Skip to content

Diwali Nibandh Marathi | माझा आवडता सण दिवाळी

  • by
Diwali Nibandh Marathi

Diwali Nibandh Marathi : भारतातील सर्वात महत्वाचा आणि आनंदाचा सण म्हणजे दिवाळी अथवा दीपावली होय. दीपावली म्हणजे दिव्यांचा सण. हिंदू धर्मामध्ये हा एक पवित्र सण मानला जातो. ज्याप्रमाणे दिवा अंधार दूर करून प्रकाश देतो त्याप्रमाणे दिवाळीही अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देते.

Diwali Nibandh Marathi

रामायणानुसार राम १४ वर्षे वनवासात गेले होते. तेथे जंगलातून रावण रामाची पत्नी सीतेचे हरण करतो. त्यानंतर राम आणि रावण युध्द होऊन रामाचा विजय होतो. अशाप्रकारे रावणावर विजय मिळवून आणि 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येला परतले. त्यानिमित्त अयोध्येतील लोकांनी राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या स्वागतासाठी रस्त्यांवर आणि घरांमध्ये दिवे लावले, त्यामुळे दिवे लावण्याची परंपरा तेव्हापासून सुरू झाली, आशी कथा आहे.

दिवाळीशी संबंधित दुसरी एक कथा म्हणजे भगवान श्रीकृष्णाने नरकासुरावर विजय मिळवला. तो दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते.

दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने होते व शेवट भाऊबीजने होतो. दिवाळीच्या मुख्य दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते.त्या वेळी लक्ष्मी फुलानी सजवून पूजा करतात. लक्ष्मीपूजनाच्या वेळी घरभर दिवे लावले जातात आणि घराच्या कानाकोपऱ्यात प्रकाश पसरतो. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते अशी आपली श्रद्धा आहे.

दिवाळीनिमित्त घरोघरी विविध प्रकारच्या मिठाई आणि फराळाचे पदार्थ तयार केले जातात. लाडू, करंजी, चकली, चिवडा, शंकरपाळी आणि विविध प्रकारच्या मिठाई बनवल्या जातात. लोक एकमेकांसोबत मिठाई वाटून आनंद घेतात. एकमेकांना फराळाला बोलावतात. याचबरोबर दिवाळीत गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे, अनाथाश्रमातील मुलांना भेटवस्तू आणि मिठाई वाटप केली जाते. त्यामुळे त्यांच्या जीवनातही प्रकाश येतो.

दिवाळीत दिवे लावणे व फटाके फोडण्याची परंपरा आहे. फटाक्यांचा आवाज आणि रोषणाईने अंधार दूर करून वातावरण आनंदी बनवते. मात्र सध्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून फटाके फोडण्याच्या घटना कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फटक्यामुळे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होते. लोक आजारी पडण्याचे प्रमाण वाढत असल्याने काही प्रमाणात फटके फोडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आनंदाबरोबर पर्यावरणाचा विचार करणेही आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

Diwali Nibandh Marathi

दिवाळीचा सणात भारतीय बाजारपेठा फुलून जातात. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. त्यामुळे दिवाळी सण भारतीय अर्थव्यवस्थेस अधिक बळकट करतो. दागिने,कपडे, भेट वस्तू, खाद्य पदार्थ, पणत्या, आकाश कंदील, साबण इत्यादी वस्तूंची खरेदी विक्रीचा व्यवसाय वाढतो. छोटे मोठे व्यापारी यांचा व्यवसाय वाढतो. कारागिरांना काम मिळते. कामगारांना बोनस मिळतो.

दिवाळी कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांसोबत दिवाळी साजरी केली जाते. त्यानिमित्ताने सार्वजन एकत्र येऊन एकमेकांना भेटतात. एकमेकासोबत वेळ घालवतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकीची भावना वाढते. परस्परातील नाती घट्ट होतात. नवीन नात्यांची ओळख लहान मुलांना होते. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असते म्हणून दिवाळी हा सण मला खूप खूप आवडतो.

Diwali Nibandh Marathi

राखी पौर्णिमा एक सण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *