महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा करिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत राबविणत आले आहे. या अभियानांतर्गत सर्व शाळांनी आपला सहभाग नोंदवून आपली माहिती ऑनलाईन सादर केले असून त्याचे मूल्यांकन केंद्रस्तरीय कमिटी व तालुकास्तरीय समिती यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
शाळांमधील गुणवत्ता वाढावी, शाळेमधील भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, समाजाचा शाळेतील सहभाग वाढावा व चांगले काम करणाऱ्या शाळांना प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 हे अभियान राबवण्यात येत आहे.
सर्व राज्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील सर्व शाळांनी अतिशय उत्साहाने या अभियानात सहभाग नोंदवला होता. यामधून केंद्रस्तरावर प्रत्येक शाळेचे मूल्यमापन करून केंद्रातून शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा विभागातील एक शाळा व इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा विभागातील एक शाळेची निवड करण्यात आली होती.
केंद्रामध्ये प्रथम आलेल्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा विभागातील व इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा विभागातील शाळांची तालुकास्तरीय कमिटी मार्फत तपासणी करण्यात आली. या तपासणीतील मार्गदर्शक मुद्द्यानुसार मूल्यमापन करून तालुकास्तरीय शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा यामध्ये प्रत्येकी तीन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
शाहूवाडी तालुक्यात प्रथम तीन गुणाानुक्रम खालील प्रमाणे आहेत.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 तालुकास्तर गुणानुक्रम निकाल शाहुवाडी.
अ) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा.
- विद्या मंदिर सावे -प्रथम
2. जीवन शिक्षण मंदिर साळशी- द्वितीय
3. केंद्र शाळा शित्तूर मलकापूर- तृतीय
ब) इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा.
1.दत्तसेवा माध्यमिक विद्यालय तुरुकवाडी -प्रथम
2.महात्मा गांधी विद्यालय सरूड -द्वितीय
3.संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय घुंगुर -तृतीय
सदर अभियानामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त सर्व शाळांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!