Saral vyaj Online test : सरळ व्याज हा सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा महत्त्वाचा घटक आहे. शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Exam), नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET EXAM 2024) या परीक्षांमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नावर आधारित ( Saral vyaj Online test ) सरळ व्याजावर आधारित चाचणी तयार करण्यात आली आहे.
सरळ व्याजावर निरनिराळ्या प्रकारची उदाहरणे विचारली जातात. या चाचणी मध्ये सर्व प्रकारच्या उदाहरणावर मागील परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांचा विचार करून त्याचं प्रकारची उदाहरणे येथे आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. खालील प्रकारची उदाहरणे समाविष्ट आहे.
- मुद्दल, दर व मुदत देऊन सरळ व्याज काढणे.
- सरळ व्याज, दर व मुदत दिल्यावर मुद्दल काढणे.
- सरळ व्याज, मुद्दल व मुदत दिल्यावर व्याजाचा दर काढणे.
- सरळ व्याज, मुद्दल व व्याजाचा दर दिल्यावर मुदत काढणे.
- दुप्पट रक्कम होण्यासाठी लागणारा कालावधी व दर काढणे.
या सर्व प्रकारची उदाहरणे सोडवण्यासाठी सरळ व्याजाचे सूत्र उपयोगी ठरते.
सरळ व्याज = मुद्दल x दर x मुदत / 100
Saral vyaj Online test सोडवण्याबाबत सूचना….
- चाचणी सोडवताना लक्षपूर्वक उदाहरणांचे वाचन करा.
- सदर उदाहरणे सर्व योग्य पर्याय समोरील गोलामध्ये टिक करा.
- सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. म्हणजेच सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय आपली चाचणी सबमिट होणार नाही.
- सर्व प्रश्न सोडवून उत्तर बरोबर असल्याचे खात्री केल्यानंतर Submit या टॅबवर क्लिक करा.
- त्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज येईल. त्यामधील View Score या टॅब वर क्लिक करा.
- आपल्याला मिळालेले गुण दिसतील. त्याचबरोबर चुकलेल्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा पाहता येतील.
- या प्रश्नांचा सराव आपण कितीही वेळा करू शकता.
- प्रश्न बाबत काही शंका असल्यास अथवा इतर प्रश्नांची आवश्यकता असल्यास पण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता.
- सरळ व्याज बरोबरच शेकडेवारी या घटकावरही दोन ऑनलाइन चाचण्या उपलब्ध आहेत.
शेकडेवरी चाचणी -1. शेकडेवरी चाचणी -2