भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर |Dr. babasaheb ambedkar bhashan

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर 

 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

             सुभेदार रामजी आंबेडकर आणि माता भीमाबाई यांचे १४ वे रत्न म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे नाव भिमराव असे ठेवण्यात आले.  त्यांचे पूर्ण नाव भिमराव रामजी आंबेडकर असे होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भिमाबाई होते. भीमराव जेव्हा शाळेत जाऊ लागले होते; तेव्हा त्या शाळेतील विद्यार्थी दूर दूर बसायचे, कारण अस्पृश्यांना शूद्र समजले जात होते. त्यांच्या अंगाला चुकून हात लागला तर ते अंघोळ करायचे. पण बाबासाहेबांनी ते निमुटपणे सहन केले. शिक्षक सुद्धा त्यांना शाळेत बसू देत नव्हते. त्यांनी शाळेच्या खिडकी जवळून, वर्गाच्या बाहेर बसून मास्तर काय शिकवित होते हे बघून अभ्यास केला. त्यांनी आपल्या वडिलांना विचारले, आमच्या घरी रामायण ग्रंथ आहे. महाभारत आहे तुम्ही ते वाचता मग हे लोक विटाळ  का मानतात ? रामजींना प्रश्न पडला की, पोराला कसं समजवावे ? भिमराव आता हुशार झाला होता. त्यांना समजत होते की लोक त्यांना शूद्र मानतात आणि त्यांचा अपमान करतात.
            डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाची खूप आवड होती. अनेक हाल अपेष्टा, आपमान सहन करत त्यांनी आपले शिक्षण सुरूच ठेवले. 

          डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी हे सैन्यामध्ये सुभेदार होते. त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले. महार समाजातील मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पहिले व्यक्ती होते. मॅट्रिक झाल्यानंतर त्यांच्या सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले केळुस्कर गुरुजी यांनी त्यांना गौतम बुद्धाचे चरित्र असलेले पुस्तक भेट दिले. मॅट्रिक नंतरही त्यांनी आपले पुढचे शिक्षण चालू ठेवले.

      परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी त्यांना कोल्हापूर संस्थानचे राजे छत्रपती शाहू महाराजांनी व बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी खूप सहकार्य केले.

         परदेशातून शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठरल्याप्रमाणे बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या राज्यांमध्ये नोकरी करण्याचे ठरवले. नोकरीसाठी जेव्हा ते बडोद्याला गेले तेव्हा त्यांना तेथे वेगळाच अनुभव आला. तेथे गेल्यानंतर प्रथम त्यांना राहण्यासाठी खोली उपलब्ध होत नव्हती, त्यानंतर बडोद्याच्या संस्थांनामध्ये एका मोठ्या पदावर असूनही तेथील कर्मचारी त्यांना हिनतेची वागणूक देत होते. त्यातच त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांचा मृत्यू झाला. आपण इतके शिक्षण घेऊन ही आपल्याला जर अशी वाईट वागणूक मिळत असेल तर समाजातील आपल्यासारख्या इतर लोकांची परिस्थिती कशी असेल याची कल्पना करणे अशक्य होते. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तेथून पुढे आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण या देशातील रंजले गांजलेल्यांसाठी, अस्पृश्यांसाठी करण्याचे ठरवले.
          डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचनाची खूप आवड होती. पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ.बाबासाहेब हे पहिले व्यक्ती होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर 18-18 तास अभ्यास करत होते.त्यांनी अनेक विषयावर संशोधनपर लेखन केले आहे. त्यांनी अनेक विषयावरील पुस्तकांचे लेखन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक वृत्तपत्र प्रसिद्ध करून त्यामध्ये लेखन केले आहे.
         डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला. रमाबाई ह्या गरीब घराण्यातील होत्या. त्यांनी बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांच्या शिक्षणात मदत केली. रमाबाईंनी सोन्या-चांदीची कधी आशा केली नाही. कपाळाचं कुंकू हेच त्या आपला दागिना समजत असतं.आपल्या भारत देशात सर्वात जास्त शिक्षणाच्या पदव्या बाबासाहेबांनी घेतल्या आहेत.   बॅरिस्टर बनून त्यांनी दलितांना हक्क मिळवून दिला. समाजाच्या कल्याणाकरिता त्यांनी स्वतंत्र चळवळीत भाग घेतला. शुद्रांना महाडच्या चवदार तळ्याचे पाणी पिण्याची मनाई होती. परंतु बाबासाहेबांनी आंदोलन करून सर्वांकरिता पाणी पिण्यासाठी खुले केले. ही घटना चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे.
      आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाची राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समिती नेमण्यात या घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते; तर घटना समितीमध्ये प्रत्यक्ष घटना लिहिण्याचे काम मसुदा समितीकडे होते आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉ.बाबासाहेब आंबेडकर .  बाबासाहेबांनी अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने घटनेचा मसुदा तयार केला. त्यांनी २ वर्षे ११ महिने १८ दिवस मेहनत घेवून राज्यघटना तयार केली.

संपूर्ण संविधान तयार झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने ही घटना स्वीकारली. व 26 जानेवारी 1950 पासून ही घटना आपल्या देशामध्ये लागू करण्यात आली. भारतीय संविधानाची निर्मिती मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता. म्हणूनच त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणतात. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मोलाचा महामंत्र त्यांनी दिला.
               बाबासाहेबांनी भारतातील जातीव्यवस्था, उच्च-नीचता कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक समाज सुधारकांनी भारतातील जातिव्यवस्था संपवण्याचा प्रयत्न केला. भारतात स्त्रिया व शूद्रांना दिली जाणारी हीन वागणूक त्यांनी लहानपणापासून अनुभवलेली होती.

संतांची कामगिरी

भारतातील ही परिस्थिती सुधारणे त्यांना अशक्य वाटले; तेव्हा त्यांनी अशी प्रतिज्ञा केली की, जरी मी हिंदू धर्मात जन्म घेतला, तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही. म्हणून त्यांनी १३ ऑक्टोबर १९३५ मध्ये येवले येथे धर्मांतराची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी भारतातील सर्व प्रमुख धर्मांचा अभ्यास केला. त्यातील चांगल्या वाईट गोष्टींचा यथासांग विचार करून, यामध्ये स्वातंत्र्य, समता व बंधुता, माणसाला माणूस म्हणून वागणूक देणारा समतावादी, विज्ञानवादी बौद्ध धर्म स्वीकारण्याची त्यांनी ठरवले.  १४ ऑक्टोंबर १९५६ ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो लोकांच्या उपस्थितीत बौद्ध धर्माची दीक्षा ग्रहण केली. तेव्हापासून त्या भूमीला ‘दीक्षाभूमी ‘ असे म्हटले जाते.
              या देशातील समता, स्वतंत्रता, एकता टिकून राहावी म्हणून त्यांनी आंतरजातीय विवाह १५ एप्रिल १९४८ रोजी डॉ. सविता कबीर या ब्राह्मण मुलीशी केला. 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना अमलात त्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीमध्ये डॉक्टर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते कायदामंत्री होते. कायदामंत्री असताना त्यांनी संसदेमध्ये हिंदू कोड बिल मांडले, यामध्ये त्यांनी स्त्रियांच्या हक्कांविषयीची समानतेविषयीची भूमिका मांडली मात्र तत्कालीन सर्व नेत्यांनी या बिलाचा कडाडून विरोध केला.

बिल संसदेत मंजूर न झाल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. काही दिवसात त्यांची प्रकृती बिघडली व दिल्लीमध्ये ६ डिसेंबर १९५६ साली बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या या बातमीमुळे सारे जग रडले. त्यांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबईच्या दादर चौपाटीवर आणण्यात आले. तेव्हापासून त्या भूमीला ‘ चैत्यभूमी ‘असे नाव देण्यात आले. या महामानवाच्या अंतयात्रेमध्ये १० ते १२ लाख नागरिक सामिल झाले होते व त्यांची रांग लांबच लांब म्हणजे तीन मैलाची होती असे इतिहासात नमूद आहे. 

          इ.स. 1991 मध्ये त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम !!!

Royal Enfield Shotgun 650 : की मार्च में होगी धमाकेदार एंट्री !

Leave a Comment