रंग जादूचे पेटीमधले या कवितेच्या कवयित्री आहे पद्मिनी बिनीवाले. कवितेतून कवयित्रीने निसर्गाचे चित्र रंग पेटीतील रंगातून कसे काढावे याबाबत माहिती दिलेली आहे.
आकाशामध्ये आपण इंद्रधनुष्य पाहतो. या इंद्रधनुष्यातील रंगाची पेटी म्हणजे खरोखर जादूची पेटी आहे. रंगाच्या पेटीमधून इंद्रधनुष्याचे सर्व रंग असतात.
कवयित्री म्हणतात की आपण आता जादूच्या पेटीतील रंगांपासून चित्र काढूया. चित्रांमध्ये आकाश काढताना त्याला निळा रंग द्या. या निळ्या आभाळात हिरवे पोपट आणि इतर पक्षी काढा. आता आकाशाच्या खाली सुंदर डोंगर काढा. डोंगराला लालसर व काळसर रंगाने रंगवा. या डोंगरातून खळखळ वाहणारे झरे काढा.
त्यानंतर घरासाठी नीटनेटक्या विटांच्या भिंती काढा. घराला दरवाजे खिडकी काढा. घराच्या समोर हिरवळ काढा. अशाप्रकारे जादूच्या पेटीतील इंद्रधनुष्याचे रंग घेऊन सुंदर चित्र काढा आणि आनंद अशी तुमचे नाते जुळवा. अशा प्रकारचे वर्णन रंग जादूचे पेटीमधले या कवितेमध्ये आले आहे.
रंग जादूचे पेटीमधले स्वाध्याय
इयत्ता – पाचवी विषय – मराठी.
प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) हिरवे राघू कोठे उडत आहेत ?
हिरवे राघू निळ्या आभाळात उडत आहेत.
२) निर्झर कोठून व कसे वाहतात ?
निर्झर डोंगरातून खळखळ आवाज करीत निर्मळपणे वाहतात.
३) चित्रातील भिंती कशा तयार होतात ?
नेमक्या चार रेषापासून चित्रातील भिंती तयार होतात.
४) पाऊलवाटेवरून कोण येते ?
पाऊलवाटेवरून सखेसोबती येतात.
प्र २) रंग जादूचे पेटीमधले या कवितेच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
१) इंद्रधनुष्यातील रंगांना ‘जादूच्या पेटीतील रंग ‘ असे का म्हटले आहे ?
इंद्रधनुष्यात सात रंग असतात. पावसाच्या थेंबामधून प्रकाश किरण जातो, तेव्हा त्या पांढऱ्या रंगातून अनुक्रमे तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा व जांभळा असे सात रंग उमटतात. पांढऱ्या रंगात लपलेले हे सात रंग असतात, म्हणजेच ही जादू आहे. म्हणून इंद्रधनुष्यातील रंगांना ‘ जादूच्या पेटीतले रंग ‘ असे म्हटले आहे.
२) कविते दिलेल्या प्रत्येक रंगाच्या प्रत्येकी पाच – पाच गोष्टींची नावे लिहा.
१) पांढरा – पांढरी गाय, पांढरा रुमाल, पांढरा कागद, पांढरे मीठ, पांढरी भिंत.
२) निळा – निळा खडू , निळे पाकीट, निळी साडी, निळे आकाश, निळी शाई.
३) हिरवा – हिरवे पान, हिरवा शालू, हिरवी मिरची, हिरवा पोपट, हिरवे झाड.
४) लाल – लाल टोपी, लाल साडी, लाल टोमॅटो, लाल पिशवी, लाल चप्पल.
५) काळा – काळा अंधार, काळा ढग, काळी शाई, काळा शर्ट ,काळा चष्मा.
६) जांभळा – जांभळा कपडा, जांभळा शर्ट, जांभळे वांगे, जांभळे जांभूळ, जांभळा खडू.
७) रुपेरी – रुपेरी चंद्र, रुपेरी मुकुट, रुपेरी चांदणे, रुपेरी गाडी, रुपेरी वाळू.
८) तांबडा – तांबूस गाय, तांबडी माती, तांबडा रुमाल, तांबडे कपाट, तांबडा रस्सा.
प्र ३) समानार्थी शब्द लिहा.
१) आभाळ = आकाश
२) निर्झर = झरा
३) राघू = पोपट
४) घर = गृह
५) वेल = लता
प्र ४) कवितेत ‘ खिडक्यादारे ‘ हा शब्द आला आहे. याचा अर्थ खिडक्या व दारे असा होतो. यासारखे आणखी शब्द शोधा व लिहा.
१) घरदार २) साडीचोळी ३) भाजीभाकरी
४) पाटीदप्तर ५) आईवडील ६) भाऊबहीण
७) ताटवाटी ८) पानेफुले
प्र ५) कवितेत ‘ सखेसोबती ‘ हा जोडशब्द आला आहे. दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. यासारखे शब्द माहीत करून घ्या.
१) भाजीपाला २) केरकचरा ३) तांबडालाल
४) पाऊसपाणी ५) भाजीपाला ६) कामधंदा
७) मुलेबाळे ८) पालापाचोळा
good