मृदा हा सजीव सृष्टीसाठी अत्यावश्यक घटक आहे. मृदेची सुपीकता टिकून ठेवणे आवश्यक आहे. इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकातील मृदा या घटकावरील स्वाध्याय Mruda Swadhyay म्हणजेच प्रश्न उत्तरे या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत.
मृदा स्वाध्याय Mruda Swadhyay
प्रश्न १) पुढील तक्ता पूर्ण करा.
घटक | मृदा निर्मितीमधील भूमिका |
मूळ खडक | मूळ खडकाच्या विदारनातून मृदेचा प्रकार ठरतो. |
प्रादेशिक हवामान | प्रादेशिक हवामानानुसार मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या मूळ खडकाच्या अपक्षालनाच्या प्रक्रियेची तीव्रता ठरते. |
सेंद्रिय खत | सेंद्रिय खताद्वारे मृदेतील सामुचा तोल राखला जातो. |
सूक्ष्मजीव | सूक्ष्म जीवाणू मार्फत मृत वनस्पती व प्राणी यांच्या विघटनाची प्रक्रिया होऊन मृदेतील ह्युमसचे प्रमाण ठरते. |
प्रश्न २) कशामुळे असे घडते?( Mruda Swadhyay )
१) सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते.
सह्याद्रीच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. या भागात हवामान दमट आहे. त्यामुळे या भागात बेसाल्ट या मूळ खडकाचे मोठ्या प्रमाणावर अपक्षालन होऊन त्यापासून जांभी मृदा तयार होते. अशा प्रकारे सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते.
२) मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते.
शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादी सेंद्रिय खतांचा शेतीसाठी वापर केला असता मृदेतील सामूचा तोल राखला जातो. सामूचा तोल राखला गेलेल्या मृदेत सूक्ष्मजीव अधिक संख्येत वाढतात. या सूक्ष्मजीवांमुळे वनस्पतींची मुळे पालापाचोळा, प्राण्यांचे मृत अवशेष इत्यादी घटकांचे विघटन होते. या विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस म्हणतात अशा प्रकारे सेंद्रिय खतांचा वापर वाढवला असता मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते.
३) विषुववृत्तीय हवामान प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते.
विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभर सुमारे 27 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान असते. या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो. या प्रदेशातील पावसाचे प्रमाण सुमारे 2000 मिमी ते ३००० हजार मिलिमीटर इतके असते. जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद गतीने होते. अशा प्रकारे जास्त तापमान व जास्त पाऊस यामुळे विषुवृत्तीय हवामान प्रदेशात सुपीक मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते.
४) मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते.
शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी जलसिंचनाचा वापर केला जातो. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन क्षारयुक्त बनते अशा प्रकारे अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेत क्षाराचे प्रमाण वाढते.
५) कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ जास्त असतो.
स्थानिक उत्पादनानुसार मानवाचा आहार निश्चित होतो. कोकणातील हवामान उष्ण व दमट असते. त्याचबरोबर कोकणात भरपूर पाऊसही पडतो, हे घटक तांदळाच्या पिकाच्या वाढीस अनुकूल ठरतात व त्यामुळे कोकणात तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यामुळे कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ जास्त असतो.
६) मृदेची धूप होते.
पावसाच्या पाण्याबरोबर मृदेचा थर वाहून जातो. वेगवान वाऱ्यामुळे ही मृदेचा थर उडून जातो. जमिनीच्या तीव्र उतारामुळे मृदेची झीज मोठ्या प्रमाणात होते. वाहते पाणी, वारा प्राकृतिक रचनेतील विविधता व हवामान इत्यादी घटकामुळे मृदेची धूप होते.
७) मृदेची अवनती होते.
शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके व जलसिंचन इत्यादी बाबींचा अतिरेकी वापर केला जातो. त्याचबरोबर खतांच्या अतिरेकी वापरामुळे मृदेतील पोषक द्रव्यही कमी होतात. अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेतील क्षारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे मृदेचे आरोग्य बिघडते अशाप्रकारे रसायने खते व जलसिंचन यांच्या अतिरेकी वापरामुळे मृदेची अवनती होते.
प्रश्न ३ ) माहिती लिहा. Mruda Swadhyay
मृदा संधारणाचे उपाय
- वृक्षारोपण हा मृदा संधारणाचा एक महत्त्वाचा उपाय आहे.
- वृक्ष लागवड केल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर नियंत्रण आणता येते. वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप त्यामुळे थांबते. वनस्पतींचे मुळे माती घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे ही मृदेची धूप थांबते.
- तीव्र उतारावर चर खोदल्याने उतारावरून वेगाने येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन जमिनीची धूप थांबते. त्याचबरोबर जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते.
- पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम – मृदासंधारणासाठी महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र विकासा अंतर्गत ग्रामीण भागातील शेतात उत्तराच्या दिशेने बांधबंधिस्ती करण्याचा कार्यक्रम राबवला आहे त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना यशस्वी झाली आहे भूजल पातळी वाढवण्याच्या या प्रयत्नाबरोबरच मृदेची धूप होणेही कमी झाले आहे.
- पाण्याचे छोटे छोटे प्रवाह बांध घालून पाणी अडवले जाते यातून जमिनीतील पाण्याची पातळी वाढते त्याचबरोबर जमिनीची होणारी धूप ही कमी होण्यास मदत होते.
- रासायनिक खतांचा वापर करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे.
२) सेंद्रिय पदार्थ
- सेंद्रिय खत तयार करण्यासाठी आवश्यक पदार्थांना सेंद्रिय पदार्थ म्हणतात.
- शेणखत गांडूळ, खत कंपोस्ट खत इत्यादी खते सेंद्रिय खते होय.
- ज्या मृदेत शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो अशा मृदेत गांडूळ सारख्या प्राण्यांचे प्रमाण जास्त असते सेंद्रिय खत निश्चित मातीतील सूक्ष्मजीव वनस्पतींची मुळे पालापाचोळा प्राण्यांचे मृता विशेष इत्यादी विघटन करणाऱ्या घटकांचे विघटन करतात व त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढते व मृदेची सुपीकता टिकून राहते त्यामुळे शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे अत्यावश्यक आहे.
३) विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची माहिती मिळण्याचे ठिकाण
- विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची माहिती महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा मृदा परीक्षण केंद्र, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे या ठिकाणी मिळू शकते.
- जिल्हा मृदा परीक्षण केंद्रात मृदेचा प्रकार, मृदेतील सुपीकता, मृदेतील ह्युमसचे प्रमाण इत्यादी बाबींचे परीक्षण केले जाते.
- मृदेच्या परीक्षणाच्या आधारे विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली जाते.
४) वनस्पती जीवनातील मृदेचे महत्त्व
- पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील महत्त्वाचा घटक म्हणजे वनस्पती होय. वनस्पतींची निर्मिती वाढ व आधार यासाठी मृदेचे असाधारण महत्त्व आहे.
- केवळ योग्य हवामान भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असल्याने वनस्पती जीवन समृद्ध होऊ शकत नाही.
- सुपीक मृदेत वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे सुपीक जमिनीत वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणावर समृद्ध होते.
- नापीक मृदेत वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्ये कमी प्रमाणात असतात. त्यामुळे नापिक जमिनीत वनस्पती जीवन कमी प्रमाणात आढळते. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेश
- मृदेची कमतरता मृदेची कमतरता असणाऱ्या प्रदेशात वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो
प्रश्न ४) मृदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण करा. Mruda Swadhyay
क्रिया | परिणाम | सुपीकता वाढते /कमी होते. |
बांधबंदिस्ती करणे. | भूजल पातळी वाढून मृदेची धूप होणे कमी होते | सुपीकता वाढते |
वृक्ष लागवड करणे | वाऱ्याचा वेग कमी झाला. | सुपीकता वाढते |
काही काळ जमीन पडीक ठेवणे. | जमिनीतील क्षारांचे प्रमाण कमी होते. | सुपीकता वाढते. |
सेंद्रिय खतांचा वापर | ह्युमसचे प्रमाण वाढले. | सुपीकता वाढते. |
उताराच्या दिशेने आडवे सर खोदणे. | पाण्याचा वेग कमी होऊन मृदेची धूप थांबते पाय जमिनीतील पाणी वाढते. | सुपीकता वाढते. |
शेतात पालापाचोळा जाळणे. | मृदेतील राखीचे प्रमाण वाढते. | सुपीकता वाढते |
जैविक पदार्थ | सूक्ष्म जीवांना पोषक ठरले. | सुपीकता वाढते |
अतिरिक्त जलसिंचन | क्षारांचे प्रमाण वाढले. | सुपीकता कमी होते. |
रासायनिक खतांचा अति वापर करणे. | मृदेतील सूक्ष्मजीव आणि पोषक घटक कमी होतात. | सुपीकता कमी होते. |