Skip to content

मराठा सरदार-भोसल्यांचे कर्तबगार घराणे स्वाध्याय इयत्ता 4 थी

  • by
मराठा सरदार-भोसल्यांचे कर्तबगार घराणे स्वाध्याय

प्र १. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

अ ) महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळ भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले.

( मोरे , घोरपडे , भोसले )

आ ) बाबाजी राजे भोसल्यांना मालोजी व विठोजी ही दोन मुले होती.

( विठोजी , शहाजी , शरीफजी )

इ ) निजामशाहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता.

( मलिक अंबर , फत्तेखान , शरीफजी )

प्र २.नातेसंबंध लिहा.

अ ) मालोजीराजे – विठोजी राजे भाऊ – भाऊ

आ ) शहाजीराजे – लखोजीराव जाधव जावई – सासरे

इ ) शहाजीराजे – शरीफजी भाऊ – भाऊ

ई ) बाबाजीराजे – विठोजीराजे. पिता – पुत्र

प्र ३. जोड्या लावा.

‘अ ‘ गट उत्तरे

अ ) सिंदखेडचे जाधव

आ ) फलटणचे निंबाळकर

इ ) जावळीचे मोरे

ई ) मुधोळचे घोरपडे

प्र ४. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ ) घृष्णेश्वराच्या मंदिराचा जिर्णोद्धार कोणी केला ?

मालोजीराजे भोसले यांनी घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

आ) निजामशाहाने मालोजीराजांना कोणत्या परगण्यांची जहागीर दिली ?

निजामशाहाने मालोजीराजांना पुणे व सुपे या परगण्यांची जहागीर दिली.

इ ) निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले?

निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले.

ई ) आदिलशाहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला ?

आदिलशाहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला.

ई ) शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले ?

निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले, तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *