Nafa tota online test : नफा व तोटा हा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमधील एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील ही संकल्पना खूप उपयोगी असते. विशेषता व्यवसायाच्या दृष्टीने विचार करता ह्या दोन संज्ञा नेहमी वापरल्या जातात. या पोस्टमध्ये आपण नफा तोटा म्हणजे काय? नफा तोटा काढण्याची सूत्र, नफा तोटा या घटकावर आधारित ऑनलाइन चाचणी ( Nafa tota online test for scholarship exam) आपण अभ्यासणार आहोत.
नफा व तोटा या संकल्पना
नफा आणि तोटा या दोन निरनिराळ्या संकल्पना आहेत.
नफा – आपला एखादा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्या व्यवहारातून जर आपल्याला फायदा झाला तर त्या फायद्याला थोडक्यात नफा म्हणतात. म्हणजेच आपण एखादी वस्तू खरेदी करून, तिची वाहतूक, तिच्यासाठी येणारा इतर खर्च एकत्रित करून ती वस्तू विकल्या नंतर मिळणारी रक्कम जर जास्त असेल तर त्याला नफा म्हणता येईल.
तोटा – एखाद्या व्यवहारांमध्ये आपण गुंतवलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम तिच्या विक्रीतून मिळाली तर अशा व्यवहाराला तोटा म्हणतात.
खरेदी किंमत व विक्री किंमत या संकल्पना
खरेदी किंमत – एखाद्या रकमेला एखादा व्यापारी वस्तू खरेदी करतो त्या किमतीला त्या वस्तूची खरेदी किंमत म्हणतात. खरेदी किंमतीमध्ये या किमती बरोबरच तिच्यावर येणारा वाहतूक खर्च, हमाली, व्यवसायासाठी आवश्यक साहित्यावर येणारा खर्च हाही मिळवला जातो.
विक्री किंमत- एखादा व्यापारी आपण खरेदी केलेली वस्तू ग्राहकांना ज्या किमतीला विकतो त्या किमतीला त्या वस्तूची विक्री किंमत म्हणतात.
नफा- तोटा, खरेदी – किंमत विक्री किंमत काढण्याची सूत्रे.
नफा काढण्याचे सूत्र
एखाद्या व्यवहारांमध्ये जेव्हा विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा जास्त असते तेव्हा त्या व्यवहारांमध्ये नफा होतो.
नफा = विक्री किंमत – खरेदी किंमत
तोटा काढण्याचे सूत्र
एखाद्या व्यवहारांमध्ये जेव्हा विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा कमी असते तेव्हा त्या व्यवहारांमध्ये तोटा होतो.
तोटा = खरेदी किंमत – विक्री किंमत
खरेदी किंमत काढण्याचे सूत्र
व्यवहारात नफा असेल तर…..
खरेदी किंमत = विक्री किंमत – नफा
व्यवहारात तोटा असेल तर….
खरेदी किंमत = विक्री किंमत + तोटा
विक्री किंमत काढण्याचे सूत्र
व्यवहारात नफा असेल तर
विक्री किंमत = खरेदी किंमत + नफा
व्यवहारात तोटा असेल तर…
विक्री किंमत = खरेदी किंमत – तोटा
नफा- तोटा घटकावर सराव प्रश्न | Nafa tota online test
येथे आपल्याला नफा तोटा या घटकावर ऑनलाइन चाचणी देण्यात आली आहे. हे ऑनलाईन चाचणी सोडवल्यानंतर आपल्याला आपल्याला मिळालेले गुण, चुकलेले प्रश्न लगेच समजणार आहे.
ही ऑनलाईन चाचणी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी, नवोदय प्रवेश परीक्षा व शिक्षक पात्रता परीक्षा Mahatet Exam यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या परीक्षांना विचारले जाणाऱ्या प्रश्नाप्रमाणे प्रश्न तयार करण्यात आले आहेत. या चाचणी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेवर आधारित प्रश्नांचा अधिक समावेश करण्यात आला आहे. यानंतर पुढील चाचणी क्रमांक दोन मध्ये आपल्याला नवोदय आणि महाटीईटी परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नावर आधारित जास्त प्रश्न दिले आहेत.
Nafa tota online test 1 for scholarship exam
Nafa tota online test अशाच अभ्यास विषयक नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नोटिफिकेशन चालू करा.