महाराष्ट्र राज्याची निर्मिती स्वाध्याय अभ्यासापुर्वी महाराष्ट्र राज्याची थोडक्यात माहिती घेऊया.
महाराष्ट्र राज्याची माहिती
(1) महाराष्ट्राची राजधानी – मुंबई
उपराजधानी – नागपूर.
(2) महाराष्ट्राला 𝟕𝟐𝟎 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
(3) महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई आहे. याची उंची 𝟏𝟔𝟒𝟔 मी.असून ते अहमदनगर जिल्ह्यात आहे.
(4) महाराष्ट्रातील सर्वात अलीकडे निर्माण झालेला जिल्हा –पालघर
(5) महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या – 𝟑𝟔
(6) महाराष्ट्राने भारताचा 𝟗.𝟕 टक्के भाग व्यापलेला आहे.
(7) महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
(8) महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
(9) महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.
(10) विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
(11) विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे. म्हणून गोंदियाला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते.
(12) महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
(13) महाराष्ट्र मध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत.
(14) महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
(15) महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगा दक्षिण उत्तर पसरलेल्या आहेत.
(16) महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने सर्वात जास्त आहे.
(17) महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
(18) महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
(19) महाराष्ट्रातील 𝟏𝟎𝟎 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग
(20) महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
(21) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
(22) भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
(23) भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
(24) महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
(25) महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
(26) भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
(27) महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
(28) पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
(29) गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
(30) प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती स्वाध्याय
इयत्ता आठवी

आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषावार प्रांतरचना करण्यात आली. म्हणजेच राज्यांची निर्मिती करण्यात आली. मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मात्र सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये मुंबईचा समावेश नव्हता. मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यासाठी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा उभारावा लागला. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली व महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई करण्यात आली.
प्र. १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
१) १ मे १९६० महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
(अ ) गोवा ( ब ) कर्नाटक (क) आंध्र प्रदेश ( ड ) महाराष्ट्र
२) मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्तमहाराष्ट्राचा ठराव आचार्य अत्रे यांनी मांडला.
( अ ) ग. त्र्यं. माडखोलकर ( ब ) आचार्य अत्रे ( क ) द.वा.पोतदार ( ड ) शंकरराव देव
३) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारली.
( अ ) यशवंतराव चव्हाण (ब) पृथ्वीराज चव्हाण ( क ) शंकरराव चव्हाण ( ड ) विलासराव देशमुख
प्र. २.महाराष्ट्र राज्याची निर्मिती पाठाच्या आधारे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
१) संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषावार प्रांतरचना करण्यात आली. म्हणजेच राज्यांची निर्मिती करण्यात आली. मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मात्र सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये मुंबईचा समावेश नव्हता. मुंबईचा महाराष्मट्रारात समावेश व्हावा यासाठी मराठी भाषिक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र मागणीचा प्रश्न बिकट होत गेला. राज्यभर असंतोष धुमसत होता. म्हणून संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली.
२) संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती.
प्रबोधन, केसरी, सकाळ, नवाकाळ, नवयुग, प्रभात अशा अनेक वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम केले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आचार्य अत्रेंच्या ‘ मराठा ‘ या वृत्तपत्राने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली. बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मावळा ‘ या टोपण नावाने व्यंगचित्र काढून जनआंदोलन व्यापक बनवले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख व शाहीर द.ना. गवाणकर यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. अशाप्रकारे या आंदोलनात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती.
प्र. ३. टीपा लिहा.
१) संयुक्त महाराष्ट्र परिषद
२८ जुलै रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली. या परिषदेने मराठी भाषिक प्रदेशांचा एक प्रांत करावा. मुंबई, मध्य प्रांतातील मराठी भाषिक तसेच मराठवाडा व गोमंतक या मराठी भाषिक भागाचा समावेश करावा असा ठराव संमत केला.
२) संयुक्त महाराष्ट्र समितीचे योगदान
मराठी भाषिक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र मागणीचा प्रश्न बिकट होत गेला. राज्यभर असंतोष धूमसत होता. आंदोलन महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवले. ज्यावेळी मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे स्पष्ट झाले, त्यावेळी प्रचंड जन आंदोलन उभे राहिले. या चळवळीत राज्य शासनाने केलेल्या गोळीबारात १०६ जण हुतात्मा झाले. १ नोव्हेंबर १९५६ ला द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले. त्यानंतर १९५७ साली लोकसभा, विधानसभा व मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यात संयुक्त महाराष्ट्र समितीला मोठे यश मिळाले. या निकालावरून मतदार द्विभाषिकांविरुद्ध आणि संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने आहेत, हे स्पष्ट झाले.
समितीने पसरणी घाट व कोल्हापूर जवळ तीव्र निदर्शने केली. मराठी भाषिकांच्या भावनांची आणि एकूण परिस्थितीची जाणीव पंडित नेहरूंना करून देण्यात समिती यशस्वी झाली. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र निर्मितीस अनुकूल झाले. याप्रसंगी काँग्रेसच्या अध्यक्ष इंदिरा गांधी यांनी आपले वजन संयुक्त महाराष्ट्राच्या पारड्यात टाकले.