Skip to content

सायकल म्हणते मी आहे ना! स्वाध्याय इयत्ता सहावी

सायकल म्हणते मी आहे ना!

सायकल म्हणते मी आहे ना! स्वाध्याय प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये आपण अभ्यासणार आहोत. हा एक आत्मकथनात्मक पाठ आहे.

सायकल म्हणते, मी आहे ना! स्वाध्याय

प्र. १) चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा.


अ) मुले सायकलचा वापर कशाकशासाठी करतात?
उत्तर: मुले सायकलचा वापर खालील कामासाठी करतात.

  • सायकल चालवून त्यातून आनंद मिळवण्यासाठी
  • घरात लागणारे साहित्य दुकानातून घेऊन येण्यासाठी, बाजारातून भाजीपाला आणण्यासाठी, आजोबांसाठी औषधांच्या गोळ्या आणण्यासाठी
  • लहान भावाला बहिणीला शाळेत पोहोचवण्यासाठी
  • एखाद्याला निरोप पोहोचवण्यासाठी इत्यादी छोटी मोठी कामे करण्यासाठी मुले सायकलचा वापर करतात.

आ) सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे का म्हटले आहे?

उत्तर:- कारण १) घाम येईपर्यंत सायकल चालवल्याने फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात.

२) घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो व प्रतिकारशक्ती वाढते आणि पायांचे स्नायू बळकट होतात.

३) मांसपेशी तंदुरुस्त राहतात. म्हणून सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे म्हटले आहे.

इ) सायकलच्या रूपात कसा कसा बदल होत गेला?

उत्तर: १) सायकलचा जन्म १६९० चा. फ्रान्स देशातील एम. डी. सिव्हर्क हे जन्मदाते होय.
२) १८७६ साली एच. जे. लॉसन यांनी सायकलला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली.
३) जॉन बॉइड डनलॉप यांनी १९८७ सायकलला रबरी टायर बसवले. त्यामुळे तिचा वेग वाढला.
४)सुरुवातील गिअर नसलेली सायकलला आत्ता गिअरसहित उपलब्ध आहेत.
५)शर्यतीसाठी, पर्यटनासाठी अशा विविध कारणांसाठी सायकलची रूपे वेगवेगळी आहेत.

प्र. २) तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

अ) आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता, सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले, तर कोणकोणते फायदे होतील?

उत्तर:आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता, सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले तर खालील फायदे होतील.

१) इंधनाची बचत होईल व इंधनावर खर्च होणारे पैसे वाचतील.
२) वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
३) शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल.
४) स्वतःचे कष्ट वाचतील.
५) देशात आयात करावे लागणारे इंधन कमी लागल्याने देशाच्या प्रगतीस हातभार लागेल.


आ) तुमच्या कुटुंबातील, परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?

उत्तर:- १) सायकल वापराचे महत्व व फायदे समजावून सांगेन.

२) सायकल वापराने होणाऱ्या आरोग्यविषयक फायदे पटवून देईल.

३) सायकल वापरल्याने आपल्या दैनंदिन खर्चात कशी बचत होते हे सांगेन.

४) अपघात होण्याची भीती वाटणार नाही.

५) वाहतूक कोंडी आणि पार्किंग च्या समस्या संपतील हे समजावून सांगेन.

सायकल म्हणते, मी आहे ना! स्वाध्याय

प्र. ३) खालील आकृतीत दिलेल्या मुद्द्यांप्रमाणे सायकल चालवण्याचे फायदे लिहा.

उत्तर: वैयक्तिक फायदे

१) शरीराचा उत्तम व्यायाम होतो.
२) इंधन लागत नसल्याने पैसे वाचतात.
३) पार्किंगची अडचण नाही.
४) सायकल चालवण्यासाठी परवानाची आवश्यकता नसल्याने कोणीही वापरू शकतो.
सामाजिक फायदे:
१) ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण कमी होईल.
२) शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी होईल.
३) अपघातांचे प्रमाण कमी होईल.
राष्ट्रीय फायदे
१) पेट्रोल, डीझेल व सीएनजी या इंधनाची बचत होईल.

२) इंधन परदेशातून विकत घ्यावे लागत असल्याने त्यावरती होणारा खर्च कमी येईल व देशाच्या प्रगतीस हातभार लागेल.

३) देशातून बाहेर जाणारे परकीय चलन वाचते.


प्र. ४. सायकलचे निरीक्षण करा व तिच्या भागांची नावे लिहा.

उत्तर: सायकलच्या भागांची नावे : सायकलला दिशा देणारे हँडल, बैठक (सीट), चाके, सायकलचा सांगाडा, सायकलला गती देणारे दोन पायडल, साखरदंड, ब्रेक इत्यादी.

प्र. ५. सायकल शिकताना तुम्हांला आलेले अनुभव आठ ते दहा वाक्यांत लिहा.
सदर प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाच्या अनुभवानुसार वेगवेगळे असते.

प्र. ६. संगणक तुमच्याशी बोलू लागला तर…. कल्पना करा व लिहा.
उत्तर:- एक दिवस मी संगणकाच्या खोलीतून जात असताना मला अचानक आवाज आला…

हॅलो मित्रा… ओळखलस का मला? मी संगणक. या आधुनिक जगातील तुमचा सोबती. तुमचे कोणतेही काम अधिक सोपे व्हावे म्हणून मी तुम्हाला मदत करतो. तुमच्या हातामध्ये असणारा मोबाईल हे सुद्धा माझेच एक रूप आहे.
त्यामुळे त्याचा वापर आपल्या दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी तुम्ही नेहमीच करत असता. तुमचे काम करताना मी कधीही थकून जात नाही तुमच्यासोबत काम करायला मला आवडते. माझा वापर इंटरनेट शिवाय आणि इंटरनेट सह करता येतो. माझा वापर तुम्ही नेहमी सकारात्मक कामासाठी करावा. त्याचबरोबर माझ्यावर गेम खेळण्यात आणि चित्रफिती बघण्यात वेळ वाया घालवू नका. धन्यवाद.

खेळूया शब्दांशी

अ) खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या.
अ) प्रचार व प्रसार
उत्तर:- प्रचार म्हणजे कोणतीही गोष्ट इतरांना पुन्हा पुन्हा सांगून पटवून देण्याचा प्रयत्न करणे.
आणि प्रसार म्हणजे एकाद्या गोष्टीचा प्रचार केला तर वेगाने त्या गोष्टीचा फैलाव होणे. प्रसार आपोआप होत असतो पण प्रचार करावा लागतो.

आ) विश्वास व आत्मविश्वास

उत्तर:- विश्वास म्हणजे एखाद्याबद्दल आपली खात्री असणे. एखादी गोष्ट करताना ती आपल्याला जमेलच मी ती करनाराच अशी कार्यक्षमतेची जाणीव स्वतःला होणे म्हणजे आत्मविश्वास होय.

आ) खालील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा.
१) रखडत चालणे – अडखळत चालणे.
तीव्र ऊनामुळे रमेश रखडत चालत होता.

आ) धडा शिकणे :- अद्दल घडने.
वाक्य:- आपल्या आळशीपणामुळे कामात अपयश आल्याने नाराज झालेल्या राजा चांगला धडा शिकला.

इ) हातभार लावणे:– मदत करणे.

सायली आईच्या कामात नेहमी हातभार लावतो.

इ) हलकीफुलकी म्हणजे खूप हलकी, तसे खालील शब्दांचे अर्थ लिहा.
अ) कधीमधी : कधीतरी, अधूनमधून
इ) धामधूम : जल्लोष, गाजावाजा
उ) साधेसुधे: खूप साधे.
आ) अवतीभवती: आजूबाजूला
ई) फेरफटका:- फिरणे
ई) ‘आडरस्ता’ यासारखे आणखी शब्द लिहा.
१) आडवाट
२) आडमार्ग
३) आडपडदा
४) आडसर

सायकल म्हणते मी आहे ना! स्वाध्याय

14.आतां उजाडेल स्वाध्याय सहावी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *