Skip to content

Utkranti swadhay pachavi | उत्क्रांती स्वाध्याय

  • by
उत्क्रांती स्वाध्याय

 उत्क्रांती स्वाध्याय

इयत्ता – पाचवी.

प्र १) रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा.

१) उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडली.

( चार्ल्स डार्विन, विलार्ड लिबी, लुई लिकी )

२) पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी होय.

( जलचर, उभयचर, सस्तन  )

प्र २) पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात ?

पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर असे म्हणतात.

२) आदिमानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली?

आदिमानवाची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात अस्तित्वात आली.

प्र ३) पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

१) मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते.

एखाद्या विशिष्ट प्राणी जातीमधील प्राण्यांच्या मूळ शरीररचनेत पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात काही अंतर्गत बदल घडून येतात. कालांतराने हे बदल त्या प्राणीजातीचे आनुवांशिक रूप धारण करतात. अशा रितीने मूळ प्राणीजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते.

२) डायनोसॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या.

बदलत्या पर्यावरणाशी जुळवून न घेणाऱ्या प्रजाती कालांतराने नष्ट होतात. काही वेळा अचानकपणे निसर्गात मोठे संकट येते. काही वेळा पर्यावरणात आकस्मिक बदल होतात. इत्यादी कारणांमुळे डायनोसॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *