मानवाची वाटचाल हा घटक इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास या पुस्तकातील आहे. मानवाची होणारी प्रगती, त्याने लावलेले नाव नवीन शोध याविषयी माहिती दिली आहे. या ठिकाणी आंपण Manavachi vatchal swadhyay अभ्यासणार आहोत.
मानवाची वाटचाल Manavachi vatchal swadhyay
इयत्ता – पाचवी
१) लॅटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ आहे ‘ मानव ‘.
( हॅबिलिस, सेपियन, होमो )
२) शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होता.
( गुहांमध्ये , झोपड्यांत , मातीच्या घरांत )
प्र २) पुढील प्रश्नांची प्रत्येक एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) हातकुऱ्हाड कोणी बनवली ?
ताट कण्याच्या मानवाने ( होमो इरेक्टस ) हातकुऱ्हाड बनवली.
२) ‘ अनुवंशिकता ‘ म्हणजे काय ?
माणसाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणाऱ्या असतात, या बाबींना अनुवंशिकता असे म्हणतात.
प्र ३) पुढील विधानांची कारणे लिहा.
१) शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले.
शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले कारण आफ्रिका खंडातून अशिया युरोपात केलेल्या स्थलांतरामुळे पर्यावरणातील बदलांशी त्याला जुळवून घेता आले नाही. बुद्धिमान मानवाच्या समुहांबरोबरच्या संघर्षात त्याचा टिकाव लागला नाही.
२) बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता.
बुद्धिमान मानवाचे स्वर यंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. हे स्वरयंत्र ध्वनीच्या बारकाव्यांसह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते.त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती. त्याला लवचिक जिभही लाभली होती. त्यामुळे बुद्धिमान मानव ध्वनीचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता.