निवारा ते गाव वसाहती
इयत्ता पाचवी
विषय – परिसर अभ्यास २
१) बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता ?
बुद्धिमान मानवाचा रानडुक्कर, हरिण, मेंढी, डोंगरी शेळी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता.
२) नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते ?
शेतीची सुरुवात हे नावाश्मयुग संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.
प्र २) पुढील विधानांची कारणे लिहा.
१) मध्याश्मयुगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता.
मध्याश्म युगात सर्वत्र पर्यावरणात बदल होऊ लागला. अति शीत हवामानात बदल होऊन ते उबदार होऊ लागले होते. या बदlला मुळे मोठे प्राणी नष्ट होऊ लागल्यामुळे मानव मासेमारी व छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर भर देऊ लागला. या कारणांमुळे मध्याश्मयुगात मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता.
२) मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला.
भटकंती करणाऱ्या बुद्धिमान मानवाचे समूह बदलत्या हवामानानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वस्ती करून राहत असत. हवामान बदलानुसार धान्याची कापणी करणे, फळे- कंदमुळे गोळा करणे ही कामे ते करीत असत. मासे कोणत्या हंगामात मोठ्या प्रमाणात मिळतात, अधिक शिकार कोणत्या ठिकाणी मिळेल यांचे ते निरीक्षण करीत असत. अशा कारणांमुळे मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला.
प्र ३) नवाश्मयुगीन खेडे आणि आधुनिक खेडे यांची तुलना करा.
नवाश्मयुगीन खेडे –
१) नवाश्मयुगात गाव- वसाहती व्यवस्थापनास सुरुवात झाली होती.
२) या काळात खेड्यातील मानव प्रामुख्याने पशुपालन व शेती करू लागला होता.
३) या काळा शेतीची अवजारे प्राथमिक स्वरूपाची होती.
४) शेतीची प्रारंभिक अवस्था असल्यामुळे पाणी सिंचनाची व्यवस्था, धान्याचे प्रकार मर्यादित होते.
आधुनिक खेडे –
१) आधुनिक काळात गाव- वसाहती स्थापन होऊन तेथे अनेक पिढ्या स्थिरावल्या आहेत.
२) आधुनिक काळातील खेड्यांत शेतीखेरीज अनेक पूरक उद्योगधंदे सुरू झाले आहेत.
३) आधुनिक खेड्यात प्रगत अवजारे वापरून शेती केली जात आहे.
४) आधुनिक काळात खेड्यांमध्ये पाणी सिंचनाचे व अन्यधान्यांचे विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत.