ABC ID create कसा करावा? काय आहे ABC ID?

जे विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत त्या सर्वांना विद्यापीठामार्फत ABC ID काढण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. आता शिक्षणासाठी एबीसी आयडी असणे खूप अत्यावश्यक आहे. या पोस्टमध्ये आपण एबीसी आयडी म्हणजे काय? ABC ID create कसा करावा? अशा एबीसी आयडी संबंधित सर्व प्रश्नांची माहिती पाहणार आहोत.

ABC ID म्हणजे काय?

ABC ID हा आपला अभ्यासक्रमाशी संबंधित माहिती साठवून ठेवणारा एक युनिक आयडी आहे. यामध्ये आपण शिक्षण घेत असलेल्या सर्व अभ्यासक्रमांची ऑनलाईन साठवणूक होणार आहे. या आयडीच्या सहाय्याने आपण पूर्ण केलेले निरनिराळे अभ्यासक्रम समजून येतील. ज्याप्रमाणे आधार कार्ड पॅन कार्ड हे आपले युनिक आयडी नंबर आहेत तसेच शिक्षणाशी संबंधित एबीसी आयडी हा आपला युनिक नंबर आहे.

ABC ID full form

ABC ID चा फुल फॉर्म आहे Academic Bank of credits. यामध्ये बँक हा शब्द असला तरीही या आयडी चा बँकेची काहीही संबंध नाही. यामध्ये आपल्या अभ्यासाशी संबंधित बाबींचे माहिती जमा होणार आहे.

ABC ID create कसा करावा?

ABC ID आपण घरबसल्या आपल्या मोबाईल वरून काही मिनिटात तयार करू शकता. यासाठी आपल्याकडे मोबाईल नंबर, ई-मेल आयडी आणि आपले आधार कार्ड असणे आवश्यक आहे. जर आपल्याकडे डीजी लॉकर असेल तर आपण या डिजिलॉकर मध्ये लॉगिन करून लगेचच आपला एबीसी आयडी काढू शकता. मात्र जर आपल्याकडे डिजिटल लॉकर यापूर्वी लॉगिन नाही असे असल्यास आपण खालील प्रमाणे कृती करून एबीसी आयडी काढून शकता.

 • सर्वात प्रथम आपल्या फोन मधील ब्राउझर ओपन करा.
 • ब्राउझर मधील सर्च बॉक्स मध्ये आपल्याला abc Id टाकून सर्च करायचे आहे.
 • सर्च केल्यानंतर सर्च रिझल्ट मध्ये आपल्याला ABC | academic Bank of credits असा मजकूर असलेली लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
 • त्यानंतर आपल्यासमोर खाली दाखवल्याप्रमाणे पेज ओपन होईल.
ABC ID
 • या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात आपल्याला लॉगिन ची टॅब दिसत आहे त्यावरती क्लिक करा.
 • त्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दिसतील स्टुडन्ट आणि युनिव्हर्सिटी. त्यातील स्टुडन्ट या टॅब वर क्लिक करा.
 • त्यानंतर आपल्यासमोर लॉगिन पेज ओपन होईल. आपल्याकडे लॉगिन आयडी आणि पासवर्ड नसल्यामुळे लॉगिन च्या खाली साइन अप ची टॅब दिसेल त्यावरती क्लिक करा.
ABC ID
 • Sign up वर क्लिक केल्यानंतर वरील प्रमाणे पेज ओपन होईल. यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे.
 • त्यानंतर जनरेट ओटीपी याच्यावर क्लिक करा. आपल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी त्या खालील बॉक्समध्ये टाकून ओटीपी व्हेरिफाय करा. ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर आपल्यासमोर पुढील टॅब लिहिण्यासाठी ओपन होईल.
 • त्यानंतर आपल्याला आपले पूर्ण नाव जे आधार वर असेल त्याप्रमाणे लिहा. यामध्ये नावातील स्पेलिंग काळजीपूर्वक पहा.
 • आपली जन्मतारीख आणि लिंग अचूक नोंदवा.
 • त्यानंतर DigiLocker लोकर साठी आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे. सर्वात प्रथम आपला युजरनेम टाईप करा. युजरनेम मध्ये आपण आपले नाव, नाव व अंक याचा वापर करून तयार करू शकता.
 • त्यानंतर आपल्याला एक पासवर्ड म्हणजेच पिन तयार करायचा आहे. तो पिन कन्फर्म पिन या बॉक्समध्ये टाकून कन्फर्म करा.
 • नियम व अटी समोरील बॉक्स मध्ये टिक करा आवश्यकता वाटल्यास सर्व नियम व अटी वाचून घ्या आणि त्यानंतर व्हेरिफाय यावर क्लिक करा.
 • सबमिट केल्यानंतर आपले अकाउंट पूर्ण झाल्याचा मेसेज दिसेल. येथे आपला डिजिटल लॉकर चे रजिस्ट्रेशन पूर्ण होते. एबीसी आयडी काढण्यासाठी त्याखाली आपल्याला आपले अकाउंट आधार च्या साह्याने व्हेरिफाय करण्यासाठी त्या खालील बॉक्समध्ये आपला आधार नंबर टाका व सबमिट करा.
 • त्यानंतर आपल्या आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी जाईल तो ओटीपी त्याखालील बॉक्समध्ये टाकून व्हेरिफाय करा.
 • ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर आपल्यासमोर आपला ABC ID तयार झालेला दिसून येईल. त्याचा स्क्रीन शॉट काढून घ्या.
 • त्यानंतर डॅशबोर्ड वर क्लिक करून आपण आपले ABC ID कार्ड डाऊनलोड करून घेऊ शकता.
 • हा ए बी सी आय डी आपल्याला विद्यापीठाचा फॉर्म भरताना व विद्यापीठाच्या निरनिराळ्या कामासाठी लागणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वरील नाव, जन्मतारीख अथवा लिंग चुकीचे असेल त्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड अपडेट केल्याशिवाय त्यांचा एबीसी आयडी तयार करता येणार नाही. एबीसी आयडी तयार करताना माहिती चुकीची असल्या बाबतचा मेसेज आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक नसेल त्यांनाही एबीसी आयडी कार्ड काढता येणार नाही.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक चा रिपीटर फॉर्म ऑनलाईन कसा भरावा याविषयी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

अशाप्रकारे आपण आयडी एबीसी आयडी क्रिएट करू शकतो. त्याचबरोबर याच प्रोसेस मध्ये आपले डीजी लॉकर चे रजिस्ट्रेशन सुद्धा पूर्ण होते. यानंतर आपण डीजी लॉकर हे ॲप डाऊनलोड करून घेऊ शकतो. त्यामध्ये आत्ता तयार केलेला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

या डीजे लॉकरमध्ये आपण आपली सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरूपामध्ये डाऊनलोड करून ठेवू शकतो. यामध्ये आपण आपले डिजिटल आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, एबीसी आयडी कार्ड, दहावी बारावी मार्कशीट, गाडीचे आरसी बुक इत्यादी शासकीय कागदपत्रे एकाच ठिकाणी साठवून ठेवू शकतो. ज्यांचा वापर आपण निरनिराळ्या शासकीय कामासाठी करू शकतो सर्व ठिकाणी तो ग्राह्य धरला जातो.

Leave a Comment