Skip to content

जनाई स्वाध्याय 5 वी | Janai swadhay iyatta pachavi

  • by

जनाई पाठाचे लेखक शंकर पाटील आहेत. या पाठांमध्ये ग्रामीण भाषेचे दर्शन आपणास घडते. शेतात काम करायला गेलेल्या जनाईला मोठा साप दिसतो. जनाई घाबरून घरी येते परंतु शेतात काम केले नाही तर खायला काही मिळणार नाही असा विचार करून ती धीर करून रानात जाते. त्यानंतर आपली हलखीची परिस्थिती सांगून ती सापाला विनवणी करते व आपले काम सुरू करते. अशा प्रकारचे वर्णन या पाठात आले आहे.

 जनाई स्वाध्याय

इयत्ता – पाचवी        विषय – मराठी.

जनाई
प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) जनाई शेतात कोणते काम करीत होती ?

पाटाच्या पाण्याचा प्रवाह बदलून संपूर्ण शेतातील ऊसाला पाणी देण्याचे, म्हणजेच दारे मोडण्याचे काम ती शेतात करीत होती.

२) शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जाईला काय वाटले ?

शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला विमान चालल्यासारखे वाटले.

३) जनाई का घाबरून गेली ?

   जनाईला वावरात साप दिसल्यामुळे ती घाबरून गेली.

४) जनाईला शेतात का जावे लागणार होते ?

शेतात राबल्याशिवाय जनाईचे घर चालणार नव्हते; म्हणून तिला शेतात जावे लागणार होते.

प्र २) पाठात आलेल्या गोष्टींची लेखकाने विशिष्ट शब्दात वर्णन केले आहे त्यांच्या जोड्या जुळवा.

     अ गट                      उत्तरे

१) शेंगांचे वावर –  हिरवागार शालू

२) शेंगांना आलेली पिवळी फुले – हिरव्या-पिवळ्या         रेशमी धाग्यांचा रुमाल

३) साप – काळ्या ठिपक्यांची चार वाव तुळी

४) जेवण करून पोट भरले – डर्रकन दोन ढेकर आले

५) जाड धाट –  मनगटासारखी धाट.

प्र ३) दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा व वाक्य पूर्ण करा.

१) जनाईचे अंग भगभगत होते, कारण…

अ) तिने खूप काम केले होते.

आ) उसाच्या पाल्याने तिचं अंग कापले होते.

इ) तिला झोप आली होती.

 उत्तर  –  उसाच्या पाल्याने तिचं अंग कापले होते.

२) जनाई वावरातून पळत सुटली कारण….

 अ) तिला आकाशात विमान दिसले.

आ) तिच्या अंगावर साप धावून आला.

 इ)  तिचे काम संपले.

उत्तर –  तिच्या अंगावर साप धावून आला.

प्र ४) पुढील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

१) रात्रंदिवस घाम गाळणे – 

  शेतकरी शेतात रात्रंदिवस घाम गाळतो.

२) धाबे दणाणणे – 

अचानक समोर आलेला साप पाहून रमेशचे धाबे दणाणले.

३) पोटात घाबरा पडणे – 

समोर असलेला वाघ बघून समीरच्या पोटात घाबरा पडला.

४) पायाखालची जमीन हादरणे –  

नदीला आलेला पूर बघून रामरावांच्या पायाखालची जमीन हादरली.

प्र ५) पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक २८ वरील उताऱ्यातील वाक्प्रचार म्हणी शोधा व लिहा.

वाक्प्रचार 

 १) सावध करणे.

 २) चेहरा हिरमुसणे.

 ३) चेहरा पडणे.

 ४) उपदेशाचे डोस पाजणे.

५) चार हात लांब राहणे.

६) कानाडोळा करणे.

७) जीव तुटणे.

८) जिवाची घालमेल होणे.

९) नाव ठेवणे.

म्हणी – 

१) अति तिथं माती.

२) अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.

३) अति झालं नि हसू आलं.

४) नमनाला घडाभर तेल.

शिष्यवृत्ती परीक्षा 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *