प्रश्न १) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
१) आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल.
२) ‘आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज ‘ हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला.
प्रश्न २) पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा :
१) विचारवंतांचे नाव ग्रंथाचे नाव
१) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल – रिझन इन हिस्टरी
२) लिओपॉल्ड व्हॉन रांके – द थिअरी ॲण्ड प्रॅक्टिस
ऑफ हिस्टरी
३) हिरोडोटस – द हिस्टरीज
४) कार्ल मार्क्स -डिस् कोर्स ऑन द मेथड
उत्तर – चुकीची जोडी – कार्ल मार्क्स – डिस् कोर्स ऑन द मेथड
प्रश्न ३) दिलेल्या सुचनांप्रमाणे कृती करा.
पुढे दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा.
१) युरोपातील महत्त्वाचे विचारवंत
उत्तर –
१) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल
२) रेने देकार्त
३) व्हॉल्टेअर
४) लिओपॉल्ड व्हॉन रांके
प्रश्न ४) थोडक्यात टिपा लिहा.
१) द्वंद्ववाद
उत्तर – १) एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो.या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात.जॉर्ज हेगेल या सिद्धांताची मांडणी केली
२) दोन्ही परस्परविरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही.
२) ॲनल्स प्रणाली
उत्तर – १) राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता याचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचारप्रणालीलाच ‘ॲनल्स प्रणाली ‘असे म्हणतात.
२) फ्रेंच इतिहासकारांनी विसाव्या शतकात ही प्रणाली विकसित केली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनास एक निराळीच दिशा प्राप्त झाली.
प्रश्न ५) पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
१) स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
उत्तर – १) इतिहासलेखनात पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमाँ- द- बोव्हा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादाची मूलभूत भूमिका मांडली.
२) त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला.
३)इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला.
४) सिमाँ- द- बोव्हा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेंड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
२) मायकेल फुको यांच्या लेखनपद्धतीला ‘ ज्ञानाचे पुरातत्व ‘ म्हटले आहे.
उत्तर -१)मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली.
२) त्यांच्या मते, अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे, हे पुरातत्त्वाचे उद्दिष्ट नसते.
३) भूतकाळातील स्थित्यंतरांचे, म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्त्वाचा प्रयत्न असतो.
४) फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला; म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे.
प्रश्न ६) पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
१) कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा.
उत्तर – एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स यांनी आपल्या ‘ दास कॅपिटल ‘ या ग्रंथात ‘ वर्गसंघर्षाचा सिद्धांत ‘ मांडला. त्यांच्या मते,
१)इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो.
२) मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात.
३) समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत.उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाचे वर्गावर आधारित विषम विभागणी होते.
४) त्या कुसुमाग्रज उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो; त्यातूनच असते वर्ग संघर्षाला सुरुवात होते. मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे.
२) आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची चर वैशिष्ट्ये कोणती ?
उत्तर – आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये –
१) या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते.
२) हेप्रश्न मानव केंद्रित असून भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कथा- कहाण्यांशी जोडलेला नसतो.
३) या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्क सुसंगत असते.
४) मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो.
३) स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय ?
उत्तर – १) स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय.
२) इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता .
३) त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदूषी सीमाँ- द- बोव्हा यांनी मांडली.
४) त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला.
५) त्यानंतर स्त्रियांची संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले.
६) १९९० नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनाला ‘ ‘ स्त्रीवादी इतिहासलेखन ‘ असे म्हणतात.
४) लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहास विषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.
उत्तर – लिओपॉल्ड व्हॉन रांके यांनी ‘ द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी ‘ व ‘ द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी ‘या ग्रंथातून इतिहास लेखन कसे करावे, याविषयी मांडलेल्या मतांतून त्यांचा इतिहास विषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्यामते –
१) इतिहासलेखनात काल्पनिकता नसावी. इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे.
२) इतिहासलेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे या सखल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते.
३) जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा.
४) एकोणिसाव्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर रांकेच्या विचारांचा प्रभाव होता.