स्वच्छतेचा प्रकाश | Swachhteca prakash swadhay
इयत्ता – पाचवी.
विषय – मराठी.
प्र १) थोडक्यात उत्तरे लिहा.
१) सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले ?
सेनापती बापट यांचे स्वच्छतेचे काम गावकऱ्यांना पसंत नव्हते. असले साफसफाईचे हलके काम तात्यांनी करू नये, असे गावकऱ्यांना वाटे. सेनापती बापट गावकऱ्यांना म्हणाले -जगातील कोणतेही काम हलक्या दर्जाचे नसते. सफाईच्या कामात वाईट काहीही नाही. लोकांचे मत परिवर्तन करताना सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला सांगितले.
२) गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांना काय सांगितले?
गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांना तात्यांच्या स्वच्छता मोहिमेबद्दल सांगितले. वडिलांनी तात्यांना समजावून सांगावे अशी गावकऱ्यांनी विनवणी केली.
३) तात्यांच्या कृतीमुळे लोकांच्या कोणत्या वृत्तीत बदल होत गेला ?
सफाईचे काम हे हलके काम आहे, असे गावकरी समजत होते. सेनापती बापट यांनी सफाईचे हे व्रत न बोलता आयुष्यभर पाळले. तात्यांच्या या व्रतस्थ कृतीमुळे लोकांच्या वृत्तीत हळूहळू नकळत बदल होत गेला व लोक तात्यांच्या सफाई मोहिमेत सामील झाले.
४) थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात ?
थोर व्यक्ती स्वतः देश सेवेचे व्रत घेतात. त्याप्रमाणे स्वतः कृती करतात. त्यांच्या या आदर्शवत कृतीने ते लोकांना देशसेवेची शिकवण घालून देतात.