अन्न टिकवण्याच्या पद्धती स्वाध्याय : इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास पाठ्यपुस्तकातील अन्न टिकवण्याच्या पद्धती हा एक घटक आहे. या घटकांमध्ये अन्न टिकवण्याच्या वाळवणे, थंड करणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे यासारख्या पद्धतीची ओळख करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अन्न खराब होणे म्हणजे काय? व ते टिकवण्यासाठी कोणते उपाय करावेत याबाबतची माहिती या घटकातून मिळते. या ठिकाणी आपण अन्न टिकवण्याच्या पद्धती स्वाध्याय प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये अभ्यासणार आहोत.
अन्न टिकवण्याच्या पद्धती स्वाध्याय
१) काय करावे बरे?
अ) पापड सादळले आहेत.
उत्तर: सादळलेल्या पापडांना उन्हात वाळवण्यासाठी ठेवावे. पापड चांगल्या प्रकारे वाळल्यानंतर त्यांना हवाबंद डब्यात ठेवावेत.
आ) आंबा, कैरी, आवळा, पेरू अशी फळे, तर मटार, मेथी, कांदा, टोमॅटो अशा भाज्या ठरावीक काळात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. ते वर्षभर वापरायचे आहेत.
उत्तर:- कैरी आणि आवळा ही फळे वर्षभर वापरण्यासाठी त्यांचे लोणचे तयार करता येइल. पेरू, कैरी, आवळा यांचे सरबतही करता येईल. मटार सोलून त्याचे दाणे फ्रीज मध्ये साठवता येतात. टोमॅटो चा सॉस तयार करता येईल. कांदा टिकवून ठेवण्यासाठी त्याला चांगल्या प्रकारे सुकवून मोकळ्या हवेत ठेवता येईल.
प्र.२. जरा डोके चालवा.
१) शेवया अनेक दिवस चांगल्या राहतात ; परंतु शेवयांची खीर लवकरच खराब होते , असे का?
उत्तर:- शेवया अनेक दिवस चांगल्या राहतात; कारण त्या तयार करताना त्या जास्त काळ टिकून राहाव्यात यासाठी त्यांना कडक उन्हात वळवले जाते. त्यामुळे त्यात पाणी नसते. शेवयातील पाणी पूर्णपणे निघून गेल्याने त्या अनेक दिवस चांगल्या टिकतात. म्हणजेच या ठिकाणी वाळवणे ह्या अन्य टिकवण्याच्या पद्धतीचा वापर केलेला असतो.
परंतु शेवयाची खीर बनवताना त्यात पाणी, दुध या गोष्टींचा वापर केला जातो. त्यामुळे हे पदार्थ जास्त काळ टिकू शकत नसल्याने शेवयांची खीर लवकर खराब होते.
प्र.३. चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.
अ) पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो .
उत्तर:- हे विधान बरोबर आहे.
आ) सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले, की आपले अन्न खराब होत नाही.
उत्तर:- हे विधान चूक आहे. सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होते.
इ) उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाहीत.
उत्तर: हे विधान चूक आहे. उन्हाळ्यात वळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येतात.
ई) फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला ऊब मिळते.
उत्तर: हे विधान चूक आहे. फ्रीजमध्ये ठेवल्याने अन्नाला थंडपणा मिळतो.
प्र.४. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ) अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते ?
उत्तर:- वळवणे, थंड करणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे त्याच बरोबर विविध परीरक्षके वापरून अन्न टिकवले जाते.
आ) खराब झालेले अन्न आपण खाण्याचे का टाळतो ?
उत्तर: खराब झालेले अन्न खाल्ल्याने पोटदुखी, जुलाब, उलट्या होऊ शकतात. काही वेळेला प्रकृतीला धोका होऊ शकतो. अशा अन्नाचे पोषणमूल्य कमी झालेले असते. म्हणून आपण खराब झालेले अन्न खाण्याचे टाळतो.
इ) फळांचे मुरांबे का केले जातात ?
उत्तर:- काही फळे वर्षातून एका हंगामात येतात. फळे जास्त काळ टिकून राहत नाहीत. अशी फळे टिकवून ठेवण्यासाठी त्यांत साखरेसारखे परीक्षके घालतात त्यामुळे ती फळे मुरंब्याच्या स्वरुपात वर्षभर टिकतात. एखाद्या हंगामात येणारी फळे वर्षभर उपलब्ध व्हावीत म्हणून फळांचे मुरांबे केले जातात.
ई) परिरक्षकांचा वापर कशासाठी करतात ?
उत्तर: भाज्या, फळे यांसारखे अन्नपदार्थ पदार्थ जास्त काळापर्यंत टिकवून ठेवण्यासाठी परीरक्षकांचा वापर केला जातो. त्यामुळे हे पदार्थ अनेक दिवस टिकतात.
ए) मसाल्याचे विविध पदार्थ कोणते ? ते वनस्पतींचा कोणता भाग आहेत ?
उत्तर:- काळी मिरी, दालचिनी, लवंगा, वेलची, जायफळ, जिरे, धणे, दालचिनी असे मसाल्याचे विविध पदार्थ आहेत. यापैकी धणे, काळीमिरी या वनस्पतीच्या बिया आहेत. तमालपत्र हे झाडाचे पान आहे. लावंगा हे फुलाच्या सुकलेल्या देठापासून तयार होतात.
अन्न टिकवण्याच्या पद्धती स्वाध्याय मध्ये पाठ्य पुस्तकातील प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. आपले आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये लिहा.
Nafa tota online test for scholarship exam 2025 | नफा तोटा सराव