Skip to content

SQAAF पुरावे : मानक क्र 1 ते 10 साठी स्तर निहाय पुरावे

  • by
SQAAF पुरावे

SQAAF पुरावे : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजेच (School Quality Assessment and Assurance Framework) SQAAF चे सर्व शाळांचे स्वयं मूल्यांकन चालू आहे. यामध्ये सर्व शाळांनी आपली माहिती स्वयं मूल्यांकन करून भरावयाची आहे.

या मूल्यांकनामध्ये एकूण 128 मानके (standards) आहेत. या प्रत्येक मानकामध्ये एकूण चार स्तर देण्यात आले आहेत. पहिल्या स्तराला एक गुण, दुसऱ्या स्तराला दोन गुण, तिसऱ्या स्तराला तीन गुण आणि चौथ्या स्तराला चार गुण अशाप्रकारे त्यांचे गुणांकन आहे.

शाळेचे स्वयं मूल्यांकन करत असताना प्रत्येक मानकामध्ये ज्या स्तरांमध्ये आपली शाळा येते त्या स्तराचे पुरावे जोडणे आवश्यक आहे. या ठिकाणी आपण एक ते दहा मानकासाठी स्तर निहाय पुरावे कोणते जोडता येतील याबाबत माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी देण्यात येणारे पुरावे हे नमुना दाखल आले असून आपण आपल्या इच्छेप्रमाणे वेगवेगळे पुरावे जोडू शकता. हे फक्त नमुनादाखल SQAAF पुरावे आहेत.

SQAAF पुरावे : मानक क्र 1 ते 10

मानक क्र.मानकमानकासाठी स्तर निहाय SQAAF पुरावे
१.१.१ मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि NCERT, SCERT यांनी प्रकाशित केलेल्या संदर्भ साहित्याशी परिचित आहेत.स्तर १) NEP 2020, NCF SCF अभ्यासक्रमातील मुख्य शिफारशींची झेरॉक्स, अध्ययन निष्पत्तींचा फोटो
स्तर २) NEP 2020, NCF SCF प्रशिक्षणाचा फोटो, शिक्षण परिषदेतील फोटो
स्तर ३) अध्ययन निष्पत्ती वर आधारित पाठ टाचण
स्तर ४) NEP 2020, NCF SCF वर आधारित चर्चा करताना मुख्याध्यापक व शिक्षण यांचा फोटो, मुख्याध्यापक सभेमधील या विषयावरील नोंद असलेला फोटो
१.१.२ नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्रावर आधारित एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय योजना आहेत.स्तर १) सर्व वर्गांचे वार्षिक नियोजन फोटो, टाचण वही फोटो
स्तर २) वर्षभरासाठी राबवायचे उपक्रम, अभ्यासक्रम नियोजन यासाठी केलेल्या पालक सभेचा फोटो पाठवा किंवा सभेचे इतिवृत्त
स्तर ३) नाविन्यपूर्ण अध्ययन अध्यापन पद्धती वापरताना फोटो, समस्या सोडवणे, चिकित्सक विचार करायला लावणारे उपक्रम
स्तर ४) अध्यापन नियोजनाबाबत शिक्षक पालक सभा व इतिवृत्त
१.१.३ शाळा सक्रियपणे आपल्या शिक्षकांसाठी नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र अध्यापनात वापरण्याची क्षमता निर्माण करते तसेच केंद्र परिषदांमध्ये इतर शाळेतील शिक्षकांनीही त्या पद्धती अध्यापनासाठी उपयोगात आणाव्यात असे सुचविते.स्तर १) शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण फोटो, प्रमाणपत्र
स्तर २) मुख्याध्यापक व शिक्षक सभा फोटो, सभेत समावेशित शिक्षण, अध्ययन निष्पत्ती इत्यादी बाबत चर्चा केलेली इतिवृत्त
स्तर ३) नवीन अध्यापन पद्धती वापरताना चा फोटो, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचे टाचण्यातील नोंदी
स्तर ४) नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीवर केंद्र परिषदेमध्ये मार्गदर्शन चर्चा करताना फोटो
१.१.४ शाळा माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विषयांच्या निवडीचे स्वातंत्र्य देते.सदर मानक प्राथमिक शाळांना लागू नाही.
स्तर १) विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज
स्तर २) उपलब्ध अभ्यासक्रमाची यादी
स्तर ३) ऑनलाइन ऑफलाईन शिक्षण घेत असताना फोटो
स्तर ४) अत्याधुनिक कौशल्य विषय शिकवताना फोटो
१.२.१ शिक्षकांना विविध विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विविध अध्यापन-शिक्षण पद्धती/शिक्षणशास्त्र अवलंबण्यास सक्षम बनवणे.स्तर १) अध्यापन पद्धती विषयी प्रशिक्षण अथवा शिक्षण परिषदेतील चर्चा करत असताना फोटो
स्तर २) एकात्मिक पाठ नियोजन
स्तर ३) निरनिराळ्या अध्यापन पद्धती वापरतानाचा फोटो अथवा व्हिडिओ
व्हिडिओ
स्तर ४) अध्ययन स्तर उंचावल्याबाबत प्रगती पत्र (जुने आणि नवे)
१.२.२ शाळा सर्व वर्गांसाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्तींचा अवलंब करीत आहे.स्तर १) अध्ययन निष्पत्ती वर्गात लावलेल्या असतील त्याचा फोटो
स्तर २) टाचण वही
स्तर ३) टाचण वही , मुख्याध्यापक सभा फोटो
स्तर ४) मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केलेले अध्यापन नियोजन
१.२.३ शाळा अध्ययन अध्यापन अनुभूतीची गुणवत्ता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करते.स्तर १) मोबाईल, टीव्ही, संगणक यासारख्या साहित्याचा अध्यापनात वापर करतानाची नोंद अथवा फोटो
स्तर २) डिजिटल क्लासरूम चा फोटो
स्तर ३) ऑनलाइन टेस्ट सोडवण्यास दिलेल्या नोंदी , टेस्ट सोडल्या नंतर चा स्क्रीन शॉट
स्तर ४) विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेले चित्रपट, माहितीपत्रके इत्यादी स्वरूपातील पीडीएफ
१.२.४ शाळेत संस्थात्मक सहाध्यायी अध्ययन पद्धतीचा अवलंब केला जातो.स्तर १) विद्यार्थ्यांचे गट करून सहअद्यायामार्फत शिकवताना फोटो.
स्तर २) सह अध्यायनासाठी स्वयंप्रेरणेने गट करणे
स्तर ३) समग्र प्रगती पत्रकात सहअध्याययी मूल्यमापनाची नोंद केली असेल त्याचा फोटो
स्तर ४) समग्र प्रगती पत्रक, प्रश्नमंजुषा गटकार्य यांची नोंद अथवा फोटो
१.२.५ शाळेने पर्यावरणपूरक वृत्ती व जीवनशैलीचा अवलंब करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे.स्तर १) पर्यावरण संवर्धनासाठी मार्गदर्शन
स्तर २) पर्यावरण शिक्षणावरील कार्यशाळेचा फोटो, इको क्लब फोटो
स्तर ३) पर्यावरण विषयक चार कार्यशाळांचे फोटो
स्तर ४) पर्यावरण पूरक विद्यार्थी वृत्तीचा फोटो यामध्ये वृक्षारोपण करताना फोटो, सांडपाण्याचा योग्य वापर करणारा फोटो
१०१.३.१ शाळा विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करते.सदर मानक प्राथमिक शाळांना लागू नाही.
स्तर १) शाळेतील व्यवसायिक अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका
स्तर २) स्थानिक उद्योगांना दिलेल्या भेटींचा फोटो
स्तर ३) शाळेत शिकवल्या जाणाऱ्या हस्तकलेचा फोटो
स्तर ४) गावातील हस्तकलाकाराचे मार्गदर्शन करताना फोटो, अभियोग्यता चाचणी चा फोटो

SQAAF पुरावे

SQAAF पुरावे माहिती कशी भरावी?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *