अश्मयुग दगडाची हत्यारे | Ashmyug dagadachi hatyare swadhay iyatta pachavi

इयत्ता पाचवीच्या पुस्तकामध्ये अश्मयुगाची ओळख करून देण्यासाठी अश्मयुग : दगडाची हत्यारे हा पाठ समाविष्ट केलेला आहे. या पाठांमध्ये प्रामुख्याने  दगडापासून बनवली जाणारी निरनिराळे हत्यारे, त्यांचे आकार यांची ओळख करून देण्यात आली आहे. अश्मयुगाला अश्मयुग हे नाव पडले कारण या काळात हत्यारामध्ये मोठ्या प्रामुख्याने दगडांच्या हत्यारे तयार करण्यात आली होती व त्यांचा वापर दैनंदिन व्यवहारात वाढलेला होता.

अश्मयुगाचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. १) पुराश्मयुग २) मध्याश्मयुग आणि  ३) नवाश्मयुग

पुराश्मयुग म्हणजेच अश्मयुगाचा सुरुवातीचा काळ. पुराश्मयुगात सुरुवातीच्या काळामध्ये माणसाने आघात तंत्र पद्धतीने दगडाची हत्यारे बनवली. यामध्ये हत्यारांच्या एकाच बाजूस माणसाने धार बनवली. ही हत्यारे निरनिराळ्या वस्तू तोडण्यासाठी वापरली जात असत. सुरुवातीच्या काळामध्ये हत्यारे बनवतात ती ओबडधोबड होते. त्यामध्ये मानवाने अजून प्राविण्य मिळवलेले नव्हते. मानवाने या काळामध्ये दगडाचा वापर हत्यारे तयार करण्यासाठी केला. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून हत्यारे बनवण्याच्या तंत्रात क्रांती घडवून आणली.

मध्याश्मयुगात मानवाने दगडापासून हत्यारे तयार करण्यामध्ये खूप प्रगती केली होती. या काळातली हत्यारे पुराश्मयुग काळाच्या तुलनेत अधिक उत्तम प्रकारे तो बनवू लागला. आकाराने खूप लहान असणारे हत्यारे त्याने बनवली. यामध्ये बाणाच्या टोकासारखी दगडी वस्त्रे बनवली, त्याचबरोबर मासेमारी साठी हाडांपासून गळ बनवण्यास सुरुवात केली.

नवाश्मयुगात मानव प्रगत तंत्रज्ञान अवगत करणारा होता. त्याने घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यार तयार केली. या हत्यारामध्ये व्यवस्थितपणा व वापरण्यास सुलभ हत्यारे त्याने बनवली. नवाश्मयुगापर्यंत माणसाला धातूंचा शोध लागला नव्हता. त्यामुळे दैनंदिन व्यवहारासाठी प्रामुख्याने दगडाची हत्यारे वापरली जात होती.

बुद्धिमान मानवाने हळूहळू दगडांपासून लांब व पातळ पाती असणारी हत्यारे तयार करण्यास सुरुवात केली. यामध्ये सूरी, तासणी इत्यादी हत्यारांचा समावेश होता.

आजही आपण पिठाची चक्की यंत्र यासारख्या यंत्रांमध्ये दगडाचा वापर करतो. आजही घरातील दळण दळण्याची जाती, पाटा वरवंटा हे दगडाचीच असतात.

अश्मयुग : दगडाची हत्यारे या पाठावरील स्वाध्याय सोडवण्यासाठी खालील नमुना प्रश्नांची मदत होईल.

 अश्मयुग : दगडाची हत्यारे

इयत्ता पाचवी

विषय – परिसर अभ्यास भाग २

अश्मयुगीन हत्यारे

आपण असे घडलो ( इतिहास )

प्र १) रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

१) ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात, त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो.

 ( ताम्रयुग, लोहयुग, अश्मयुग )

२) महाराष्ट्रातील स्थळांपैकी नाशिकजवळचे गंगापूर हे स्थळ प्रसिद्ध आहे.

( गंगापूर, सिन्नर, चांदवड )

प्र २) चुकीची जोडी निवडा.

१) पुढीलपैकी मध्याश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा.

१) राजस्थान – बागोर

२) मध्यप्रदेश – भीमबेटका

३) गुजरात – लांघणज

४) महाराष्ट्र – विजापूर

उत्तर – महाराष्ट्र – विजापूर

२) नदीचे नाव व त्या काठावर वसलेले शहर यातील चुकीची जोडी निवडा.

१) नर्मदा – हथनोरा

२) भीमा – गंगापूर

३) गोदावरी – नाशिक

४) प्रवरा – चिरकी- नेवासा

उत्तर – भीमा – गंगापूर

प्र ३) पुढीलपैकी कोणत्या आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो.

अ) पिठाची चक्की

आ) मसाला कांडप यंत्र.

उत्तर – पिठाची चक्की.

प्र ४) पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

१) आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला ?

दगडाचे छिलके काढून हत्यारे बनवण्यासाठी पुराश्मयुगातील मानवाने आघात तंत्राचा वापर केला. या तंत्राचा वापर करून त्याने दगडाच्या एकाच बाजूला धार केलेली तोडहत्यारे तयार केली. दगडाची छोटी छिलके काढण्यासाठी ताठ कण्याच्या मानवाने सांबरशिंगासारख्या वस्तूंचा घण तयार करून आघात तंत्राच्या साहाय्याने वेगवेगळी हत्यारे बनवली.

२) बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या  तंत्रात कोणती क्रांती केली ?

बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात त्याने दगडांपासून लांब व पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले. या लांब पात्यांपासून त्याने सुरी, तासणी, टोच्या, छिन्नी यांसारखी विविध उपयोग तो हत्यारे बनवण्यासाठी करू लागला.

प्र ५) पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या तीन कालखंडातील हत्यारांची तुलना करा.

१) पुराश्मयुग – 

या विभागातील सुरुवातीच्या मानवाने आघात यंत्र पद्धतीने दगडी हत्यारे बनवली. या हत्यारांच्या एकाच बाजूला धार असे. कुशल मानवाने अशा तासण्या, तोडहत्यारे बनवली. ही हत्यारे ओबडधोबड होती. परंतु नंतरच्या ताठ कण्याच्या मानवाने पसरट पात्याची कुऱ्हाड, फरशी अशी प्रमाणबद्ध हत्यारे तयार केली. शक्तिमान मानवाने लहान आकाराची हत्यारे तयार केली, तर बुद्धिमान मानवाने हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात क्रांती घडवून आणली. त्याने लांब दगडी पात्यांपासून सुरी,तासणी, टोच्या, छिन्नी अशी हत्यारे तयार केली.

२) मध्याश्मयुग – 

या युगातील मानवाने शिकारीसाठी बाणाच्या टोकासारखी दगडी सुक्ष्मास्त्रे बनवली. मासेमारीसाठी हाडांपासून गळ तयार केले. दातेरी सुरी, विळा यांसारखी अवजारे बनवली.

३) नवाश्मयुग – 

या युगातील मानव प्रगत तंत्रज्ञान अवगत असणारा होता त्याने घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे तयार केली.

पायथागोरस सिद्धांत

Leave a Comment