शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र या पाठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी महाराष्ट्रावर असलेल्या सत्तांची माहिती दिली आहे. यामध्ये अहमदनगरचा निजामशहा, विजापूरचा आदिलशहा यांची सत्ता होती. त्या दोघांच्या लढाई मध्ये जनतेचे खूप हाल होत होते.
१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.
(अ ) शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता.
( प्राचीन, मध्य,आधुनिक )
( आ ) शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले.
( महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात, उत्तर प्रदेशात )
२.’ अ ‘ गट व ‘ ब ‘ गट यांच्या जोड्या लावा.
‘ अ ‘ गट उत्तरे
( अ ) विजयनगरचा सम्राट – कृष्णदेवराय
( आ) अहमदनगरचा सुलतान – निजामशाहा
( इ ) विजापूरचा सुलतान – आदिलशाहा
३. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
( अ ) प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा.
शिवाजी महाराज, सम्राट अकबर, सम्राट कृष्णदेवराय हे प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणारे राजे आहेत.
( आ) शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले ?
रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य शिवाजी महाराजांच्या हाती घेतले.
( इ ) वेगळा शब्द ओळखा.
( अ ) स्वराज्य, गुलामगिरी, स्वातंत्र्य.
उत्तर – गुलामगिरी
( आ) रयत, प्रजा,राजा
उत्तर – राजा