Scholarship exam 2024 for class 5 and 8

                    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्रातील निरनिराळ्या परीक्षांचा आयोजन केले जाते. यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा ही एक महत्त्वाची परीक्षा आहे. यामध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा Scholarship exam 2024 इयत्ता पाचवी करिता व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी करिता घेतली जाते. या परीक्षेचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी केले जाते. यामधून प्रज्ञावंत विद्यार्थी शोधणे, स्पर्धा परीक्षेची ओळख करून देणे, विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवणे यांस मदत होते.

Scholarship Exam 2024
Scholarship Exam 2024 timetable

 

Scholarship Exam 2024 date

                            शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवी करिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेतली जाते. सन 2023-24 मध्ये होणारी शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भातील संपूर्ण वेळापत्रक परीक्षा परिषदेमार्फत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये ऑनलाईन फॉर्म सादर करण्याची मुदत, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आकारली जाणारी परीक्षा फी, परीक्षेला बसण्यासाठी आवश्यक पात्रता, परीक्षा फॉर्म सादर करण्याची पद्धती इत्यादी बाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. परीक्षा संबंधातील सूचना आपण परीक्षा परिषद पुणे यांच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेऊ शकतो.
      सन 2023-24 ची शिष्यवृत्ती परीक्षा Scholarship exam 2024 रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी करिता एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे.

Scholarship Exam 2024 परीक्षेचे स्वरूप

 • शिष्यवृत्ती परीक्षा Scholarship exam 2024 मध्ये पेपर एक यामध्ये प्रथम भाषा व गणित या विषयांचा समावेश असतो व पेपर दोन यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयांचा समावेश असतो.
 • पेपर एक मधील प्रथम भाषेकरिता 50 गुण व दुसरा विषय गणित या विषयाला 100 गुण मिळून पेपर 1 हा 150 गुणांचा असतो.
 • त्याचप्रमाणे पेपर दोन 150 गुणांचा असतो. त्यातील इंग्रजी करिता 50 गुण व बुद्धिमत्ता या विषयाकरिता शंभर गुण असतात.
 • पेपर एक पेपर दोन यामध्ये प्रत्येकी 75 प्रश्न असतात.
 • शिष्यवृत्तीतील प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांकरिता असतो.
 • या परीक्षेचे दोन्ही पेपर एकाच दिवशी होतात.
 • परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी प्रश्नपत्रिका A, B, C, D अशा संचामध्ये दिलेल्या असतात.

Scholarship Exam 2024 पात्रता 

 • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
 • विद्यार्थी शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित शाळेत इयत्ता पाचवी मध्ये शिकत असावा.

शिष्यवृत्ती परीक्षेच्या मागील वर्षांच्या जुन्या प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात कशा डाऊनलोड कराव्या?

 • सर्वात प्रथम आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा.
 • त्यानंतर सर्च बॉक्समध्ये www.mscepune.in टाईप करा. आणि सर्च करा.
 • त्यानंतर आपल्यासमोर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
 • संकेतस्थळावरील मुख्य पृष्ठाच्या डावीकडे आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षा Scholarship exam 2024 इयत्ता पाचवी आणि आठवी नावाची टॅब दिसेल त्या टॅब वरती क्लिक करा.
 • त्यानंतर आपण शिष्यवृत्तीच्या पेज वरती जाऊ.
 • या पेज वरती आपल्याला प्रश्नपत्रिका विभाग दिसून येईल. या विभागामध्ये आपल्याला वर्षनिहाय प्रश्नपत्रिकांची लिंक पाहायला मिळतील.
 • ज्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपल्याला डाऊनलोड करावयाचे आहे त्या वर्षाच्या लिंक वरती क्लिक करा.
 • त्यानंतर आपल्यासमोर एक पुढील पेज ओपन होईल या पेजवर आपल्याला इयत्ता निवडायची आहे. इयत्ता निवडल्यानंतर आपल्याला परीक्षेचे माध्यम निवडायचे आहे. त्यानंतर आपल्यासमोर पेपर एक व पेपर दोन असे ऑप्शन दिसून येतील.
 • पेपर एक डाउनलोड करण्यासाठी पेपर एक लिंक वरती क्लिक करा त्यानंतर तो पेपर आपल्या फोनमध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड होईल.
 • अशाप्रकारे आपण माध्यम निहाय व वर्षनिहाय आपल्याला आवश्यक ते सर्व जुन्या प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड करू शकता.

click here for download old papers

Scholarship Exam 2024 ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठीच्या सर्वसाधारण सूचना

१. पूर्व उच्च प्राथमिक / पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा Scholarship exam 2024, विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेस बसण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे शाळेने ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाची आहेत. ऑफलाईन पध्दतीने
आवेदनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.
२. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि शासकीय, आदिवासी, विजा भज विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेसाठी एकत्रित एकच आवेदनपत्र आहे. त्यात इच्छुक विद्यार्थ्यांना विद्यानिकेतन प्रवेशासाठी पात्रतेनुसार विकल्प उपलब्ध आहेत.
३. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रात भरलेल्या माहितीची पडताळणी मुख्याध्यापकांनी स्वतः करावी. याबाबत भविष्यात काही प्रश्न उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील.
४. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रांची प्रिंट परीक्षा परिषदेकडे पाठविण्याची आवश्यकता नाही. परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी, ऑनलाईन आवेदनपत्रांची प्रिंट, आवश्यक प्रमाणपत्रे व शुल्क भरलेल्या ऑनलाईन पेमेंटची रिसिट इत्यादी कागदपत्रे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या दप्तरी जतन करून ठेवावीत.ऑनलाईन आवेदनपत्रासाठी विद्यार्थ्याच्या फोटो व स्वाक्षरी एकत्रित स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य राहील.
६. विदर्भातील ११ जिल्ह्यातील पालकांचे वार्षिक उत्पन्न रू.२०,०००/- पेक्षा कमी असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. ७. विद्यार्थ्यांचे पालक रु.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे भूमिहीन शेतमजूर असल्यास
भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत व रू.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याबाबत सक्षम प्राधिकारी (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) यांनी दिलेली प्रमाणपत्रे असणे अनिवार्य आहे. ८. मुद्दा क्रमांक ६ व ७ मधील प्रमाणपत्रांची संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या स्तरावरुन तपासणी करणे बंधनकारक असून सदर प्रमाणपत्र आपल्या दप्तरी जतन करुन ठेवावे व परिषदेने मागणी केल्यास उपलब्ध करुन द्यावेत.
९.ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यापूर्वी आवेदनपत्र भरण्याबाबतच्या मुद्देनिहाय सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे. त्यानंतरच ऑनलाईन आवेदनपत्रे भरावीत.
१०. संगणकाची व इंटरनेटची पुरेशी माहिती असलेल्या कर्मचाऱ्यांची / व्यक्तींची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी मदत घ्यावी.

११. शाळेमध्ये इंटरनेट कनेक्शन नसल्यास अन्य ठिकाणाहून ( इंटरनेट कनेक्शन उपलब्ध असलेल्या शाळा, नेट कॅफे इ.) आवेदनपत्रे भरावीत.

१२. नेट कॅफेमधून ऑनलाईन आवेदनपत्र भरल्यास मुख्याध्यापकाने शाळेच्या लॉगीनमधून भरलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करुनच सबमीट करावे. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क भरले गेल्याची खात्री स्वतः मुख्याध्यापकांनी करावी. यासंबंधी भविष्यात काही प्रश्न उदभवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील.

१३. परीक्षा परिषदेने आवेदनपत्रे भरण्यासाठी कोणत्याही केंद्रास परवानगी दिलेली नाही अथवा प्राधिकृतही केलेले नाही. शाळेने आपल्या सोयीनुसार इंटरनेट कनेक्शन उपलब्ध असलेल्या ठिकाणी ऑनलाईन आवेदनपत्रे भरावीत.

१४. ऑनलाईन आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in या अधिकृत संकेतस्थळावरुनच भरावीत.

१५. ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यापूर्वी आवेदनपत्र भरण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना

आवेदनपत्रातील सर्व मुद्दयांबाबत सविस्तर माहिती देऊन अवगत करावे.

१६. आवेदनपत्र भरण्यासाठी वेगवान इंटरनेट (Broadband) कनेक्शनचा उपयोग करावा.

१७. आवेदनपत्र भरण्यासाठी शक्यतो गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स ७५ व त्यावरील व्हर्जनच्या

इंटरनेट ब्राऊजरचाच वापर करावा. जेणेकरून आवेदनपत्र भरताना कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवणार नाही.

१८. आवेदनपत्रे भरण्यासाठी शाळांना अकरा अंकी UDISE कोड क्रमांक असणे अनिवार्य आहे. 

१९. आवेदनपत्रातील सर्व मुद्दयांची माहिती शाळेच्या रेकॉर्डप्रमाणे अचूक असणे आवश्यक आहे. ऑनलाईन आवेदनपत्रात अचूक माहिती भरणे ही जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची आहे.

२०. आवेदनपत्रातील सर्व अनिवार्य मुद्दयांची (Mandatory Field) माहिती भरल्याशिवाय ऑनलाईन आवेदनपत्र SAVE होणार नाही.

२१. Login Id व Password जतन करून ठेवावेत. ते त्रयस्थ व्यक्तीला देऊ नयेत.

२२. विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरण्यासाठी आधार कार्ड क्रमांक व बँक खाते क्रमांक असणे अनिवार्य नाही, मात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाल्यास त्याचे बँक खाते काढून त्याची माहिती ऑनलाईन शिष्यवृत्ती प्रणालीमध्ये भरण्याची जबाबदारी संबंधीत शाळा मुख्याध्यापकांची राहील.

वाक्प्रचार अर्थ आणि वाक्यात उपयोग

1 thought on “Scholarship exam 2024 for class 5 and 8”

Leave a Comment