Skip to content

स्वराज्याचे तोरण बांधले स्वाध्याय इयत्ता 4 थी

स्वराज्याचे तोरण बांधले स्वाध्याय

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ मधील स्वराज्याचे तोरण बांधले स्वाध्याय आपण पाहणार आहोत. शिवरायांनी आपल्या स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. आणि त्यानंतर त्यांनी स्वराज्याचे घेण्यासाठी सर्वात प्रथम तोरणा किल्ल्याची निवड केली. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह तोरणा किल्ला जिंकला. स्वराज्याचे तोरण बांधले या पाठावर आधारित काही प्रश्न व उत्तरे दिली आहेत.

स्वराज्याचे तोरण बांधले स्वाध्याय

१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

अ ) शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीर होती.

( इंदापूर, सासवड, वेल्हे )

आ ) शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे ठरवले.

( सिंहगड, शिवनेरी, तोरणा )

इ ) स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही सजली.

( राजगड, रायगड, प्रतापगड )

२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ ) महाराष्ट्रावर कोणत्या चार सत्ता हुकमत गाजवत होत्या?

दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा चार सत्ता महाराष्ट्रावर हुकमत गाजवत होत्या.

आ ) शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या ?

शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या.

इ ) शिवरायांनी आदिलशाहाला कोणते उत्तर पाठवले ?

‘ जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला. आदिलशाहाच्या हितासाठीच किल्ला घेतला. यात दुसरा काहीही हेतू नाही.’ असे शिवरायांनी आदिलशाहाला धूर्तपणाचे उत्तर पाठवले.

३. कारणे लिहा.

अ ) स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली.

तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यांपुढे होता. पुण्याच्या नैऋत्येस चौसष्ट किलोमीटरवर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे. डोंगरी किल्लात तोरणा किल्ला मोठा बाका. त्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या. एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची. माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिक रित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी. झुंजार माची नावाप्रमाणेच झुंजार आहे, लढाऊ आहे. किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे. ती आहे झुंजार माचीवरून. ही वाट अतिशय अवघड आहे. वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार ! महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो. म्हणून स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली. आणि स्वराज्याचे तोरण बांधले.

आ ) तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या.

मोहरांनी गच्च भरलेल्या चार घागरी, काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या.कामगारांना आनंदी आनंद झाला. ‘शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिनेच धन दिले’, असे जो तो म्हणू लागला. कामगारांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या.

प्रतापगडावरील पराक्रम स्वाध्याय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *