कठीण समय येता हा इयत्ता पाचवीच्या पुस्तकातील पाठाचे लेखक मनोहर भोसले आहेत. या पाठांमध्ये लेखकाने एका शेतकऱ्यावर ओढलेल्या प्रसंगाचे वर्णन केले आहे.
कारखान्याच्या परिसरामध्ये बैलगाड्यातून मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक केली जाते. अशाच एका बैलगाडीतून एक गाडी ऊस भरून कारखान्याकडे निघाला होता. कारखान्याकडे जाताना त्याच्या गाडीवर त्याची पत्नी आणि मुलगी बसलेली असते.
कारखान्याकडे जात असताना अचानकपणे गाडीवानाच्या गाडीचे चाक निघते आणि गाडीवर बसलेली पत्नी बाजूच्या खड्ड्यांमध्ये पडते. त्याच्या पाठोपाठ तिच्या अंगावर उसाच्या मोळ्या पडू लागतात. गाडीवान कसाबसा उतरला आणि दुसऱ्या बाजूला पडलेल्या मुलीच्या जवळ गेला.
गाडी कोसळल्यामुळे बैलाच्या गळ्याला ही फास लागला होता. इतक्यात तेथे दोन तरुण येऊन त्यांनी बैलाच्या गळ्याचा फास काढला. मुलगी आणि तिचे वडील मिळून मुलीच्या आईला शोधू लागले पण ती कुठेही दिसेना. प्रसंगाचे भान राखून ते दोन तरुण शाळेकडे पळाले. कारण त्यांच्या लक्षात आले की गाडीवानाची बायको खाली खड्ड्यात पडली असावी. त्यांनी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने त्या खड्ड्यातील सर्व उसाच्या मोळ्या उचलल्या. त्याखाली सापडलेली बाई बऱ्याच वेळानंतर हालचाल करू लागली.
एका गाडीवाल्याला मुलीला व तिच्या आईला घेऊन दवाखान्यात पाठवले. गरीब गाडीवान घाबरला होता पण त्याला शिक्षक मुख्याध्यापक कारखान्याचे कामगार व इतर सर्वांनी आधार दिला. अशाप्रकारे संकटाच्या काळामध्ये सर्वजण त्या गाडीवानासाठी धावून आले. प्रसंगाच्या वेळी सर्वांनी एक दुसऱ्यांना मदत केली पाहिजे असा संदेश देणारा कठीण समय येता हा पाठ विद्यार्थ्यांना सहकार्य वृत्ती वाढवण्याची शिकवण देतो.
एकमेकांच्या ओळखीची नसणारी सर्व मंडळी वाईट प्रसंगाला त्या गाडीवानाच्या मदतीला धावले. असे अनेक प्रसंग आपल्या अवतीभवती नेहमी घडत असतात. कठीण समय येता प्रसंगाची गरज पाहून प्रत्येकाने सहकार्य करायला हवे.
कठीण समय येता स्वाध्याय
इयत्ता – पाचवी.
विषय – मराठी.
१) पहिल्यांदा बैलांचा गळफास सोडवून मग ते तरुण गाडीवानाकडे वळले.
पहिल्यांदा बैलांचा गळफास सोडवून मग ते तरुण गाडीवानाकडे वळले; कारण मुक्या जनावरांना आपल्या वेदना सांगता येत नाहीत व त्याला गळफास लागल्याने त्याचा त्यामध्ये मृत्यूही होऊ शकतो व त्यांच्यावर मजुरांचे पोट अवलंबून असते.
२) गाडीवान व्याकूळ होऊन गाडीभोवती फिरत होता.
गाडीवान व्याकुळ होऊन गाडीभोवती फिरत होता; कारण अपघातानंतर त्याच्या बायकोचा ठावठिकाणा लागत नव्हता. तो तिला शोधत होता. पण ती आजूबाजूला कोठे दिसत नसल्यामुळे तो व्याकुळ होऊन गाडीभोवती फिरत होता.
३) मोटरसायकलवरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला.
कारण एका गाडीवानाची गाडी रस्त्यावर पलटी झाली होती. गाडीवानाच्या बैलाला लागलेला फास त्या तरुणांनी काढला होता मात्र गाडीवान आणि त्याची मुलगी त्यांच्या आईला शोधत होती. त्या तरुणाच्या लक्षात आले की गाडीवानाची बायको उसाच्या ढीगाखाली सापडले असावी. ऊस उचलण्यासाठी त्या तरुणांना अनेकांच्या मदतीची गरज होती. जवळ शाळा असल्याने शाळेतील मुलांच्या मदतीने हे काम जलद गतीने करता येईल असे त्या तरुणाच्या लक्षात आले आणि म्हणून तो शाळेत जाऊन गुरुजींना भेटला.
४) गाडीवानाची मुलगी आईकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती.
गाडीवानाची मुलगी आईकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती; कारण अपघातानंतर आई खड्ड्यात निपचीत पडली होती. ती मुलीने दिलेल्या हाकेला आवाज देत नव्हती व हालचाली करत नव्हती.
प्र २) कठीण समय येता या पाठाच्या आधारे खालील प्रश्नांची तीन-चार वाक्यात उत्तरे लिहा.
१) गाडीवानाची बायको उसाच्या ढिगार्याखाली दबली गेली, हे त्या दोन तरुणांनी कसे ओळखले असेल ?
उसाच्या गाडीला अपघात होऊन गाडी एका बाजूला कलली, त्यामुळे गाडीवानाची बायको खड्ड्यात पडली. उसाच्या मोळ्या तिच्या अंगावर पडल्या. त्या दोन तरुणांनी गाडीवानाला गाडीभोवती फिरताना पाहिले. त्याची बायको कुठे दिसत नव्हती. तेव्हा तरुणांना ती बाई उसावर बसली असल्याने घसरून खड्ड्यात पडली असावी आणि त्यावरती उसाच्या मोळ्या पडून गाडीवानाची बायको ढिगाऱ्याखाली दबली गेली, हे त्या दोन तरुणांनी ओळखले.
२) शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळाकडे का निघाले ?
एका तरुणाने शाळेत जाऊन गुरुजींना अपघाताविषयी कळवले. त्याने हात जोडून गुरुजींकडे विद्यार्थ्यांची मदत मागितली. एकेका मुलाने एकेक मोळी जरी उचलली तरी बाईचा जीव वाचेल, ही त्याची विनवणी गुरुजींना कळली. धन्यवाद प्रसंगी वेळेत सहकार्य मिळाल्यास त्या बाईचा जीव वाचेल आणि हे करण्यामध्ये आपणा सर्वांची मदत होईल त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळाकडे निघाले.
३) गाडीवानाला हुंदके का आवरत नव्हते ?
अपघातामध्ये त्या दोन तरुणांनी व विद्यार्थ्यांनी बाईचा जीव वाचवला. सर्वांनी गाडीवाला मदत केली. परंतु कर्ज व उसनवारीने खचलेल्या गाडीवाला भविष्याची काळजी वाटत होती. पण जेव्हा कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला दवाखान्याच्या खर्चाची व त्याच्या कामाची हमी दिली; तेव्हा गाडीवानाच्या डोळ्यात अश्रू आले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनाने भारावल्यामुळे गाडीवानाला हुंदके आवरत नव्हते.
प्र ३) कठीण समय येता या पाठातील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा.
१) कच्चे × पक्के. ९) पूर्ण × अपूर्ण
२) वरून × खालून १०) मोठ्या × छोट्या
३) स्वच्छ × अस्वच्छ ११) खाली × वर
४) उतार × चढण १२) प्रसिद्ध × अप्रसिद्ध
५) जिवंत × मृत १३) रात्र × दिवस
६) सरळ × वाकडे १४) बाहेर × आत
७) उतरले × चढले १५) मागे × पुढे
८) आडवी × उभी १६) लवकर × उशिरा
प्र ४) पुढील शब्दांना पर्यायी मराठी शब्द लिहा.
१) बाईक – मोटार सायकल
२) प्लीज – कृपया
३) शॉक बसणे – धक्का बसणे
४) फ्रॅक्चर – हाड मोडणे
५) ॲब्युलन्स – रुग्णवाहिका
प्र ५) वाक्यात उपयोग करा.
१) प्रसंगावधान राखणे.
अपघात झाल्यानंतर लोकांनी प्रसंगावधान दाखवून बाईला वाचवले.
२) काळजात धस्स होणे.
अंगणात खेळणारा राजू दिसेनासा झाला तेव्हा आईच्या काळजात धस्स झाले.
३) भेदरलेल्या नजरेने पाहणे.
नदीला आलेला पूर लोक भेदरलेल्या नजरेने पाहत होते.
४) हायसे वाटणे.
परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण मिळालेले पाहून रमाला हायसे वाटले.
५) डोळे पाणावणे.
खूप दिवसांनी घरी परतलेल्या अजयला पाहून आईचे डोळे पाणावले.
६) प्रसंगाचे गांभीर्य जाणणे.
प्रसंगाचे गांभीर्य जाणून लोकांनी पूरग्रस्तांना योग्य ती मदत केली.
७) मार्गी लावणे.
रामरावांनी आपल्या मुलांना शिक्षण देऊन मार्गी लावले.
८) निपचीत पडले.
अपघातानंतर गाडीवानाची बायको निपचीत पडली होती.
प्र ६) कठीण समय येता या पाठातील सर्वनामे शोधा व लिहा.
१) त्याची २) ती ३) त्या ४) त्यांनी ५) तिला ६) ते
७) ज्या ८) तिच्या ९) तो १०) तुला