Skip to content

मुंग्यांच्या जगात | Mungyanchya jagat swadhay iyatta 5 vi

  • by
मुंग्यांच्या जगात स्वाध्याय

मुंग्यांच्या जगात: मुंग्यांच्या जगात हा पाठ प्रकाश किसन नवाळे यांचा आहे. लेखकांनी या पाठात मुंग्यांच्या जीवनातील निरनिराळ्या कौशल्यांची माहिती दिली आहे. आपण आजूबाजूला अनेक प्रकारचे कीटक पाहतो. यामध्ये मुंगी हा कीटक आपल्याकडे सर्वत्र पाहावयास मिळतो. मुंग्यांच्या जगात या पाठांमध्ये मुंग्यांचे विश्व उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

कीटक वर्गातील मुंगी हा सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार कीटक आहे. मुंग्यांमध्ये संवाद साधण्याची निसर्गाने केलेली एक वेगळी सोय आहे. त्याचा उपयोग करून मुंग्या एकमेकांशी संवाद साधत असतात. मुंग्या आपल्या अन्नाचा साठा करून ठेवतात. मुंग्यांच्या जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण मुंग्यांच्या जगात या पाठात लेखका ने मांडले आहे.

मुंग्या स्वतःच्या आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. नकळतपणे मुंग्यांच्या वसाहतीवर पाय पडल्यास त्या कडकडून चावा घेतात. मुंगी चावली असता ती चावणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात विष सोडते. मात्र या विषयाचा परिणाम मोठ्या प्राण्यावर जास्त होत नाही.

मुंग्यांसारख्या छोट्या कीटकापासून उद्यमशीलता, शिस्तबद्धता व सामाजिक जीवन जगण्याची पद्धत शिकण्यासारखी आहे. मुंग्यांच्या अंगी असणारी शिस्त माणसाचे लक्ष वेधून घेते. मुंगी ही सतत कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असते. आपल्या ताकतीपेक्षा जास्त वजनाचे अन्न मुंग्या ओढून नेऊ शकतात. अनेक वेळा असे का मुंग्या समूहामध्ये करताना दिसतात. काम करताना त्यांच्या कामामध्ये एक वाक्यता असते.

मुंग्यांच्या जगात या पाठावर आधारित प्रश्न व त्यांची उत्तरे यांची माहिती पाहणार आहोत. खाली दिलेल्या प्रश्ना व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये ते लिहू शकता. त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल.

 मुंग्यांच्या जगात स्वाध्याय

इयत्ता – पाचवी.

विषय – मराठी.

मुंग्यांच्या जगात स्वाध्याय

प्र १) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्र. १) कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले ?
मुंगी हा कीटकांमध्ये सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार म्हणून कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते.

२) मुंग्या गंधकण केव्हा सोडतात ?

अन्नाचा साठा सापडल्यावर, आपल्या वसाहतीकडे परत येताना व एखादे संकट आल्यावर सावधानतेचा इशारा देताना मुंग्या गंधकण सोडतात.

३) मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात ?

स्वतःचे आणि आपल्या वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात.

४) मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण कसे करतात ?

कडकडून चावा घेऊन, विषारी दंश करून व शत्रूवर विशिष्ट आम्लाचा फवारा सोडून मुंग्या स्वतःचे व आपल्या वसाहतीचे संरक्षण करतात.

प्र २) मुंग्यांच्या जगात पाठात आलेले मुंग्यांचे कोणते गुण किंवा वैशिष्ट्ये तुम्हाला आवडली ते सांगा.

मुंग्यांच्या जगात पाठात आलेले मुग्यांचे गुण : उद्योगी, कष्टाळू , शिस्तप्रिय व हुशार हे गुण आहेत.

मुंग्यांची वैशिष्ट्ये : मुंग्यांच्या अंगात रासायनिक गंधकण  असतात. त्यायोगे मुंग्या एकमेकींशी संवाद साधतात. स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण करण्यास मुंग्या तत्पर असतात. स्वतःच्या संरक्षणासाठी मुंग्या विषारी दंश  करतात व आम्लाचा फवारा शत्रूवर सोडतात. काही जातींच्या मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखी योजना केलेली असते. मुंगी हा समाजप्रिय कीटक आहे. तो समुहामध्ये राहतो.

प्र ३) ‘ मुंगी ‘ या शब्दाची वेगवेगळी रूपे या पाठात आलेली आहेत. ती शोधा व लिहा. याप्रमाणे एखाद्या शब्दाची ( नामाची ) वेगवेगळी रुपे लिहा.

१) मुंगी : मुंग्या, मुंगीला, मुंगीच्या,मुंग्यांनी, मुंग्यांचा, मुंग्यांच्या, मुंग्यांना.

२) कीटक : कीटकाला, कीटकाने, कीटकांनी, कीटकास, किटकाचा, कीटकांची.

3) घर: घरी, घरात, घराला, घरावर, घराणे, घरातील

प्र ४) खालील शब्द समुहांचा वाक्यात उपयोग करा.

१) माग काढणे.

चोराचा माग काढत पोलीस गावात पोहोचले.

२) सावध करणे.

कड्यावर चढताना सरांनी सगळ्यांना सावध केले.

३) फवारा सोडणे.

मुंग्या स्वतःच्या संरक्षणासाठी आम्लाचा फवारा शत्रूवर सोडतात.

४) तत्पर असणे.

दुसऱ्याला मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असावे.

५) पळ काढणे.

पोलिसांची चाहूल लागताच चोरांनी पळ काढला.

६) दाह होणे.

जखमेवर औषध लावताना थोडा दाह होतो.

७) हाणून पाडणे.

समुद्रकिनारी सहल काढण्याचा बेत सरांनी हाणून पाडला.

प्र ५) पुढील वाक्यांतील नामे ओळखा व सांगा.

१) बंडूची इजार चार बोटे लांब झाली.

बंडू , इजार , बोटे

२) आईने इजार एका कोनाड्यात फेकली.

आई , इजार , कोनाडा

३) माणसांप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत.

माणूस , मुंग्या

४) आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे.

कविता , भारत , धावपटू

प्र ६) पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य नामे घाला.

१) आई माधवला म्हणाली.

२) आंब्याच्या झाडावर कैऱ्या लटकत होत्या.

३) घसरगुंडी खेळायला आम्ही बागेत गेलो.

४) मराठी विषय मला खूप आवडतो.

५) राष्ट्रपतींचे भाषण ऐकून समिर मंत्रमुग्ध झाला.

६) महागाई वाढल्याने वस्तू महागल्या.

कारागिरी या पाठा वरील प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *