Skip to content

EVS 201 Book pdf फोनमध्ये असे करा डाऊनलोड! फक्त 2 मिनिटात.

  • by
EVS 201 book pdf

EVS 201 Book pdf : पर्यावरण शिक्षण हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल आणि मानवाचे निसर्गावर होत असलेले अतिक्रमण आणि त्याचा परिणाम समजून घेण्यासाठी पर्यावरणविषयक जाणीव जागृती होणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करून माननीय न्यायालयाने उच्च शिक्षणामध्ये पर्यावरण अभ्यास हा EVS हा विषय सक्तीचा केलेला आहे.

सर्व विद्यापीठांमध्ये पर्यावरण अभ्यास हा विषय विद्यार्थ्यांना सक्तीचा आहे. या विषयाचा एक पेपर परीक्षेसाठी असतो. सर्व विद्यापीठांप्रमाणे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातही उच्च शिक्षणामध्ये पर्यावरण शिक्षण हा विषय सक्तीचा आहे.

या विषयावर आधारित लेखी परीक्षा असली तरीही बऱ्याचदा या विषयाचे पुस्तक उपलब्ध होत नाही. हे पुस्तक फिजिकली उपलब्ध होत नसले तरी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर हे पुस्तक EVS 201 Book pdf स्वरूपामध्ये ऑनलाईन उपलब्ध आहे. EVS 201 Book pdf आपल्या फोनमध्ये पण डाऊनलोड करून घेऊन त्याचे प्रिंट काढून अभ्यास करू शकतो. त्याचबरोबर डिजिटल स्वरूपामध्ये आपण त्याचे वाचन करून अभ्यास करू शकतो. यासाठी या पोस्टमध्ये हे पुस्तक कसे डाउनलोड करायचे याविषयीची माहिती पाहूया.

EVS 201 Book pdf download process

EVS 201 Book pdf स्वरूपामध्ये डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला खालील टप्प्याप्रमाणे कृती करावी लागेल. EVS या शब्दाचा फुल फॉर्म आहे environment studies. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मध्ये या पुस्तकाचा कोड EVS 201 असा आहे.

  • EVS 201 Book pdf स्वरूपामध्ये डाऊनलोड करण्यासाठी आपल्या फोन मधील ब्राउझर ओपन करा.
  • ब्राउझर ओपन केल्यानंतर फोन मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ टाईप करा https://ycmou.digitaluniversity.ac/ आणि सर्च करा.
  • सर्च केल्यानंतर आपल्यासमोर विद्यापीठाचे मुखपृष्ठ ओपन होईल. यामध्ये डावीकडील भागात आपल्याला books: free download (pdf) या नावाची एक टॅब दिसेल. डावीकडे असलेल्या या टॅब वरती क्लिक करा.
Ycmou evs 201 book pdf
  • त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला विद्यापीठाचे निरनिराळे नऊ विभाग दिसतील. यातील humanities and social sciences या विभागावर क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्याला आपला जीमेल अकाउंट सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येईल योग्य जीमेल अकाउंट सिलेक्ट करा. आता आपल्याला या विभागातील सर्व अभ्यासक्रमाची पीडीएफ स्वरूपातील पुस्तके दिसतील. या ठिकाणी आपण कोणत्याही अभ्यासक्रमाचे पुस्तक डाऊनलोड करू शकतो. पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला आपले अभ्यासक्रम शोधावा लागेल अथवा वरील भागामध्ये जे सर्च चिन्ह दिसत आहे त्या चिन्हावर क्लिक करा.
  • येणाऱ्या सर्च बॉक्समध्ये EVS 201 टाईप करा त्यानंतर आपल्याला या पुस्तकाची पीडीएफ खालील बाजूला दिसेल.
  • त्यावर क्लिक करा. EVS 201 Book pdf मध्ये आपल्या फोनमध्ये डाऊनलोड होईल.

अशाप्रकारे आपण कोणत्याही विषयाचे पुस्तक पीडीएफ स्वरूपामध्ये विद्यापीठाच्या संकेत स्थळावरून डाऊनलोड करू शकतो. इतर पुस्तक डाऊनलोड करताना पण त्या पुस्तकाचा कोड सर्च बॉक्स मध्ये टाईप करावा. म्हणजे आपल्याला त्याच्याशी संबंधित पुस्तके दिसून येतील.

या प्रोसेस बरोबरच आपण पुढे दिलेल्या विद्यापीठाच्या डायरेक्ट डाऊनलोड लिंकवर क्लिक करून ही EVS 201 Book डाऊनलोड करता येईल. पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या पुस्तकाच्या नावावर क्लिक करा.

Download EVS 201 Book

पर्यावरण अभ्यास evs 201 book विषयी थोडक्यात माहिती

पर्यावरण अभ्यास या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुस्तकामध्ये 11 घटकांचा समावेश आहे. यामध्ये पर्यावरण संकल्पना, पर्यावरण व समाज संबंध, संरक्षण, संवर्धन, निसर्ग व पर्यावरण, नागरिकीकरण व औद्योगिकरण, जल व्यवस्थापन, जंगले व बने व जैविक विविधता यासारख्या विषयांचा समावेश आहे.

निसर्गाचा ढासळत झालेला समतोल पाहता त्याला बऱ्याच अंशी मानव जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. मानवा द्वारे होणारे निसर्गाचे हानी आणि त्याचे होणारे परिणाम याविषयीची माहिती या अभ्यासक्रमामध्ये देण्यात आलेली आहे.

नागरीकरण आणि औद्योगिकीकरण याचा परिणाम म्हणजे शहरांची संख्या वाढली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड, शेती कमी होत जाण्याचे प्रमाण, कामानिमित्त शहराकडे वाढलेला माणसांचा ओघ आणि याचा पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक माध्यम म्हणून खूप उपयुक्त आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा रिपीटर फॉर्म कसा भरावा?

या पुस्तकातील घटकांच्या मदतीने आपण पर्यावरणाविषयी अधिक माहिती मिळवू शकतो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कोणती कृती योग्य व कोणती अयोग्य याविषयीची माहिती समजण्यास मदत होईल.

पर्यावरण या अभ्यासक्रमातून पर्यावरण विषयक विविध संकल्पनांचे अध्ययन करण्यास मदत होणार आहे. तसेच जागतिक आणि स्थानिक समस्यांचा अभ्यास ही करता येणार आहे. पर्यावरण हा विषय नवीन नाही. लहानपणापासून आपण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीतून पर्यावरणाविषयी माहिती घेत असतो. मोठ्यांच्या बोलण्यातून पर्यावरणाविषयी होत चाललेले बदल आपल्याला सहजपणे लक्षात येतात. जसे की पूर्वीच्या काळामध्ये खेड्यापाड्यांमध्ये फॅन ची आवश्यकता नव्हती अथवा कोणाच्याही घरामध्ये बहुधा पंखा नव्हता. मात्र आज ती प्रत्येक घरामधील आवश्यक बाब बनली आहे.

वरील गोष्टीला कारणीभूत आहे ते हवेचे वाढत जाणारे तापमान. दिवसेंदिवस वातावरणाचे तापमान वाढत गेल्यामुळे त्याचा परिणाम मानवी जीवनावर व इतर प्राण्यांच्या जीवनावर झालेला आपणास दिसून येतो.

अशा प्रकारची सविस्तर माहिती आपण या पुस्तकाच्या माध्यमातून मिळवू शकतो. आणि त्यावर अधिक मनन v चिंतन करून हा विषय सहजपणे अभ्यासू शकतो.

EVS 201 Book डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *