Skip to content

भाषा विषयक सामान्य ज्ञान | bhashavishayak samanya dnyan

  • by
सामान्य ज्ञान

 भाषा विषयक सामान्य ज्ञान यामध्ये आपण संतांची पूर्ण नावे, लेखक कवी यांची पूर्ण नावे, लेखक कवी यांची यांची पुस्तके/ ग्रंथ, थोर व्यक्तींची पूर्ण नावे, थोर व्यक्तींची संबोधने यांची माहिती पाहणार आहोत.

 

सामान्य ज्ञान – संत आणि त्यांची पूर्ण नावे 

        महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात लोकजागृती मध्ये संतांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रातील जनता सुसंस्कृत बनवण्यामध्ये संतांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील अशाच काही संतांची पूर्ण नावे खालील प्रमाणे आहेत.

संत ज्ञानेश्वरज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी 
संत तुकाराम तुकाराम वेल्होबा अंबिले
संत नामदेवनामदेव दामाशेटी शिंपी 
संत एकनाथ एकनाथ सुर्यनारायण पंत 
रामदास समर्थनारायण सूर्याजीपंत ठोसर
गाडगेबाबाडेबुजी झिंगराजी जानोरकर 
संत व त्यांची पूर्ण नावे

सामान्य ज्ञान –

महाराष्ट्राला समृद्ध अशी लेखन परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रतिभावंत लेखक आणि कवी यांनी लेखन केले आहे. बऱ्याच लेखक अथवा कविंनी आपल्या मूळ नावाऐवजी लेखन करताना टोपण नावाचा वापर केला आहे. अशाच महाराष्ट्रातील काही कवींची नावे आणि त्यांची टोपण नाव खालील प्रमाणे आहे.

नावटोपणनाव
कृष्णाजी केशव दामलेकेशवसुत
प्रल्हार केशव अत्रेकेशवकुमार
त्र्यंबक बापुजी ठोमरेबालकवी
विष्णू वामन शिरवाडकरकुसुमाग्रज
आत्माराव रावजी देशपांडेअनिल
यशवंत दिनकर पेंढारकरयशवंत
शंकर केशव कानेटकरगिरीष
पाडुरंग सदाशिव सानेसानेगुरुजी
राम गणेश गडकरीगोविंदाग्रज, बाळकराम
दिनकर गंगाधर केळकरअज्ञातवासी
काशिनाथ हरी मोडकमाधवानुज
विनायक जनार्दन करंदीकरविनायक
नारायण सूर्याजीपंत ठोसररामदास
मोरोपंत रामचंद्र पराडकरमोरोपंत
दत्तात्रय कोंडो घाटेदत्त
नारायण मुरलीधर गुप्तेबी
चिंतामण त्र्यंबक खानोलकरआरती प्रभू
शंकर काशिनाथ गर्गेदिवाकर
गोपाळ हरी देशमुखलोकहितवादी
माधव त्र्यंबक पटवर्धनमाधव ज्युलियन
ना. धों. महानोररानकवी
सामान्य ज्ञान कवी व लेखकांची टोपण नावे

वाक्प्रचार, त्यांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग

थोर व्यक्ती व त्यांची पूर्ण नावे

साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने
लोकमान्य टिळकबाळ गंगाधर टिळक
महात्मा गांधीमोहनदास करमचंद गांधी
पंडित नेहरूजवाहरलाल मोतीलाल नेहरू
स्वातंत्र्यवीर सावरकरविनायक दामोदर सावरकर
विवेकानंद नरेंद्र विश्वनाथ दत्त
लता मंगेशकर लता दीननाथ मंगेशकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरभीमराव रामजी आंबेडकर
सामान्य ज्ञान थोर व्यक्ती व त्यांचे टोपण नावे

थोर व्यक्तींची संबोधने

बाळ गंगाधर लोकमान्य
जवाहरलाल नेहरूपंडित, चाचा
रविंद्रनाथ टागोरगुरुदेव
सुभाषचंद्र बोस नेताजी
मोहनदास करमचंद गांधीराष्ट्रपिता, महात्मा
डॉ.बाबासाहेब आंबेडकरघटनेचे शिल्पकार
ज्योतिबा गोविंदराव फुलेमहात्मा
विनायक दामोदर सावरकरस्वातंत्र्यवीर
धोंडो केशव कर्वेमहर्षी

काही प्रसिद्ध पुस्तके व त्यांचे लेखक

आपल्या देशातील काही प्रसिद्ध पुस्तके, पुरस्कार प्राप्त पुस्तके पुस्तकांचे लेखक व त्या पुस्तकांची नावे माहिती असणे आवश्यक आहे. या ठिकाणी अशाच काही प्रसिद्ध पुस्तकांची नावे व त्यांचे लेखक यांची माहिती देण्यात आली आहे.

पुस्तकाचे नावलेखकाचे , कवीचे नाव
रामायण वाल्मिकी
महाभारतव्यासमुनी
गीताव्यास मुनी
मुद्राराक्षसविशाखदत्त
मृच्छकटिकशूद्रक
शाकुंतल, मेघदूत, रघुवंशकालिदास
श्यामची आईसाने गुरुजी
गुज गोष्टीना .सी. फडके
रथचक्र, गारंबीचा बापूश्री. ना. पेंडसे
काळे पाणी, माझी जन्मठेपवि. दा. सावरकर
गीताईविनोबा भावे
स्वामी, श्रीमान योगीरणजीत देसाई
चक्रजयवंत दळवी
वहिनीच्या बांगड्याय.गो. जोशी
गीतारहस्यलोकमान्य टिळक
पडघवलीगो. नी. दांडेकर
ययातीवि. स. खांडेकर
एरंडाचे गुऱ्हाळ चिं. वि. जोशी
स्मृती चित्रेलक्ष्मीबाई टिळक
कऱ्हेचे पाणीप्र .के. अत्रे
कृष्णाकाठयशवंतराव चव्हाण
बलुतंदया पवार
तराळ – अंतराळशंकरराव खरात
एक झाड, दोन पक्षीविश्राम बेडेकर
मृत्युंजय, छावाशिवाजी सावंत
भारतीय संस्कृती कोशपं. महादेवशास्त्री जोशी
टारफुलाशंकर पाटील
आमचा बाप आणि आम्हीडॉ. नरेंद्र जाधव
सामान्य ज्ञान प्रसिद्ध पुस्तके व त्यांचे लेखक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *