बदलते जीवन भाग 2 स्वाध्याय : काळानुसार भाषा, क्रीडा, नाटक, चित्रपट, वृत्तपत्रे आणि दूरदर्शन या क्षेत्रात झालेल्या बदला विषयीची माहिती बदलते जीवन भाग 2 या घटकांमध्ये दिलेली आहे. भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या निरनिराळ्या भाषा त्याचबरोबर त्याच भाषांमध्ये बोलली जाणारी बोलीभाषा या जपायला हव्यात.
या ठिकाणी आपण बदलते जीवन भाग 2 स्वाध्याय प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये अभ्यासणार आहोत.
बदलते जीवन भाग 2 स्वाध्याय
प्रश्न १) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
१) भारताने …………… च्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.
अ) सुनील गावसकर ब) कपिल देव. क) सय्यद किरमाणी ड) संदीप पाटील
उत्तर – भारताने कपिल देव च्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.
२) जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात ……………… भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे.
अ) पंजाबी ब) फ्रेंच क) इंग्रजी ड) हिंदी
उत्तर – जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात इंग्रजी भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे.
प्र २) दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा.
पुढील तक्ता पूर्ण करा. ( बदलते जीवन भाग 2 स्वाध्याय )
१) | भारतातील महत्त्वाच्या भाषा | मराठी, हिंदी, इंग्रजी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तेलगू, मणिपुरी, नेपाळी, आसामी |
२) | ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदक प्राप्त खेळाडू | पी टी उषा, सायना नेहवाल, सुशील कुमार, साक्षी मलिक, अभिनव बिंद्रा, |
३) | तुम्ही पाहिलेले बालचित्रपट | जंगल बुक, सिंहा, तारे जमीन पर, माझा छकुला |
४) | विविध बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांची नावे | दूरदर्शन, एबीपी माझा, झी न्यूज, आयबीएन लोकमत, एनडीटीवी इंडिया, स्टार माझा |
प्र.३) पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
१) भारतात सर्वत्र कमी- अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले.
उत्तर – भारतात क्रिकेट खेळाची सुरुवात इंग्रजांच्या भारतात येण्यामुळे झाली.
- 1983 मध्ये भारताची कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली आणि या खेळाला आपल्या देशामध्ये मोठी लोकप्रियता मिळाली.
- सुनील गावस्कर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला.
- दूरदर्शनच्या माध्यमातून क्रिकेटचे सामने घरबसल्या पहाता येऊ लागली. याचा परिणाम भारतात सर्वत्र क्रिकेट सामने खेळू लागले.
२) चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे.
उत्तर – चित्रपटांचे अर्थकारण बदलण्यामागे पुढील कारणे सांगता येतील.
- उद्योग, राजकारण, समाजकारण व जागतिकीकरण यांचे प्रतिबिंब चित्रपटांमध्ये दिसू लागले.
- चित्रपटाचा तीन चार तासाचा कालावधी कमी होऊन दोन ते अडीच तासावर आला.
- पूर्वीच्या काळी एकच पडदा आणि एकच चित्रपट गृह ही संकल्पना बदलून एकाच चित्रपटगृहात तीन-तीन स्क्रीन पहावयास मिळू लागल्या.
- सिनेमागृहात न जाता घरबसल्या मोबाईलवर चित्रपट पाहण्याची सुविधा निर्माण झाली.
- मनोरंजना बरोबरच चित्रपटाकडे व्यवसायिक दृष्टिकोनातून पाहण्यास सुरुवात झाली आणि हा उद्योग मोठा होऊ लागला या सर्वाचा परिणाम चित्रपटाचे अर्थकारण बदलण्यामध्ये झाला.
बदलते जीवन भाग 2 स्वाध्याय
प्र. ४) पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
१) भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे?
उत्तर – भारतामध्ये अनेक बोलीभाषा बोलल्या जातात.
- भारतामध्ये अनेक प्रादेशिक भाषा बोलल्या जातात. या भाषांबरोबरच त्या त्या भाषांच्या बोलीभाषा सुद्धा आहेत.
- जसे मराठी ही आपली प्रादेशिक भाषा असली तरी यामध्ये कोकणी, अहिराणी या बोलीभाषा सुद्धा बोलल्या जातात.
- जागतिकीकरणामुळे इंग्रजी भाषेचे महत्व वाढले आहे. त्यामुळे प्रादेशिक भाषांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
- प्रादेशिक भाषा व बोलीभाषा या आपल्या संस्कृतीचे महत्वाचे घटक आहेत. आजही त्यामध्ये अनेक साहित्य उपलब्ध आहे. या सर्व कारणासाठी भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे आवश्यक आहे.
२) वृत्त पत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा.
उत्तर – पूर्वीच्या काळी वृत्तपत्रे ही फक्त कृष्णधवल रंगात छापली जात होती. त्यामध्ये बदल होऊन आता हे वृत्तपत्रे रंगीत झाली आहेत. पूर्वी एखाद्या वृत्तपत्र ठराविक क्षेत्रासाठी प्रसिद्ध केले जायचे त्यामध्ये बदल होऊन आता राज्यस्तरावर वृत्तपत्रांची छपाई केली जाते.
वृत्तपत्रे पूर्वीप्रमाणेच कागदावर छापली जात आहेत मात्र त्याच बरोबर ती डिजिटल स्वरूपामध्ये सुद्धा आपल्या फोन लॅपटॉप वर उपलब्ध करून दिली जातात.
३) दूरदर्शन या माध्यमात कोणते बदल झाले आहेत?
उत्तर -वृत्तपत्राप्रमाणे दूरदर्शन माध्यमातून बदल झालेले आहेत.
- सुरुवातीच्या काळामध्ये दूरदर्शन कृष्णधवल स्वरूपामध्ये पहावयास मिळत होते. त्यामध्ये बदल होऊन आता दूरदर्शन वर रंगीत कार्यक्रम पहावयास मिळतात.
- सुरुवातीला मोजकेच कार्यक्रम आणि ठराविक वेळेतच दूरदर्शन चालू होते त्याचे स्वरूप बदलून आता ही सेवा 24 तास सुरू असते.
- दूरदर्शन क्षेत्रात खाजगी वाहिन्यांनी प्रवेश केल्यापासून निरनिराळ्या प्रकारच्या कार्यक्रमासाठी निरनिराळ्या वाहिन्या निर्माण झाल्या. जसे बातम्या पाहण्यासाठी बातम्या देणारी चॅनेल, चित्रपट पाहणाऱ्यांसाठी चित्रपट दाखवणारी चॅनेल्स, मालिका पाहणाऱ्यांसाठी मालिका दाखवणारे चॅनेल आणि खेळ पाहणाऱ्यांसाठी खेळ दाखवणारे चैनल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले.
- दूरदर्शन आज सर्व प्रादेशिक भाषा , हिंदी व इंग्रजी या प्रमुख भाषेमध्येही उपलब्ध आहे.
बदलते जीवन भाग 2 स्वाध्याय प्रश्नोत्तर स्वरूपात अभ्यासला आहे. बदलते जीवन भाग 2 स्वाध्याय बाबत काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा.