शेकडेवारी हा गणितामधील एक महत्त्वाचा घटक आहे. प्राथमिक शिक्षणापासून ते निरनिराळ्या स्पर्धा परीक्षांपर्यंत या विषयावर अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात. या पोस्टमध्ये आपण गुणांची टक्केवारी या शेकडेवारीतील एका भागाची माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर या घटकावर आधारित ऑनलाइन चाचणी ही याच पोस्टमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गुणांची टक्केवारी ( शेकडेवारी )
गुणांच्या टक्केवारी मध्ये एकूण तीन प्रकारची उदाहरणे असतात. खालील तीन प्रकारात उदाहरणे विचारतात.
- एकूण गुण आणि मिळालेले गुण दिल्यानंतर टक्केवारी काढणे.
- शेकडा गुण म्हणजे टक्केवारी आणि एकूण गुण दिल्यानंतर मिळालेले गुण काढणे.
- शेकडा गुण आणि मिळालेले गुण दिल्यानंतर एकूण गुण काढणे.
शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका
शेकडा गुण काढणे व्हिडीओ…
उदा – 1) विशालला 700 पैकी 525 गुण मिळाले तर त्याला शेकडा किती गुण मिळाले?
2) पियुषला परीक्षेत 86% गुण मिळाले,जर परीक्षा 750 गुणांची असेल तर त्याला किती गुण मिळाले?
३) वेदिका परीक्षेत 552 गुण मिळवून उत्तीर्ण झाली. जर तिला परीक्षेत 92% गुण मिळाले असतील, तर ती परीक्षा किती गुणांची होती?
वरील उदाहरणांचे स्पष्टीकरण पाहण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.
शेकडा गुण या घटका वरील व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व प्रकारच्या उदाहरणाच्या सरावासाठी खाली दिलेले ऑनलाईन प्रश्न सोडवा. प्रश्न सोडवून submit केल्यानंतर आपल्यासमोर आपला निकाल दिसेल. चुकलेल्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर पाहण्यासाठी व उत्तराची स्पष्टीकरणसह संपूर्ण PDF मिळवण्यासाठी त्याखाली दिलेल्या whats app Group ला जॉईन होऊ शकता. या ग्रुपवर शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षे संदर्भात अशाच घटक निहाय सराव प्रश्नपत्रिका मोफत देण्यात येतील.