प्रिय बाई स्वाध्याय | Priy bai swadhay iyatta pachavi

प्रिय बाई स्वाध्याय: आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पत्र लेखन नाहीसे चालले आहे. प्रिय बाई या घटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पत्र लेखनाची ओळख करून देण्यात आली आहे. आज मोबाईलच्या वापरामुळे शासकीय पत्र ऐवजी इतर सर्व प्रकारची पत्रे जवळजवळ बंद झाली आहेत. पोस्ट कार्ड, अंतर्देशीय पत्र आजकाल पाहण्यासाठी दुर्मिळ होत चालली आहेत.

प्रिय बाई या पाठांमध्ये उर्मिला माने नावाची मुलगी तिच्या बाईंना पत्र लिहिते. यामध्ये ती आपल्या बाई विषयाच्या आठवणी बाईंना सांगते. पत्र लेखनामध्ये, मायना, पाठवणार याचा पत्ता कशाप्रकारे लिहिला जातो याची ओळख प्रिय बाई या पत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होते.

पत्रलेखना वर आधारित प्रिय बाई स्वाध्याय आपण या ठिकाणी प्रश्न उत्तर रूपाने पाहणार आहोत.

प्रिय बाई स्वाध्याय

इयत्ता – पाचवी.

विषय – मराठी.

 
प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय आहे ?

प्रिय बाई हे पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिला माने असे आहे. पत्र लिहिणाऱ्याचे नाव पत्राच्या शेवटी उजव्या बाजूला असते.

२) पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तुम्ही कशावरून ओळखले ?

पत्र लिहिणाऱ्या मुलीने स्वतःचे नाव पत्राच्या शेवटी उजव्या कोपऱ्यात लिहिले आहे.

३) उर्मिला आनंदाने का उडाली ?

टीव्हीवरच्या बातमीत आदर्श शिक्षक पुरस्कार घेताना उर्मिलाला तिच्या बाई दिसल्यामुळे ती आनंदाने उडाली.

४) उर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे ?

उर्मिला सध्या पाचवीच्या वर्गात शिकत आहे.

५) उर्मिलाने कोणत्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत ?

उर्मिलाने तिसरीच्या वर्गाच्या आठवणी आपल्या प्रिय बाई ना पत्रातून कळवल्या आहेत.

६) उर्मिलाचे बाईंच्या घरी येणे – जाणे होते, हे कोणत्या वाक्यावरून कळते ?

‘ तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झालाय ? ‘ पत्रातील या वाक्यावरून उर्मिलाचे तिसरीच्या बाईंच्या घरी येणे – जाणे होते, हे कळते.

प्र २) पुढील प्रश्नांची चार-पाच वाक्यात उत्तरे लिहा.

१) उर्मिलाच्या आजोबांनी कोणता सल्ला दिला ? का दिला ?

बाईंना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला; म्हणून उर्मिला अभिनंदन करण्यासाठी बाईंना फोन लावत होती. पण फोन लागेना. तेव्हा आजोबांनी उर्मिलाला सांगितले की फोनचे काही खरे नाही. त्यापेक्षा बाईंना पत्र लिही. हा सल्ला आजोबांनी उर्मिलाला दिला; कारण पत्र बाईंना कायम आठवणीत राहील. पत्राचे वाचन आपण केव्हाही करू शकतो. फोन पेक्षा पत्र हे दीर्घकाळ स्मरणात राहते.

२) पाचवीत आल्यापासून उर्मिलाच्या कोणकोणत्या गोष्टीत बदल झाला ?

पाचवीच्या अगोदर उर्मिलाला शाळेत सोडायला जावे लागत होते मात्र पाचवीत आल्यापासून उर्मिला शाळेत एकटीच चालत जाऊ लागली. तिला एकदम आपण मोठे झालो आहोत असे वाटू लागले. पाचवीत गेल्यापासून उर्मिला अभ्यास तर करतेच तसेच भरपूर खेळतेही. ती दररोज संध्याकाळी जवळजवळ दोन तास मैदानावर खेळते. पाचवीत आल्यापासून हा बदल उर्मिलात झाला.

३) उर्मिलाने पत्रात कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केला आहे ?

उर्मिलाने पत्रात बाईंनी गाऊन शिकवलेल्या कवितांचा व स्नेहसंमेलनात बाईंनी बसवलेल्या नाटकाचा उल्लेख केला आहे. तसेच बाईंनी सहलीला घेतलेल्या भन्नाट खेळांचा उल्लेख केला आहे. उर्मिलाने पत्रात बाईंच्या घराबाहेरच्या गुलमोहराचा झाडाचा उल्लेख केला आहे. तसेच स्वाती, जय व सलमा या मित्र-मैत्रिणींचा उल्लेख केला आहे. पाचवीत  आपल्यात कोणकोणते बदल झाले आहेत, इत्यादी गोष्टींचा उल्लेख उर्मिलाने बाईंना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

इयत्ता पाचवीच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा.

सर्वनाम

नामाबद्दल येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. वाक्यामध्ये पुन्हा पुन्हा नामाची पुनरावृत्ती न करता त्याच्या ऐवजी वेगवेगळे शब्द वापरले जातात त्यांना आपण सर्वनाम म्हणतो. सर्वनामांचा वापर आपण दैनंदिन व्यवहारांमध्ये नेहमी करतो.

खाली काही सर्वनामावर आधारित प्रश्न व त्यांची उत्तरे दिली आहेत. जी आपल्याला सर्वनाम समजून घ्यायला मदत करतील.

प्र ३) पुढील संवाद वाचा. सर्वनामांना अधोरेखित करा.

नीता : आज आपण झोका खेळूया.

मंदार : दादा, तू पण चल ना !

दादा : मी नाही येणार. मुग्धाला ने.

मंदार : ती आणि आत्या बाजारात गेल्या आहेत.

दादा : त्या आल्या की तुम्ही खेळा.

नीता : आम्ही नाही खेळणार, तू आल्याशिवाय.

वरील वाक्यात आपण, तू, मी, ती, त्या, तुम्ही, आम्ही इत्यादी सर्वनामे आली आहे. वरील सर्वनामे दाखवण्यासाठी ती ठळक केलेली आहेत.

प्र ४) पुढील वाक्य वाचा. त्याखालील वाक्यात  ‘पिशवी’ ऐवजी योग्य सर्वनामे वापरून वाक्ये लिहा. 

पिशवी खूप सुंदर होती.

१) पिशवीचा रंग गुलाबी होता.

तिचा रंग गुलाबी होता.

२) पिशवीत खूप वस्तू ठेवता येत होत्या.

तिच्यात खूप वस्तू ठेवता येत होत्या.

 ३) पिशवीला काचा, मणी लावलेले होते.

तिला काचा, मनी लावलेले होते.

४) पिशवी माझ्या मैत्रिणींना खूप आवडली.

ती माझ्या मैत्रिणींना खूप आवडली.

या ठिकाणी आपल्याला पिशवी या नामाबद्दल प्रत्येक वाक्यात वेगवेगळी सर्वनामे आलेली पहावयास दिसत आहेत. पहिल्या वाक्यात पिशवी बद्दल तिचा, दुसऱ्या वाक्यात तिच्यात तर तिसऱ्या वाक्यामध्ये तिला आणि चौथ्या वाक्यामध्ये ती अशी सर्वनामे आलेली आहेत.

प्र ५) पुढील वाक्यातील गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा.

१) आपण बाजारातून भाजी आणू या.

( तुम्ही,आपण,आम्ही )

२) आईने जेवायला काय केले आहे ?

( कोणी, कोण, काय )

३) कर्ण दानशूर होता. तो दररोज दान द्यायचा.

( तो, ती,त्या )

४) ताईने तिच्या मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला.

( तिच्या, त्याच्या, त्यांच्या )

५) आज आम्ही खूप मजा केली.

( आपण, स्वतः ,आम्ही )

६) रमेशने त्याच्या मित्रांना वाढदिवसाला बोलावले.

( त्याच्या, तिच्या , त्यांच्या )

इयत्ता पाचवीच्या मराठी विषयाचे स्वाध्याय पाहा.

 

 

Leave a Comment