कवी यशवंत यांची सण एक दिन ही कविता आहे. आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीतील बरेच सारे सण उत्सव हे शेतीशी संबंधित असतात. जवळपास 80 टक्के लोक शेती हा व्यवसाय करत असल्याकारणाने आपल्या देशाचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. म्हणूनच आपले बरेचसे निगडित असतात. त्यातीलच बेंदूर किंवा बैलपोळा या सणाविषयीची माहिती या कवितेमध्ये आहे.
शेती व्यवसायाच्या केंद्रस्थानी येतो तो शेतकरी आणि त्याची साधन सामग्री. शेतीसाठी अत्यावश्यक असलेली बैल जोडी ही शेतकऱ्याच्या कुटुंबाचा एक भाग असते. बैलांच्या मदतीने शेतकऱ्याला अनेक काम करावी लागतात. यामध्ये शेतीची मशागत करण्यासाठी बैलांचा खूप उपयोग होतो. त्यानंतर शेतात पिकलेले धान्य वाहून नेणे, त्याची मळणी करणे या कामांमध्ये त्यांचा उपयोग होतो.
वर्षातून एकदा बैलांसाठी बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा केला जातो. अलीकडे त्याचे प्रमाण कमी होत चालले आहे कारण पूर्वीच्या काळी प्रत्येक घरामध्ये गोठा असायचा.शेतीच्या कामासाठी सर्रास बैल वापरले जायचे; पण आजकाल यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. बैलपोळ्याच्या सणास काही भागात बेंदूर असे सुद्धा म्हटले जाते.
सण एक दिन या कवितेत या बैलपोळ्याची वर्णन करण्यात आले आहे. बैल पोळ्याच्या सणासाठी बैलांना स्वच्छ धुतले जाते. त्यानंतर त्यांची शिंगे रंगवली जातात. बैलांच्या कपाळावर कागदाचे आभूषण म्हणजेच बाशिंगे बांधली जातात. त्यांच्या पाठीवर झुली चढवल्या जातात. बैलांना निरनिराळी नावे दिलेली असतात. पोळ्याच्या दिवशी त्यांची वाजत गाजत, लेझीम खेळत मिरवणूक निघते. यामध्ये सर्व लोक सामील होतात.
चालताना बैलांची वशिंड हलत असतात. बैलांच्या शिंगाना तांबडे, हिरवे, निळे, पिवळे अशा निरनिराळया रंगांचे गोंडे बांधलेले असतात. त्यामुळे बैल अतिशय सुंदर दिसतात. शेतामध्ये कष्ट करताना चाबकाने धन्याने जरी बैलांना मारलेले असेल, त्याचे वळ त्याच्या पाठीवर असतील आणि उद्या ही त्याच्या पाठीवर असुडाचे फटके बसतील पण तरीही आज तो बैल आपल्या आपल्या मालकाच्या सोबत मिरवणुकीमध्ये मिरवत जात आहे.
बैलाची मिरवणूक काढताना जर बैलाने जराशी मान झटकली इकडे तिकडे पाहिले तरी त्याचे मालक वेसण खेचतील. याचा त्रास बैलांना होत असतो मात्र तरीही हा एक दिवसाचा सण बैलांसाठी असतो आणि बाकी वर्षभर त्या बैलांना मरमर ओझे ओढायचे असते.
अशाप्रकारे वर्षभर काबाड कष्ट करणाऱ्या या बैलाच्या सणाविषयीची माहिती या कवितेमध्ये देण्यात आलेली आहे.
सण एक दिन या कवितेमधील प्रश्नांची उत्तरे खालील प्रमाणे आहेत.
सण एक दिन
इयत्ता – पाचवी.
विषय – मराठी.
१) बैलांच्या कपाळावर काय बांधले आहे ?
बैलांच्या कपाळावर कागदाचे आभूषणे म्हणजेच बाशिंगे बांधली आहेत.
२) अवखळ कोण आहे ?
तरुण बैल अवखळ आहेत.
३) बैलांच्या गळ्यात काय आहे ?
बैलांच्या गळ्यात घुंगरांच्या माळा आहेत.
४) झुलीखाली काय असेल असे कवीला वाटते ?
झुलीखाली बैलांच्या पाठीवर चाबकांचे वळ असतील असे कवीला वाटते.
५) वर्षभर बैल काय करतात ?
वर्षभर बैल मालकासाठी मरेस्तोवर ओझी वाहतात.
प्र २) तीन वाक्यात उत्तरे लिहा.
१) या सणाला बैलांना कसे सजवतात ?
P सर्वात प्रथम महिलांना स्वच्छ धुतले जाते. त्यानंतर बैलांची शिंगे रंगवतात. त्यांच्या कपाळांवर बाशिंगे बांधतात. पाठीवर लहान लहान आरसे असणाऱ्या झुली चढवतात. गळ्यात घुंगरमाळा घालतात. शिंगाना निळे पिवळे लाल हिरवे गोंडे लावले जातात. अशा प्रकारे बैलपोळा या सणाला बैलांना सजवतात.
२) बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना कसे मिरवत नेतात?
बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवतात. त्यांच्या अंगावर सुंदर अशा झुली टाकल्या जातात. वाजंत्री निरनिराळी वाद्ये वाजवतात. सर्व गावकरी आनंदाने लेझीम खेळत त्यांना मिरवत नेतात. गावभर त्यांची मिरवणूक काढली जाते.
३) बैलाला वेसण का घातलेली असते ?
वेसण म्हणजे बैलाच्या नाकातून एक दोरी घातलेली असते. बैल हे ताकतीने जास्त असतात त्यामुळे त्यांना आवरण्यासाठी, बैलाने मान झटकू नये व सरळ रेषेत चालावे; त्यांना उधळून जाऊ नये, म्हणून बैलाला वेसण घातलेली असते.
४) ‘ सण एक दिन ‘ असे कवी का म्हणतात?
बैलपोळ्यालाच फक्त बैलांचे कौतुक होते. बाकी वर्षभर त्यांच्या पाठीवर फटकारे मारले जातात. त्यांना ओझी वाहावी लागतात. त्यांच्याकडून वर्षभर काबाडकष्ट करून घेतले जाते. त्यांच्या पाठीवर चाबकाचे फटकेही बसलेले असतात. या सर्वातून बाहेर पडून एक दिवसच हा सण साजरा केला जातो म्हणून ‘ सण एक दिन ‘ असे कवी म्हणतात.
प्र ३) जोड्या जुळवा.
अ गट उत्तर
१) रंगवलेली – शिंगे
२) शोभिवंत – गोंडे
३) दुलदुलणारी – वशिंडे
४) अवखळ – खोंड