बदलते जीवन भाग 1 हा इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकातील घटक आहे. या घटकावर आधारित स्वाध्याय आपण अभ्यासणार आहोत.
बदलते जीवन भाग 1 स्वाध्याय
1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
1) डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात ……..…या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
अ ) चेन्नई ब) वेल्लूर क) हैदराबाद ड) मुंबई
उत्तर – डॉ . एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात वेल्लूर शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
2) ‘ जयपूर फूट ‘ चे जनक म्हणून……. यांना ओळखले जाते.
अ ) डॉ. एन. गोपीनाथ ब) डॉ. प्रमोद सेठी क) डॉ. मोहन राव ड) यापैकी नाही
उत्तर – ‘ जयपूर फूट ‘ चे जनक म्हणून डॉ. प्रमोद सेठी यांना ओळखले जाते.
2. बदलते जीवन भाग 1 पाठाच्या आधारे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
1) डॉ. एन. गोपीनाथ – ओपन हार्ट शस्त्रक्रिया
2) रामचंद्र शर्मा – कुशल कारागीर
3)डॉ. सुभाष मुखोपाध्याय – टेस्ट ट्यूब बेबी
4)डॉ. मोहन राव – पोलिओ
उत्तर – चुकीची जोडी – डॉ. मोहन राव – पोलिओ
3. बदलते जीवन भाग 1 पाठाच्या आधारे टिपा लिहा.
1) कुटुंबसंस्था
स्वातंत्र्यपूर्व कालखंडात कुटुंब संस्था ही भारतीय समाजाची एक प्रमुख ओळख होती. भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जायचा. जागतिकीकरणाच्या लाटेत विभक्त कुटुंब पद्धतीला चालना मिळाली आहे.
2) जयपूर फूट तंत्रज्ञान
१. ‘जयपुर फूट’ च्या शोधाने भारतातील दिव्यांगांचे आयुष्य बदलून गेले. 1968 पूर्वी एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि त्यात पाय जायबंदी झाला तर उर्वरित आयुष्य अडचणीत काढावे लागे. यावर उपाय म्हणून डॉ. प्रमोद सेठी यांनी कुशल कारागीर रामचंद्र शर्मा यांच्या मदतीने कृत्रिम हात, पाय, नाक, कान तयार केले.
२. जयपुर फूट तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कृत्रिम अवयवांमुळे दिव्यांग रुग्ण अनवाणी व खडबडीत जमिनीवरून चालणे, पळणे, सायकल चालवणे, शेतातील कामे करणे, झाडावर चढणे व गिर्यारोहण करणे अशी कामे सहजपणे करू शकतात.
३. कृत्रिम पायांवर बूट घालण्याची गरज नसल्याने बुटांचा खर्च वाचतो. पाय दुमडणे, मांडी घालणे हे या कृत्रिम पायांमुळे शक्य झाले. पाण्यात वा ओल्या स्थितीत काम करण्यासाठी हे पाय सोईचे आहेत.
3) शहरीकरण
१. शहरात किंवा नागरी क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित होण्याच्या प्रक्रियेस शहरीकरण म्हणतात.
२.नागरीकरण घडून येण्यास वाढीव लोकसंख्या हे महत्त्वाचे कारण आहे.
३. हवा, पाणी, समूह जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या आर्थिक व सामाजिक संस्था हे घटक नागरीकरणावर परिणाम घडवून आणतात.
४. स्वातंत्र्योत्तर भारताच्या संदर्भात नागरी लोकसंख्या वाढीची काही प्रमुख कारणे म्हणजे मृत्युदरातील घट, औद्योगीकिकरण, ग्रामीण भागातील रोजगाराची अनुपलब्धता, शहरातील रोजगार संधी व व्यापार, स्थलांतर ही आहेत.
4) बदलते आर्थिक जीवन
१. पूर्वी गावांचे जीवन आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होते. गावातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून असत.
२. शेतीतील उत्पादन कारागिरांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून वाटण्यात येत असे. आता ही परिस्थिती बदललेली आहे.
३. ग्रामीण भाग शेती व शेती निगडित जोडधंद्याशी जोडला गेला आहे तर नागरी समाज बिगर शेती उत्पादन व सेवा व्यवसायांशी जोडला आहे.
भारताची सुरक्षा व्यवस्था स्वाध्याय इयत्ता 9 वी
4) बदलते जीवन भाग 1 पाठाच्या आधारे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
1) पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.
उत्तर – १. 1978 पूर्वी भारतात दरवर्षी जन्माला आलेल्या दहा मुलांपैकी सहा मुले जन्मानंतरच्या पहिल्या वर्षातच प्राणघात संकटांना सामोरी जात होती.
२. पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, डांग्या खोकला यावर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
३. 1995 मध्ये ‘ पल्स पोलिओ ‘ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. यामुळे पोलिओ आटोक्यात आला.
2) ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली.
उत्तर – १. सार्वजनिक स्वच्छता व आरोग्याच्या सोयीकडे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये विशेष लक्ष देण्यात आले.
२. पिण्याच्या पाण्याची बारमाही सोय नसणे, स्वच्छतागृहचा अभाव, औषधोपचारांची गरज यासारख्या समस्या ग्रामीण भागामध्ये आज हे दिसून येतात.
३. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेस या योजनेअंतर्गत विविध कार्यक्रम सुरू केल्यानंतर महाराष्ट्र राज्याने या विभागात प्रभावी कामगिरी केली आहे.
४. विहिरी खणणे व नळावाटे पाणीपुरवठा करणे यासाठी ‘ ग्रामीण पाणीपुरवठा योजना ‘ सुरू करण्यात आली. 1971 अखेर 1677 छोट्या पाटबंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आली.
२) समाज कल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्दिष्ट आहे?
१. भारतात समाजामध्ये आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विषमता मोठ्या प्रमाणावर आहे. स्त्रिया, मुले, दिव्यांग, अनुसूचित जाती जमाती व अल्पसंख्यांक यांच्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर विकासाची व जागृतीची आवश्यकता आहे.
२. त्यामुळे त्यांच्यापर्यंत विकासाच्या संधी पोहोचवणे आवश्यक आहे. कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट भारताच्या संविधानातच नमूद करण्यात आले. नागरिकांना पूर्ण रोजगार, आरोग्य सुविधा, शिक्षण व विकासाची संधी उपलब्ध करून देणे हे समाज कल्याण कार्यक्रमाचे उद्दिष्टे आहे.
३) ग्रामीण विकासासंदर्भात कोणती आव्हाने आहेत?
१. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक ग्रामीण भागामध्ये राहतात. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाशिवाय देशाचा विकास होणे अशक्य आहे.
२.आर्थिक व्यवसायांचा विकास करणे, सामाजिक सोई सुविधांचा विकास करणे, सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक दृष्टिकोनात बदल घडवून आणणे ही महत्त्वाची आव्हाने ग्रामीण विकासासंदर्भात आहे.
६) सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या.
१. सहाव्या पंचवार्षिक योजनेच्या मदतीने आरोग्याच्या संदर्भात भारतात ऍलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि निसर्गोपचार पद्धतीने उपचार करण्यास मान्यता देण्यात आली.
२. आरोग्य क्षेत्रातील प्रगती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर येथे डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या खुली हृदय शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
३. डॉ. प्रमोद सेठी यांनी जयपुर फुट चा शोध लावला त्यामुळे दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव बनवण्यास सुरुवात झाली.
४. डॉ. जॉनी व डॉ. मोहनराव यांनी जीवित व्यक्तीने निदान केलेल्या मूत्रपिंडांचे रुग्णाच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण केले.
५. ‘टेस्ट ट्यूब बेबी’ यासारख्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपत्य नसणाऱ्या जोडप्यांना संतती प्राप्ती शक्य झाली.
६. पोलिओ गोवर, धनुर्वाद, घटसर्प, डांग्या खोकला इत्यादी रोगांवर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम सतत सुरू आहे. त्यामुळे या रोगांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे.