील रस्ता अरुंद आहे.

२) गोरगरीब × श्रीमंत

वाक्य : गोरगरीब लोक झोपडीत राहतात आणि श्रीमंत लोक महालात राहतात.

३) रोख × उधार

वाक्य : किराणा मालाच्या दुकानावर पाटी होती – आज रोख उद्या उधार.

४) सुंदर × कुरूप

वाक्य : हे सुंदर चित्र आहे, त्यावर रेघोट्या मारून ते  कुरूप करू नको.

५) हजर × गैरहजर 

वाक्य : वर्गातील ७० मुलांपैकी ६८ मुले हजर होती, म्हणजेच २ मुले गैरहजर होती.

६) मान × अपमान 

वाक्य : वडीलधाऱ्या माणसांचा मान राखा, त्यांचा कधीही अपमान करू नका.

७) भरभर × सावकाश

वाक्य : पियुष सायकल भरभर चालवतो आणि सम्यक सायकल सावकाश चालवतो.

८) उद्योगी × आळशी

वाक्य : काही मुले उद्योगी असतात, तर काही मुले आळशी असतात.

प्र ९) वाक्यात उपयोग करा.

१) साखरेसारखा गोड.

वाक्य : सोनालीचा स्वभाव अगदी साखरेसारखा गोड आहे.

२) उत्तेजन देणे.

वाक्य : प्रत्येक स्पर्धेत मी भाग घ्यावा, म्हणून आई मला नेहमी उत्तेजन देत असते.

३) हसून हसून पोट दुखणे.

वाक्य : मयुरी इतक्या सुंदर नकला करते की, माझे हसून हसून पोट दुखते.

ढोल

इयत्ता – पाचवी.

विषय – मराठी.

प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) आदिवासींच्या होळीला किती वर्षाचा इतिहास आहे?  

आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षांचा इतिहास आहे.

२) अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात कोण प्रसिद्ध होता ?

अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात आमश्या डोहल्या प्रसिद्ध होता.

३) ‘ आमश्या डोहल्या ‘ने कोणती शपथ घेतली होती?

‘ यंदाच्या होळीत आपल्या ढोलाच्या आवाजाने अख्खा सातपुडा दणाणून सोडू ‘ अशी शपथ आमश्या डोहल्या ने घेतली होती.

प्र २) तीन-चार वाक्यात उत्तरे लिहा.

१) सातपुड्याच्या परिसरातील निसर्गाचे वर्णन करा.

सातपुड्याच्या परिसरात कंदमुळे, फळे व पानाफुलांनी बहरलेले घनदाट जंगल आहे. त्या जंगलात निसर्गाच्या सोबतीने आदिवासी लोक आपले जीवन जगत होते. या आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षाचा इतिहास आहे.

२) आमश्याच्या ढोल वाजवण्याचे वैशिष्ट्ये काय होते?

अख्ख्या सातपुड्यात आमश्या उत्कृष्ट ढोल वाजवण्यात पटाईत होता. ढोल वाजवू लागला की वाड्यापाड्यांवरची माणसे ढोलाच्या दिशेने नाचत येत असत. न थकता रात्रभर ढोल वाजवण्यात आमश्या तरबेज होता.

३) ढोल कसा तयार करतात ?

आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून ढोलाचा सांगाडा तयार करतात. त्यावर ताणून  कातडी चढवतात. कुणी ढोलाची पाने बसवतात, तर कुणी दोऱ्या आवळतात. अशा प्रकारे ढोल तयार करतात.

४) ‘ ढोलाच्या रूपाने आमश्या आपल्यातच राहील,’ हे पटवून देण्यासाठी भगताने काय सांगितले ?

भगत म्हणाले की, प्रत्येकाला मरण अटळ आहे. आमश्याला उद्या सागाच्या झाडाखाली गाडले जाईल. आमश्याचा देह मातीचा ; त्याची मातीच होईल. त्या मातीत सागाची बी रुजेल. त्यातून सागाचे मोठे झाड येईल. त्याचा कुणीतरी ढोल बनवेल. तो ढोल पुन्हा वाजू लागेल व अशाप्रकारे ढोलाच्या रूपाने आमश्या आपल्यातच राहील.

प्र ३) वाक्यात उपयोग करा.

१) आसमंतात घुमणे.

वाक्य – पंढरपुरमध्ये हरिनामाचा गजर आसमंतात घुमला.

२) पटाईत असणे.

वाक्य – गीता कुस्ती खेळण्यात पटाईत आहे.

३) दणाणून सोडणे.

वाक्य – विजयी संघाच्या जयघोषांनी  परिसर दणाणून सोडला.

४) शपथ घेणे.

वाक्य – वयाच्या सतराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली.

५) रिंगण धरणे.

वाक्य – गौरी-गणपती मध्ये मुलींनी नाचण्यासाठी रिंगण धरले.

Leave a Comment