Skip to content

माझं शाळेचं नक्की झालं स्वाध्याय 5 वी |Maz shalech nakki zal

  • by
माझं शाळेचं नक्की झालं

माझं शाळेचं नक्की झालं ! हा पाठ विमल मोरे यांनी लिहिलेला आहे. म्हणजेच या पाठाच्या लेखिका विमल मोरे आहे. लेखिकेने या पाठामध्ये आपल्या जीवनातील लहानपणीचा प्रसंग रेखाटलेला आहे.

लेखिका आपल्या लहानपणी कोल्हापुरातील कळंब मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्यालगत असलेल्या झोपड्यांमध्ये राहत होत्या. सुरुवातीला त्यांनी झोपडपट्ट्यांमध्ये असणारे 18 विश्व दारिद्र्य यांचे वर्णन केलेले आहे. यामध्ये घराच्या असणाऱ्या भिंती, घराचे छप्पर, ओलसरपणामुळे घरामध्ये येणारा कुबट वास यांचं वर्णन आलेलं आहे.

झोपडी मध्ये असणारी संपत्ती म्हणजे चार-पाच फाटक्या वाकळा, सात आठ जर्मनची ताट, कपड्यांचे आणि चिंध्याची गाठोडी एक पत्र्याची घागर आणि एक पत्र्याची पेटी. ह्या एवढ्या वस्तूमध्येच लेखिकेंच्या कुटुंबाचा संसार चालू होता आणि या एवढ्याशा झोपतीत त्यांचे सहा जणांचे कुटुंब राहत होते. त्यातच तीन चार दिवसापासून लेखिकेकीचे वडील, आई, लेखिका आणि तिची बहीण अशी आणखी चार जण वाढल्यामुळे झोपडीत झोपायला सुद्धा जागा पुरत नव्हती.

लेखिकेचे कुटुंब हे सतत भटकत होतं. लेखिकेच्या भावाने लेखीकीला शाळेत घालतो म्हटल्यावर त्याचे वडील त्याच्यावर चिडतात. बाबांना लेखिकेच्या शिक्षणावर खर्च करणे परवडणारे नव्हते; पण दादा तिला शाळेत घालण्याचा हट्ट होता. मुलगी शिकली तर तिच्याशी कोणी लग्न करणार नाही अशी तिच्या वडिलांची समजूत होती.

शेवटी आई-बाबा निघून गेल्यानंतर भाऊही वहिनीला सांगून कामावर गेला. व लेखिकेच्या वहिनीने तिचे नाव शाळेत दाखल केले. नाव घालताना नारळ आणि सव्वा रुपया द्यावा लागतो याची माहिती लेखीकेला व तिच्या बहिणला नव्हती. वहिनीने नारळ आणला होता पण पैसे नव्हते. शेवटी वहिणीने शेजारच्या लताकाजवळून सव्वा रुपये घेतला आणि शाळेत दिल्यावर लेखिकेचा शाळेतलां प्रवेश निश्चित झाला.

अशाप्रकारे माझं शाळेचं नक्की झालं या पाठांमध्ये लेखिकेची शाळेत शिकण्याचं कसं नक्की झालं याबाबतच्या वर्णन आलेले आहे.

माझं शाळेचं नक्की झालं !

इयत्ता – पाचवी.

विषय – मराठी.

माझं शाळेचं नक्की झालं

प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.

 १) लेखिका कोठे राहत होती ?

लेखिका कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागून असलेल्या झोपडपट्टीत राहत होती.

२) झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा ?

जमीन सतत ओलसर असल्यामुळे झोपडीत नेहमी कुबट वास यायचा.

३) लेखिकेचे आईबाबा कुठे जायची तयारी करीत होते?

लेखिकेचे आईवडील बोरगावला असलेल्या पालांवर जायची तयारी करीत होते.

४) दादा इमीला आईबाबांबरोबर पाठवायला का तयार नव्हता ?

दादाला इमीला शाळेत घालायचे होते; म्हणून तो तिला आईबाबांबरोबर पाठवायला तयार नव्हता.

५) वहिनीने लताक्काकडे पैसे का मागितले ?

इमीच्या शाळेत भरायचा सव्वा रुपया वहिनीकडे नव्हता; म्हणून तिने लताक्काकडे पैसे मागितले.

प्र २) कोण, कोणास म्हणाले ते लिहा.

१) “किती दीस हितं बसून खायाचं ? “

असे आई अशोक दादाला म्हणाली.

२) ” चांगली शिकली तर कुठंतरी नोकरी करील. “

असे अशोकदादा बाबांना म्हणाला.

३) ” पोरांना जेवायला घालून शाळेत पाठव. ” 

असे अशोकदादा सुमाला ( पत्नीला )  म्हणाला.

४) ”  मुलीचं पूर्ण नाव काय ? ” 

असे शाळेतल्या बाई सुमावहिनीला म्हणाल्या.

५) ” तुमच्याजवळ सव्वा रुपया आहे का ? “

असे सुमावहिनी लताक्काला म्हणाली.

प्र ३) ‘ फुटकीतुटकी ‘ यासारखे माझं शाळेचं नक्की झालं या पाठात आलेले शब्द लिहा.

१) बारीसारीक

२) डोस्कंबिस्कं

३) आजकाल

४) मायलेकरं

५) शोधाशोध

प्र ४) ‘ धाड्कन ‘ यासारखे आणखी शब्द लिहा.

१) काड्कन

२) खाड्कन

३) ताड्कन

४) थाड्कन

५) फाड्कन

प्र ५) पुढील शब्दांमध्ये लपलेले शब्द सांगा.

उदा., झोपायला – झोपा, पाय, पाला, झोला.

१) आजकाल – आज, जल, काल, काज.

२) घालताना – घाल, ताल,लता, ताना,नाल.

३) माझ्याजवळ – माझ्या, माज, माळ,माव, जमा, जळ,जवळ,मावळ,वळ.

४) आठवण – आठ,आव, आण,आठव, वण.

इयत्ता पाचवी मराठी विषयाचे स्वाध्याय

प्रश्न 6. खेळ खेळूया.

भाजी विकणाऱ्या सुबा मावशी विषयाचा खालील परिच्छेद वाचा. यातील रंगीत शब्द स्वतःची जागा चुकलेत. ते विशेष माहिती देणारे शब्द योग्य ठिकाणी घालून उतारा पुन्हा लिहा.

डोक्यावर भाजीची पेटी घेऊन दिवसभर गर्द उन्हातून चालून सुभा मावशी वैतागली होती. पाठीतली पिवळी मेथी उन्हाने कोमेजून हिरवीगार पडू लागली होती. सकाळी निघताना ची सुकलेली वांगी उन्हाच्या तडाख्याने रसरशीत दिसू लागली होती. कधी एकदा घरी पोहोचतो, असे सुभा मावशीला झाले होते. एसटी संध्याकाळी दोन वाजता होती आणि आता भर दुपारचे फक्त सहा वाजले होते. कसेबसे चालत येऊन मावशीने स्टॅन्ड जवळचे आंब्याचे झाड गाठले. आंब्याच्या टळटळीत सावलीत आल्यावर तिला हायसे वाटते.

वरील उताऱ्यात ठळक अक्षरांमध्ये दिलेली नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द म्हणजे विशेषणे आहेत. या उताराच्या रूपाने विद्यार्थ्यांना विशेषणाची ओळख करून देण्यात आलेली आहे. ही विशेषणे चुकीच्या जागी दिलेली आहेत. या विशेषणांची जागा बदलून ती योग्य जागी लिहून दुरुस्ती करून आपण हा उतारा खालील प्रमाणे योग्य करता येईल.

उत्तर: डोक्यावर भाजीची पाटी घेऊन दिवसभर टळटळीत उन्हातून चालून सुबा मावशी वैतागली होती. पाठीतली हिरवीगार मेथी उन्हाने कोमेजून पिवळी पडू लागली होती. सकाळी निघता नाची रसरशीत वांगी उन्हाच्या तडाख्याने सुकलेली दिसू लागली होती. कधी एकदा घरी पोहोचतो, असे सुबा मावशीला झाले होते. एसटी संध्याकाळी सहा वाजता होते अन आता भर दुपारचे फक्त दोन वाजले होते. कसेबसे चालत येऊन मावशीने स्टॅन्ड जवळचे आंब्याचे झाड गाठले. आंब्याच्या गर्द सावलीत आल्यावर तिला हायसे वाटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *