Skip to content

25. ढोल स्वाध्याय इयत्ता पाचवी| Dhol swadhay

  • by
ढोल स्वाध्याय

ढोल स्वाध्याय : ढोल हा इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील संजय लोहकरे लिखित पाठ आहे. सातपुड्याच्या परिसरातील आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरेची माहिती या पाठात देण्यात आले आहे. सातपुडा पर्वतरांगा मधील परिसराचे निसर्ग रम्य वातावरण, तेथील होळीचा सण यांचे वर्णन पाठात आहे.

ढोल स्वाध्याय

प्रश्न १) एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) आदिवासींच्या होळीला किती वर्षाचा इतिहास आहे?

उत्तर – आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षाचा इतिहास आहे.

आ) अख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात कोण प्रसिद्ध होता?

उत्तर – अख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात आमश्या डोहल्या प्रसिद्ध होता.

इ) आमश्या डोहल्याने कोणती शपथ घेतली?

उत्तर – यंदाच्या होळीत आपल्या ढोलाच्या आवाजाने अख्खा सातपुडा दणाणून सोडायचा अशी शपथ आमश्या डोहल्याने घेतली.

ढोल स्वाध्याय इयत्ता पाचवी

प्रश्न 2) तीन चार वाक्यात उत्तरे लिहा.

अ) सातपुड्याच्या परिसरातील निसर्गाचे वर्णन करा.

उत्तर सातपुडा डोंगराचा परिसर म्हणजे एक निसर्गरम्य ठिकाण होय. कंदमुळे, फळे व पानाफुलांनी बहरलेले घनदाट जंगलच. या परिसरात पहावयास मिळते विविध प्रकारच्या वनस्पती. यामुळे हा परिसर हिरवागार व दाट झाडीचा असा बनला आहे.

आ) आमश्याचे ढोल वाजवण्याचे वैशिष्ट्य काय होते?

उत्तर-आमश्या एकदा ढोल वाजू लागला, की पाड्या पाड्यावरची माणसे ढोलाच्या दिशेने नाचत नाचत येत असत. न थकता तो रात्र रात्र ढोल वाजवण्यात पटाईत होता. हे आमश्या चे ढोल वाजवण्याचे वैशिष्ट्य होते.

इ) ढोल कसा तयार करतात?

उत्तर- ढोलाचा सांगाडा हा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केला जातो. त्यावर कातडी चढवतात. कोणी ढोलाची पाने बसवतात तर कोणी दोऱ्या आवळतात. अशाप्रकारे एकमेकांच्या सहकार्याने ढोल तयार करतात.

ई) ‘ढोलाच्या रूपाने आमश्या आपल्यातच राहील’,हे पटवून देण्यासाठी भगताने काय सांगितले?

उत्तर – आमश्या मरण पावल्यानंतर त्याला सागाच्या झाडाखाली गाडले जाईल. आमच्या सध्या मातीचा; त्याची मातीच होईल. त्या मातीत सागाची बी रुजेल. त्यापासून सागाचे मोठे झाड तयार होईल. त्याचा पुन्हा कोणीतरी ढोल बनवेल. तो ढोल वाजू लागला की त्या ढोलाच्या रूपाने आमच्या आपल्यातच राहील अशा प्रकारे भगताने पटवून दिले.

प्र ३) खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा.

अ) आसमंतात घुमणे – दिंडीतून जाताना वारकऱ्यांचा आवाज आसमंतात घुमला.

आ) पटाईत असणे– राजू कुस्ती खेळण्यात पटाईत होता.

इ) दणाणून सोडणे– निवडणुकीतील विजयानंतर सारा परिसर घोषणांनी दणाणून सोडला.

ई) शपथ घेणे – मनीषाने यापुढे खोटे न बोलण्याची शपथ घेतली.

उ) रिंगण धरणे– वारकऱ्यांनी दिंडीमध्ये रिंगण धरले.

ढोल स्वाध्याय इयत्ता पाचवी

23. संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध स्वाध्याय इयत्ता ५ वी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *