Skip to content

YCMOU Home Assignment 2024 आता ऑनलाईन अपलोड करावे लागणार..

YCMOU Home Assignment 2024

YCMOU Home Assignment म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी असणारा गृहपाठ हा सर्व अभ्यासक्रमासाठी विद्यापीठा मर्फत दिला जातो. हे Home Assignment विद्यार्थ्यांनी स्व हस्ताक्षरात लिहून विद्यापीठाने सांगितलेल्या पद्धतीने अभ्यास केंद्रावर जमा करावयाचे होते. सध्या विद्यापीठा मार्फत काही अभ्यासक्रमाच्या बाबतीत हे स्वाध्याय विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रावर जमा न करता ते ऑनलाईन अपलोड करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. YCMOU Home Assignment ऑनलाइन कोण कोणत्या अभ्यासक्रमाचे अपलोड करावयाचे आहे याबाबतची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

YCMOU Home Assignment बाबत विद्यापीठाची काय सूचना आहे?

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या मार्फत नुकतीच एक सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सूचनेनुसार खाली दिलेल्या अभ्यासक्रमाचे होम असाइनमेंट हे अभ्यास केंद्रावर जमा न करता पीडीएफ स्वरूपामध्ये विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करावयाचे आहेत.

YCMOU Home Assignment

शैक्षणिक वर्ष 2023- 24 पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (National Education Policy) NEP 2020 नुसार नव्याने विकसित व सुरू झालेल्या शिक्षण क्रमासाठीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ YCMOU Home Assignment हे पूर्वीच्या पद्धतीने तयार करून अभ्यास केंद्रावर जमा न करता, ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाच्या पोर्टलवर पीडीएफ स्वरूपात अपलोड करण्यासाठी लॉगिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी अपलोड केलेले गृहपाठ हे ऑनलाईन पद्धतीने समंत्रकांच्या लॉगिन मधून तपासले जाणार आहेत.

कोण कोणत्या अभ्यासक्रमाचे गृहपाठ ऑनलाईन अपलोड करायचे आहेत?

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या खाली दिलेल्या अभ्यासक्रमांकरीता गृहपाठ ऑनलाइन अपलोड करावयाचे आहेत. इतर सर्व अभ्यासक्रमाचे गृहपाठ हे पूर्वीप्रमाणेच आपल्या अभ्यास केंद्रावर जमा करावे याचे आहेत.

(M 117 (M.Com).

M 83 (M.A.Edu),

M 48 (M.A. Urdu),

M 49 (M.A. Marathi),

M 50 (M.A. Economics).

M 58 (M.A. Public Administration),

M 59 (M.A. Hindi),

M 60 (M.A. History),

V 151 (M.Sc. Mathematics).

V 152 (M.Sc. in Environmental Science),

V 153 (M.Sc. in Physics),

V 154 (M.Sc. in Chemistry).

V 155 (M.Sc. in Zoology),

V 156 (M.Sc. in Botany)

ज्या विद्यार्थ्यांनी वरीलपैकी कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असेल तर त्यांना आपले स्वाध्याय विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिलेल्या लिंक मध्ये अपलोड करावयाचे आहे. स्वाध्याय अपलोड करण्याबाबतची लिंक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे त्यांनी आपले गृहपाठ YCMOU Home Assignment हे आपल्या अभ्यास केंद्रावरच जमा करावयाचे आहेत.त्यांना हे गृहपाठ ऑनलाईन अपलोड करण्याची गरज नाही.

How to download YCMOU Home Assignment?

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमाकरिता गृहपाठ दिले जातात. हे गृहपाठ आपण परीक्षा केंद्रावरून मिळवू शकतो अथवा विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ते डाऊनलोड करून घेऊ शकतो. डाऊनलोड केलेले प्रश्न सोडवून ते अभ्यास केंद्रावर जमा करावयाचे असतात. YCMOU Home Assignment कसे डाऊनलोड करायचे हे पाहूया.

  • सर्वप्रथम आपल्या फोन मधील ब्राउझर ओपन करा. आणि सर्च बॉक्स मध्ये विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ टाईप करा. www.yamou.digitaluniversity.ac
  • त्यानंतर आपल्या समोर विद्यापीठाचे होम पेज ओपन होईल.
  • होम पेजवर डाव्या बाजूला आपल्याला निरनिराळ्या लिंक दिसतील त्यातील Home Assignment नावाची जी टॅब दिसेल त्या टॅब वरती क्लिक करा.
  • त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन पेज दिसेल. त्यामध्ये आपल्याला निरनिराळे विभाग दिसतील. यामध्ये प्रमाणपत्र परीक्षा, डिप्लोमा प्रोग्रॅम्स, अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम्स, पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम्स असे निरनिराळे ऑप्शन दिसतील. त्यामध्ये आपला अभ्यासक्रम कोणत्या गटात येतो त्याप्रमाणे त्या लिंक वर क्लिक करा.
  • समजा आपण एम ए च्या अभ्यासक्रमासाठी गृहपाठ डाऊनलोड करत आहात तर PG Programs वर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला पदवीनंतरचे सर्व अभ्यासक्रम दिसतील. त्यातील आपल्या अभ्यासक्रमावर क्लिक करा आणि आपल्या अभ्यासक्रमाचा गृहपाठाचे प्रश्न डाऊनलोड करा.
  • प्रश्न डाऊनलोड केल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरे लिहून विद्यापीठांच्या सूचनेनुसार ऑनलाइन अथवा अभ्यास केंद्रावर जमा करा.

YCMOU Repeater Exam Form 2024 कसा भरावा?

YCMOU Home Assignment कसा लिहावा?

  • YCMOU Home Assignment लिहिण्यासाठी A4 साईज किंवा अखिव पेपर वापरावेत.
  • प्रत्येक प्रश्नासाठी स्वतंत्र पानाचा वापर करावा. म्हणजेच एक प्रश्न लिहिल्यानंतर त्याच्या खाली दुसरा प्रश्न न लिहिता नवीन पानावर नवीन प्रश्न लिहावा.
  • स्वाध्याय लिहिताना योग्य मार्जिन प्रत्येक पेपर वर सोडावे.
  • स्वाध्यायातील प्रत्येक प्रश्नाला पाच गुण आहेत त्याप्रमाणे 100 शब्दांच्या आसपास स्वाध्याय लिहावा.
  • स्वाध्याय स्व हस्ताक्षरात व सुंदर हस्ताक्षरात लिहावेत.
  • स्वाध्याय लिहिताना पुस्तकातील आहे तसा मजकूर न लिहिता पुस्तकातील मजकुराचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे आपल्या शब्दात लिहावेत.
  • स्वाध्याय लिहून झाल्यानंतर सर्व प्रश्न क्रमाने एकत्र करून त्याला योग्य कव्हर घालावे. कव्हर वर आपल्या अभ्यासक्रमाचे नाव, आपले नाव मार्गदर्शक शिक्षकांचे नाव, शैक्षणिक वर्ष इत्यादी माहिती लिहा.

आपल्या अभ्यासक्रमाप्रमाणे लिहिलेले स्वाध्याय हे अभ्यास केंद्रावर अथवा विद्यापीठाने दिलेल्या लिंक वर भरून घ्यावे. परीक्षाका मार्फत ते स्वाध्याय तपासून आपल्याला त्याचे गुण दिले जातात. स्वाध्याय बाबत आणखी काही शंका असल्यास पण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता.

Tags:

1 thought on “YCMOU Home Assignment 2024 आता ऑनलाईन अपलोड करावे लागणार..”

  1. Pingback: YCMOU Result 2024 मोबाईलमध्ये पहा फक्त 2 मिनिटात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *