Skip to content

14.आतां उजाडेल स्वाध्याय सहावी | Ata ujadel Swadhyay

14.आतां उजाडेल स्वाध्याय सहावी

आतां उजाडेल स्वाध्याय: आता उजाडेल ही कविता कवी मंगेश पाडगावकर यांच्या जिप्सी या कवितासंग्रहातून घेतलेली आहे. सूर्य उगवण्याच्या वेळी निसर्गात होणारे बदल घडणाऱ्या घटना यांचे सुंदर चित्र कवीने या कवितेमध्ये केलेले आहे.

सकाळचे आनंददायक वातावरण या कवितेतून मांडले आहे.या ठिकाणी आपण आतां उजाडेल स्वाध्याय प्रश्न उत्तर स्वरूपात अभ्यासणार आहोत.

14.आतां उजाडेल स्वाध्याय सहावी

प्र. १) दोन- तीन वाक्यात उत्तरे लिहा.

अ) किरणांची कलाबूत कधी मोहरेल असे कवीला वाटते?

उत्तर:- पहाट झाल्यानंतर जेव्हा खिन्न अंधार ओसरेल तेव्हा उगवत्या किरणांची कलाबूत मोहरेल असे कवीला वाटते.

आ) आनंदाने मृदू गळ्यात कोण गाणार आहेत?

उत्तर:- आनंदाने मृदू गळ्यात पक्षी गाणार आहेत.

इ) पानांवर दहिंवर केव्हा हसेल?

उत्तर:- हिरवेपणात वारा हसेल, तेव्हा गहिवरलेल्या प्रकाशात पानांवर दहींवर हसेल.

ई) गारवा कशामुळे थरारेल?

उत्तर:- सकाळ होताच जेव्हा पारिजात आपल्या फुलांची उधळण करील तेव्हा त्या फुलांच्या सुगंधामामुळे गारवा थरारेल.

उ) प्रकाशाचे महादान कोणते?

उत्तर:- उजाडल्यामुळे दाही दिशा उजळतील. सगळीकडे प्रकाश पसरेल हेच प्रकाशाचे महादान असेल.

ऊ) उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे?

उत्तर:- उजाडल्यामुळे अंधाराचे भय संपणार आहे.

प्र.२) थोडक्यात उत्तरे लिहा. आतां उजाडेल स्वाध्याय

अ) उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते?

  • उजाडल्यामुळे रात्रीचा काळा अंधार नाहीसा होऊन जाईल आणि सगळीकडे किरणांची कलाबूत मोहरेल.
  • मृदू मधुर गळ्यांत पक्षी गाऊ लागतील.
  • गहिवरलेल्या प्रकाशात दवं मिसळेल.
  • उजाडताच पारिजातक फुलांची उधळण करेल.
  • दाही दिशा प्रकाशमान होऊन जातील , अंधाराची भीती नाहीशी होईल. इत्यादी घटना उजाडल्यामुळे निसर्गात होतील असे कवीला वाटते.

आ) ‘पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल’ या ओळीचा अर्थ समजावून घेऊन कवी असे का म्हणतात ते सांगा.

उत्तर:- रात्रीच्या खिन्न अंधारामुळे भीती वाटते. पण सकाळी उजाडल्याने सारा अंधार ओसरून सर्व दिशांमध्ये प्रकाश परसतो आणि अंधाराची भीती नाहीशी होते. म्हणून प्रकाशाचे वरदान हे आपल्यासाठी एक आशीर्वादच आहे, असे कवी म्हणतात.

नफा तोटा स्वाध्याय

प्र ३) खालील ओळी वाचा. त्याचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.

अ) खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार.

उत्तर: उदासवाने दुखी मन म्हणजे खिन्न आंधळा अंधार होय. हा गडद अंधार सूर्याच्या प्रकाशाने ओसरून जाईल व मनात नवी अशा निर्माण होईल.

आ) आनंदात पारिजात उधळील बरसात.

उत्तर:- पारिजातकाच्या झाडावर सुगंधी फुले उमलतात. पारिजातकाच्या झाडाखाली फुलांचा सडा पडतो. जणू काही पहाटेच्या आनंदात पारिजातक फुलांचा वर्षाव करते.

इ) मृदु गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल.

उत्तर-: पाहाट होताच पाखरे आनंदाने किलबिल करू लागतात. ती त्यांच्या मृदू मधुर गळ्यांतून जणू गाणेच गातात असे कवीला वाटते.

ई) प्रकाशाचे महादान कणाकणांत स्फुरेल

उत्तर:- पाहाट झाल्यावर सूर्याची किरणे सर्वत्र पसरून दिशा प्रकाशमान करतात. ये आभाळ प्रकाशाने भरून जाते. सूर्याने दिलेले हे महान असे दान आहे असे कवीला वाटते.

प्र. ४) ‘आतां उजाडेल !’ या कवितेतील एक कडवे दिले आहे ते वाचा. ‘आता पाऊस पडेल!’ व त्यानंतर काय घडेल याची कल्पना करा. कवितेच्या चार ओळी लिहा. 14.आतां उजाडेल स्वाध्याय सहावी

आतां उजाडेल!

खिन्न आंधळा अंधार

आतां ओसरेल पार

लहरींत किरणांची कलाबूत मोहरेल

आतां उजाडेल!

उत्तर:- आता पाऊस पडेल!

जमीन ओलीचिंब होईल

हवेत गारवा पसरेल

झाडे, पक्षी, प्राणी, शेतकरी सुखावेल

आता पाऊस पडेल

प्र ५. या कवितेत शब्दांना लावलेली विशेषणे लिहा.

अ) शुभ्र आनंदाच्या लाटा

आ) निळे आकाश

इ) मृदू गळ्यांत

ई) गोड, कोवळा गारवा

प्रश्न ६) दान -महादान यासारखे तुम्हाला माहीत असलेले शब्द लिहा.

  • पुरुष – महापुरुष
  • मानव – महामानव
  • राष्ट्र- महाराष्ट्र
  • राज – महाराज

14.आतां उजाडेल स्वाध्याय हा इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना सध्या सोडवताना मार्गदर्शक ठरेल अशी आशा वाटते. या प्रश्न व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असल्यास आपण कमेंट मध्ये लिहू शकता.

2 thoughts on “14.आतां उजाडेल स्वाध्याय सहावी | Ata ujadel Swadhyay”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *