Skip to content

ठेवा निसर्गाचा स्वाध्याय इयत्ता चौथी

आपल्या सभोवती या इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील पहिला घटक आहे ठेवा निसर्गाचा. या ठिकाणी आपण ठेवा निसर्गाचा या घटकावरील स्वाध्याय पाहणार आहोत.

निसर्गाचा ठेवा स्वाध्याय इयत्ता चौथी

( अ) तुमच्या परिसरात आढळणारे पाण्याचे स्रोत खालील यादीतून निवडून लिहा.

तलाव, समुद्र, नदी, धरण, विहीर, आड, हातपंप, बारव, ओढा, झरा, धबधबा, सरोवर

उत्तर- तलाव, नदी, विहीर, आड, हातपंप, ओढा, झरा इत्यादी

(आ) ओळखा पाहू मी कोण?

१) मी चिकट आणि माऊ आहे मी पाणी सहज धरून ठेवते. = चिकनमाती

2) मी वाळू सारखी आहे मी पाणी धरून ठेवू शकत नाही = वालुकामय माती

३) मी वालुकामय माती, चिकन माती व गाळ यांच्यापासून तयार झालेली आहे = पोयटा माती

(इ) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१) मातीचे उपयोग लिहा.

उत्तर – मातीमुळे शेती पिकते. वनस्पतींना अन्न व पाणी मिळते.माती पासून मातीच्या वस्तू खेळणे बनवता येतात. घर बांधण्यासाठी मातीचा उपयोग होतो.

2) मातीच्या प्रदूषणाची कारणे लिहा .

शेतातून जास्त उत्पादन काढण्यासाठी रासायनिक खतांचा अतिवापर त्याचबरोबर कीटकनाशके तणनाशके यांचा अतिवापर यामुळे माती प्रदूषित होते. कारखान्यामधून निघणारे टाकाऊ पदार्थ मातीत मिसळल्याने माती दूषित होते.

३) निर्धोक पाणी म्हणजे काय?

जे पाणी पिल्यामुळे आपल्या प्रकृतीला कोणत्याही प्रकारे धोका होत नाही अशा पाण्याला निर्धोक पाणी म्हणतात.

४) पाण्याचे प्रदूषण कोण कोणत्या कारणाने होते?

साबणा,प्लॅस्टिक,खते,प्लास्टर ऑफ पॅरिस ची मूर्ती,रासायनिक पदार्थ पाण्यामध्ये मिसळल्याने पाणी दूषित होते.

(ई) घरात पाणी कशा कशा साठवले जाते ती साधने खालील शब्द कोड्यात शोधा त्या शब्दाभोवती चौकट करा.
  • रांजण
  • माठ
  • कळशी
  • बादली
  • हंडे
  • टाकी
  • पिंप
(उ) चित्राचे निरीक्षण करा त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा.

१) चित्रात पाणी निर्धोक करण्याची कोणती पद्धत वापरली आहे?

उकळणे

2) निर्धोक होण्यासाठी पाणी किती वेळ उकळावे ?

पाणी निर्धोक होण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे उकळावे.

३) पाणी उकळल्यावर ते पिण्यास सुरक्षित का होते ?

पाणी उकळल्यामुळे त्यातील हानिकारक सूक्ष्मजीव, जंतू नष्ट होतात त्यामुळे पाणी पिण्यास सुरक्षित होते.

४) पाणी निर्धोक करण्यासाठी कोणते उपाय करता येतील?

पाणी निर्धोक करण्यासाठी गाळणे, निवळणे, निर्जंतुकीकरण करणे, फिल्टरच्या साह्याने निर्धोक करणे.

ऊ ) पुढील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा.

१) खालीलपैकी कोणता पाण्याचा स्त्रोत नाही?

अ) नदी ब) जंगल क) तलाव ड) विहीर

उत्तर – जंगल

2) माती प्रदूषण कशामुळे होते ?

अ) मातीत झाडे लावल्यामुळे

आ) मातीत कचरा आणि प्लास्टिक टाकल्यामुळे

इ) पाणी वाचवल्यामुळे

ई) मातीत गुरे धुतल्यामुळे

उत्तर -मातीत कचरा आणि प्लास्टिक टाकल्यामुळे

3) पाण्याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग कोणता ?

अ) फरशी पुसण्यासाठी

आ) खेळण्यासाठी

इ) पिण्यासाठी

ई) गाड्या धुण्यासाठी

उत्तर -पिण्यासाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *