Skip to content

गड आला पण सिंह गेला स्वाध्याय 4 थी | gad ala pan sinh gela

गड आला पण सिंह गेला स्वाध्याय

गड आला पण सिंह गेला इयत्ता चौथीच्या इतिहास पाठ्यपुस्तकातील हा पाठ आहे. तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ल्यावरती धारातीर्थी पडल्याची बातमी शिवाजी महाराजांना जेव्हा कळते तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात, “गड आला पण सिंह गेला.”

तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेले होते. कोंढाणा किल्ला स्वराज्यात यावा अशी इच्छा मांसाहेबांनी व्यक्त केली होती.

त्यामुळे शिवाजी महाराज कोंढाणा किल्ल्याच्या स्वारीवर जाणार होते. हे ऐकताच तानाजी मालुसरे यांनी या स्वारीवर मी जाणार असल्याचे सांगितले. ‘आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे’ अशाप्रकारे त्यांनी लग्न पुढे ढकलून कोंढाणा किल्ला आधी स्वराज्यात घेण्याची ठरवले.

या कोंढाण्यावरील लढाईत तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले, या घटनेचे वर्णन करणारा गड आला पण सिंह गेला हा पाठ आहे.

गड आला पण सिंह गेला स्वाध्याय

प्र १) अचूक पर्याय शोधा.

१) तानाजी हा कोकणातील ……. या गावचा राहणारा होता. ( महाड, चिपळूण, उमरठे, रत्नागिरी )

उत्तर – तानाजी हा कोकणातील उमरठे या गावचा राहणारा होता.

२) जयसिंगाने नेमलेला उदेभान ……… या किल्ल्याचा किल्लेदार होता. ( पुरंदर, कोंढाणा, रायगड, प्रतापगड )

उत्तर – जयसिंगाने नेमलेला उदेभान कोंढाणा या किल्ल्याचा किल्लेदार होता.

३) तानाजीच्या भावाचे नाव ……… हे होते. ( रायबा, सूर्याजी, मुरारबाजी, फिरंगोजी )

उत्तर – तानाजीच्या भावाचे नाव सूर्याजी हे होते.

शाहिस्तेखानाची फजिती स्वाध्याय

प्र २) प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता ?कोंढाणा किल्ला उदेभान या रजपूत किल्लेदाराच्या ताब्यात होता.

२) कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या?

कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, “शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही. तो परत घे.”

३) ‘आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे ‘ असे कोण म्हणाले?

उत्तर – ‘आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे ‘ असे तानाजी म्हणाले.

प्र ३) दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

१) शेलारमामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय काय म्हणाले ?

शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय म्हणाले, ” शेलारमामा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत.”

२) सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला ?

सिंहगडावर सूर्याची मावळ्यांना म्हणाला, ” अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे. तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता ? मागे फिरा. कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या टाकून मरा, नाही तर शत्रूवर तुटून पडा.”

1 thought on “गड आला पण सिंह गेला स्वाध्याय 4 थी | gad ala pan sinh gela”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *