शब्दसमूहाबद्दल एक शब्द : म्हणी, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द व शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे मराठी भाषेचे सौंदर्य वाढवतात. मराठी मध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरले जाणारे अनेक शब्द आहेत. त्यांची माहिती पाहूया.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
- आधी जन्मलेला – अग्रज
- अग्नीची पूजा करणारा – अग्निपूजक
- ज्याला कोणीही शत्रू नाही असा – अजातशत्रू
- ज्याला कोणीही जिंकू शकत नाही – अजिंक्य
- विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे केलेले गैर कृत्य – अतिक्रमण
- तिथी दिवस न ठरवता अचानक आलेला पाहुणा – अतिथी
- ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे – अतुलनीय
- ज्याचा थांग लागत नाही असे – अथांग
- धर्मार्थ फुकट जेवण मिळण्याचे ठिकाण – अन्नछत्र, सदावर्त
- अन्नदान करणारा – अन्नदाता
- मागून जन्मलेला – अनुज
- ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे – अनुपम, निरूपम
- न टाळता येणारे – अटळ
- पूर्वी कधीही घडले नाही असे – अपूर्व
- कधीही मरण नसणारे – अमर
- थोडक्यात समाधान मानणारा – अल्पसंतुष्ट
- वर्णन करता येणार नाही असे – अवर्णनीय
- कधीही नाश न पावणारे – अविनाशी
- ज्याचा विसर पडणार नाही असा – अस्मरणीय
- एकाच वेळी अनेक गोष्टीत लक्ष ठेवणारा – अष्टावधानी
- जे साध्य होणार नाही असे – असाध्य
- शरीराला कष्ट न देता काम करणारा – अंगचोर
- लहान मुलाला झोपवण्यासाठी गायलेले गाणे – अंगाई गीत
- आकाशातील तार्यांचा पट्टा – आकाशगंगा
- स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र – आत्मचरित्र, आत्मवृत्त
- अगदी पूर्वीपासूनचे राहणारे – आदिवासी
- पायापासून डोक्यापर्यंत – आपादमस्तक
- ज्याच्यावर उपकार झाले आहे असा – उपकृत
- शिल्लक राहिलेले – उर्वरित
- श्रम न करता खाणारा – ऐतखाऊ
- कानांना गोड वाटणारा ( आवाज ) – कर्णमधुर
- कर्तव्याकडे पाठ फिरवणारा – कर्तव्यपराडमुख
- कर्तव्यात तत्पर असणारा – कर्तव्यपरायण, कर्तव्यतत्पर, कर्तव्यदक्ष
- दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत – आसेतुहिमाचल
- राष्ट्राराष्ट्रांतील संबंध असणारे – आंतरराष्ट्रीय
- हळूहळू घडून येणारा बदल – उत्क्रांती
- उदयाला येत असलेला – उदयोन्मुख
- वाटेल तसा पैसा खर्च करणे – उधळपट्टी
- दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा – कनवाळू
- कमळाप्रमाणे डोळे असणारी – कमलाक्षी, कमलनयना
- हाताने केलेली खाणाखुणांची भाषा – करपल्लवी
- इच्छिलेली वस्तू देणारा काल्पनिक वृक्ष – कल्पवृक्ष
- कलेची आवड असणारा – कला प्रेमी, कलासक्त
- कोणत्याही क्षेत्रात एकाएकी होणारा मोठा बदल – क्रांती
- कामाची टाळाटाळ करणारा – कामचुकार , कामचोर
- लहानपणापासून म्हाताऱ्यापर्यंत – आबालवृद्ध
- जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे – आभास
- देव आहे असे मानणारा – आस्तिक
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
- उपकाराची जाणीव न ठेवण्याची प्रवृत्ती – कृतघ्नता
- केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा – कृतज्ञता
- काळोख्या रात्रीचा पंधरवडा – कृष्णपक्ष , वद्यपक्ष
- आकाशात गमन करणारा – खग, खेचर
- आकाशाचा भेद करणारे – गगनभेदी
- जन्मापासून श्रीमंत – गर्भश्रीमंत
- जेथे मूर्ती असते तो देवळाचा आतील भाग – गाभारा
- सापाचा खेळ करणारा – गारुडी
- सैन्याची केलेली कोड्यासारखी रचना – चक्रव्यूह
- चार पाय असलेला – चतुष्पाद
- गावाच्या न्यायनिवाड्याची जागा – चावडी
- इच्छिलेले देणारा काल्पनिक मणी – चिंतामणी
- चार रस्ते एकत्र येतात ती जागा – चौक, चव्हाटा
- जगाचा स्वामी – जगन्नाथ
- जिथे जन्म झाला आहे तो देश – जन्मभूमी
- पाण्यात राहणारे प्राणी – जलचर
- इच्छित वस्तू देणारी काल्पनिक गाय – कामधेनू
- कार्यात तत्पर असणारा – कार्यतत्पर
- कार्यात गढून गेलेला – कार्यमग्न , कार्यरत
- केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा – कृतघ्न
- जाणून घेण्याची इच्छा असणारा – जिज्ञासू
- नारळाच्या झाडाची पाने – झावळ्या
- नाणी पाडण्याचा कारखाना – टाकसाळ
- किल्ल्या भोवतालची भिंत – तट
- तप करण्याची जागा – तपोभूमी
- भरपूर आयुष्य असणारा – दीर्घायुषी
- सतत उद्योग करणारा – दीर्घोद्योगी
- हट्टीपणा करणारा – दुराग्रही
- दररोज प्रसिद्ध होणारे – दैनिक
- देवावर हवाला ठेवून राहणारा – दैववादी
- दोन नद्यांमधील प्रदेश – दोआब / दुआब
- एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे – धर्मांतर
- वाटसरुंना राहण्यासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत – धर्मशाळा
- धर्माची स्थापना करणारा – धर्मसंस्थापक
- विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा – ध्येयनिष्ठ
- नवीन मतांचा पुरस्कार करणारा – नवमतवादी
- देवापुढे सतत तेवत असणारा दिवा – नंदादीप
- न्यायाच्या बाबतीत कठोर असणारा – न्यायनिष्ठुर
- देवाचे अस्तित्व न मानणारा – नास्तिक
- ठरलेल्या कालावधीत प्रसिद्ध होणारे – नियतकालिक
- कोणाचाही आधार नसलेला – निराधार
- कशाचीही इच्छा नसणारा – निरिच्छ
- घोडे बांधण्याची जागा – तबेला
- तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेला लेख – ताम्रलेख
- तीन रस्ते एकत्र येतात ती जागा – तिठा
- तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे – त्रैमासिक
- दारावरील पहारेकरी – द्वारपाल
- दोनदा जन्मलेला – द्वीज
- तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश – द्वीपकल्प
- अस्वलाचा खेळ करणारा – दरवेशी
- ( समाजाकडून ) उपेक्षिलेले व पिडले गेलेले – दलित
- तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट – दंतकथा
- खूप दानधर्म करणारा – दानशूर
- संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम – दिनक्रम
- निसर्गतः सुंदर असणारे – निसर्गसुंदर
- स्वतःच्या फायद्याचा विचार न करता कार्य करणारा – नि:स्वार्थी
- एकमेकांवर अवलंबून असणारे – परस्परावलंबी
- दुसऱ्यावर अवलंबून असणारा – परावलंबी
- आजारी लोकांची शुश्रुषा करणारी – परिचारिका
- पंधरा दिवसाचा काळ – पक्ष, पंधरवडा
- तंटा सोडवण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक – पंच
- तिथी ,वार ,नक्षत्र, योग व करण वगैरे दिन वैशिष्ट्यांची माहिती असलेली पुस्तिका – पंचांग
- जगाचा नाश होण्याची वेळ – प्रलयकाळ
- फक्त माणसाला पायी जाता येईल एवढी अरुंदवाट – पाऊलवाट
- किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा – पागा
- फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय – पाणपोई
- पाण्याखालून चालणारी बोट – पाणबुडी
- गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा – पाणवठा
- समोरासमोरील कुंपणामुळे तयार झालेली गावातील किंवा शेतातील लहान वाट – पाणंद, पाणद,
- ज्याच्यातून आरपार दिसू शकते अशी – पारदर्शक
- युरोप, अमेरिका या पश्चिमेकडे देशांतील लोक – पाश्चिमात्य, पाश्चात्य
- दगडासारखे कठोर हृदय असणारा – पाषाणहृदयी
- पंधरा दिवसांच्या कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक – पाक्षिक
- म्हाताऱ्या व लंगड्यालुळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण – पांजरपोळ
- लोकांचे पुढारीपण करणारा – पुढारी, नेता
- जुन्या मतांना चिकटून राहणारा – पुराणमतवादी , सनातनी
- आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा – पुरोगामी
- पुरांमुळे नुकसान झालेले लोक – पूरग्रस्त
- पूर्वेकडे तोंड करून असलेला – पूर्वाभिमुख
- पिण्यास योग्य असलेला द्रव्य पदार्थ – पेय
- आई वडील नसलेला – पोरका
- पूर्वेकडील देशांतील लोक – पौर्वात्य
- शत्रूला सामील झालेला – फितूर
- बर्फाने अच्छादलेला – बर्फाच्छादित
- ज्याला खूप माहिती आहे असा – बहुश्रुत
- बाराजणांचा कारभार – बारभाई
- बारा खिडक्या असलेला महाल – बारमाडी
- कोणालाही कळून न देता – बिनबोभाट
- चार बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश – बेट
- डोंगर पोखरून आरपार नेलेला रस्ता – बोगदा
- निरर्थक गोष्टी – भाकडकथा
- राजाची स्तुती करणारा – भाट
- भांडण उकरून काढणारा / काढणारी – भांडकुदळ
- शिकारी साठी किंवा निरीक्षण करण्यासाठी रानात बांधलेला सुरक्षित उंच माळा – मचाण
- माकडाचा खेळ करणारा – मदारी
- दुसऱ्याच्या मनातले जाणणारा – मनकवडा
- विशिष्ट ध्येय गाठण्याची जबरदस्त इच्छा असणारा – महत्त्वाकांक्षी
- काहीही काम न करता आळसात काळ घालवणारा – निरुद्योगी
- लाज नसलेला – निर्लज्ज
- कसलेही व्यसन नसणारा – निर्व्यसनी
- घरादाराला व देशाला पारखा झालेला – निर्वासित
- कसलाही डाग नसलेला – निष्कलंक
- कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा – निष्पक्षपाती
- म्हातारपणी बुद्धीला झालेला विकार – म्हातारचळ
- पिकांच्या रक्षणासाठी केलेला मांडव – माचा