Chhatrapati Shivaji Maharaj भाषण
Chhatrapati Shivaji Maharaj भाषण
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवरायांच्या जन्मावेळीचे दिवस फार धावपळीचे होते. शहाजीराजे युद्धात गुंतले असताना त्यांच्या पत्नी जिजाबाई यांनी १९ फेब्रुवारी १६३० ला एका सुंदर बाळाला शिवनेरी किल्ल्यावर जन्म दिला. त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते. शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्याच्या जुन्नर या गावी आहे. शिवाजीच्या बालपणाची सहा वर्षे धावपळीतच गेली.
छत्रपती शिवारायांची आई जिजाबाई त्यांना शूरवीरांच्या, साधू संतांच्या गोष्टी सांगत असत. साधू- संतांच्या गोष्टी मधून त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. शिवाजी महाराज उत्तम प्रकारे शस्त्रविद्या ग्रहण करीत होते. वयाच्या बाराव्या वर्षी शिवाजींनी विविध विद्या व कला यांचे ज्ञान प्राप्त केले.
जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना उत्तम राज्य कारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे ? किल्ले कसे बांधावे ? घोडे हत्ती यांची परीक्षा कशी करावी ? शत्रूंच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे हे उत्तम प्रकारे शिकविले. शिवरायांचे लग्न वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांच्या आईने सईबाई नावाच्या मुलीबरोबर लावून दिले. पुण्याच्या लाल महालात लग्न सोहळा मोठ्या थाटामाटाने साजरा केला.
एकदा अफजलखानाने शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी बोलवले. अफजलखानाचा कपटी डाव शिवाजी महाराजांना माहीत होता. म्हणून त्यांनी अंगात चिलखत घातले होते. अफजलखान भेटत असताना त्याने शिवरायांना मारण्याचा प्रयत्न केला; पण आपल्या वाघनख्यांनी शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला.
अशाच एका दुसऱ्या प्रसंगाचा सामना करताना त्यांनी पुण्यातील लाल महालात रात्रीच्या वेळी घुसून चक्क शाहिस्तेखानाची बोटे तलवारीने कापली होती.
एकदा औरंगजेब बादशहाचा पन्नासावा वाढदिवस होता. त्याने शिवाजी महाराजांना बोलावून आपल्याकडे आग्र्यात कैद करून नजर कैदेत ठेवले होते. शिवाजी महाराज व संभाजी राजे मिठाईच्या रिकाम्या पेठाऱ्यात एक एक करत बसून बाहेर निघाले. त्त्यांयांच्चेया जागी झोपलेले सेवक हिराजी आणि मदारी औषधी आणायला जातो म्हणून गेले. या चपळ बुद्धीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका केली. ही घटना १६६६ मध्ये घडली.
त्या काळात शिवाजी महाराजांनी समुद्रात सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यासारखे भक्कम किल्ले जिंकले. आज ते किल्ले जर आपण बघितले तर आपले मन आनंददायी होते.
शिवाजी महाराजांना कोणत्याही परिस्थितीत कोंढाणा किल्ला पाहिजे होता. तानाजीच्या घरी मुलाच्या लग्नाला चार दिवस बाकी होते हे पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना लग्न उरकण्यास सांगितले व स्वत कोंढाण्याच्या स्वारीवर जाणार असल्याचे सांगितले. हे ऐकून तानाजीनी आपल्या मुलाचे लग्न पुढे ढकलले व तानाजी म्हणाले, ‘आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे. ‘
तानाजींनी कोंढाणा किल्ल्याकडे आगेकूच केली. त्यात तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. तेंव्हा सैन्य घाबरून इकडे तिकडे पळू लागले. तेंव्हा तानाजीचा भाऊ सूर्याजी सैन्याला उद्देशून म्हणाले, “अरे असे पळताय काय? कड्यावरचा दोर मी केंव्हाच कापून टाकला आहे, एक तर कड्यावरून उड्या मारून मरा नाहीतर शत्रू सोबत लढून मारा.” हे ऐकून सर्व सैन्य शत्रू सैन्यावर तुटून पडले. सुर्याजींनी सैन्याच्या मदतीने शत्रू सोबत घनघोर युद्ध सुरू ठेवून कोंढाणा किल्ला जिंकला. वीर पराक्रमी तानाजी मालुसरे शहीद झाले म्हणून त्यांच्याबद्दल ऐकताच शिवाजी महाराज व त्यांची आई जिजाबाईंना दुःख झाले. शेवटी शिवाजी महाराज एकच म्हणाले, ‘ गड आला पण सिंह गेला.‘
आशा या महान राजास माझा मानाचा मुजरा!
छत्रपती शिवाजी महाराज की जय! Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay!
Pingback: महात्मा ज्योतिबा फुले भाषण | म. जोतीराव फुले निबंध - अभ्यास माझा