इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील माहेर ही कविता सदाशिव माळी या कवींनी लिहिली आहे. यामध्ये कवींनी सासरी जात्यावर दळण दळणाऱ्या स्त्री च्या मनातील भावना व्यक्त केली आहे. चिकन माती पाहून तिच्या मनामध्ये होणाऱ्या कल्पना मांडल्या आहेत.
यामध्ये प्रथम ती चिकन मातीचा ओटा तयार करणार आहे. त्या ओट्यावर जाते मांडणार आहे ,जात्यावर सोजी दळणार आहे, सोजीचे लाडू तयार करणार आहे, लाडू शेल्यात बांधणार आहे, भाऊराया आपल्यासाठी रथ घेऊन येईल ,त्या रथाला नंदी जुंपीणार आहे, रथातून माहेराला जाणार आहे, तिथे गेल्यावर दंगामस्ती करणार आहे.
माहेर स्वाध्याय
प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे ?
कवितेत ‘ तापी ‘ नदीचा उल्लेख केलेला आहे.
२) या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता ?
या नदीकाठची चिकण माती आहे.
३) कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे ?
कवितेतील स्त्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे.
४) कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे ?
कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन माहेरी जाणार आहे.
प्र २) काय ते लिहा.
१) ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती – चिकण
२) लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ – सोजीचे
३) बहिणीला नेण्यासाठी भाऊ आणणार असलेले वाहन – रथ
प्र ३) चिकन माती बघून कवितेतील माहेरवाशिणीला एकातून एक कल्पना सुचत गेल्या. त्या कल्पना तुमच्या शब्दात क्रमाने सांगा.
चिकन मातीचा ओटा तयार करणे , ओट्यावर जाते मांडणे ,जात्यावर सोजी दळणे, सोजीचे लाडू तयार करणे , लाडू शेल्यात बांधणे, भाऊराया येईल ,आपल्यासाठी रथ आणील, रथाला नंदी जुंपीन, रथातून माहेराला जाईन, माहेरी दंगामस्ती करीन.
प्र ४) ‘ नंदी ‘ या शब्दातील ‘ न ‘ या अक्षरावरील अनुस्वार लिहिताना , वाचताना विसरला तर ‘ नदी ‘ हा वेगळा शब्द तयार होतो. या शब्दाचा अर्थ मूळ शब्दापेक्षा वेगळा होतो.
उदा. नंदी – नदी
१) कंथा – गोधडी कथा – गोष्ट
२) मंद – हळू. मद – गर्व
३) कंप – थरथरणे कप – चहा पिण्याचे साधन
४) दंगा – मस्ती दगा – फसवणूक
५) जंग – लढाई जग – दुनिया
६) गंड – गर्व गड – किल्ला
७) खोंड – तरुण बैल खोड – दोष, झाडाचा बुंधा
८) कुंडी – मातीचे भांडे कुडी – शरीर
अरण्यलिपी स्वाध्याय इयत्ता 5 वी
सर्वनाम- नामाबद्दल येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात.
उदा- त्याच्या, तो, तिला, तू, मी, त्याला