प्र १) पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.
१) नदीकाठच्या संस्कृती –
१) होयांग हो – चीन
२) सिंधू – भारत
३) नाईल – इजिप्त
४) टायग्रीस व युफ्रेटिस – मेसोपोटेमिया
प्र २) पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) नवाश्मयुगीन संस्कृतींचा विकास कोठे झाला ?
नवाश्मयुगीन संस्कृतींचा विकास नद्यांच्या काठी झाला.
२) हडप्पा संस्कृतीचे कारागीर कोणत्या वस्तू बनवण्यात कुशल होते ?
हडप्पा संस्कृतीचे कारागीर विविध प्रकारच्या रंगीत दगडांपासून बनवलेले मणी आणि कासे या धातूच्या वस्तू बनवण्यात कुशल होते.
प्र ३) पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
१) नाईल नदीच्या काठची जमीन अत्यंत सुपीक का झाली ?
नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. हा पूर नदीच्या काठावर गाळ आणून टाकतो. हजारो वर्षांपासून वाहून आलेल्या गाळामुळे नाईल नदीच्या काठची जमीन अत्यंत सुपीक झाली आहे.
२) हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना कोणत्या प्रकारची होती ?
हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना पुढील प्रकारची होती.
नगरातील रस्ते एकमेकांना समांतर आणि काटकोनात छेदणारे होते. काटकोनात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागी प्रशस्त घरे, धान्याची कोठारे बांधलेली असत. सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे असत. घरोघरी स्नानगृहे, विहिरी, व शौचालये होती. नगराचे दोन ते चार स्वतंत्र विभाग असत व प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे.