रानपाखरा स्वाध्याय : रानपाखरा ही कविता कवी गोपीनाथ यांची आहे. पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील या कवितेमध्ये एक मुलगी रानपाखराला उद्देशून काय काय म्हणत आहे याचे वर्णन आलेले आहे. या ठिकाणी आपण रानपाखरा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. रानपाखरा या पाठाखालील प्रश्नांची उत्तरे पाहूया.
रानपाखरा स्वाध्याय | Ranpakhara Swadhyay
प्र. १. कवितेच्या ओळींत शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा.
अ) घरा – खरा
आ) त्यावरी – गोजिरी
इ) सानुला – तुला
ई) भास्कर – सुस्वर
प्र. २. खालील गोष्टींचे वर्णन करणारे कवितेतील शब्द लिहा.
उदा., शरीर – निळसर
अ) डोळे – सतेज
इ) पंख – चिमुकले
आ) पाय – चिमुकले
ई) देह – सानुला
उ) आभाळ – अफाट
ऊ) गाणे – सुस्वर
प्र. ३. एका वाक्यात उत्तरे लिहा. रानपाखरा स्वाध्याय
१) कवितेतील मुलगी रोज सकाळी कोणाला घरी बोलावते?
उत्तर: कवितेतील मुलगी रोज सकाळी रानपाखराला घरी बोलावते.
२) रानपाखराचे डोळे कसे आहेत?
उत्तर: रानपाखराचे डोळे चमचमणाऱ्या गोजिऱ्या रत्नासारखे आहेत.
३) रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतल्या मुलीला कोणता प्रश्न पडला आहे?
उत्तर-: शरीर लहान असूनही या रानपाखराला अफाट आकाशात कसे उडता येते? रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतल्या मुलीला असा प्रश्न पडला आहे.
४) सूर्य डोंगर चढून वर कधी येतो?
उत्तर-: रात्र संपल्यावर सूर्य डोंगर चढून वर येतो.
५) कवितेतल्या मुलीला रानपाखराबरोबर कोठे जायचे आहे?
उत्तर:- कवितेतल्या मुलीला रानपाखरा बरोबर त्याच्या घरी जायचे आहे.
६) कवितेतल्या मुलीला भेटायला कोण येणार आहे?
उत्तर:- कवितेतल्या मुलीला रानपाखराची आई आणि सूर्य भेटायला येणार आहेत.
७) कवितेतल्या मुलीला मजा केव्हा येईल असे वाटते?
उत्तर:- कवितेतल्या मुलीला रानपाखराची आई आणि सूर्य भेटायला येतील तेव्हा मजा येईल.
प्र. ४. कोणाला म्हटले आहे? रानपाखरा स्वाध्याय
- जीवाचा मित्र – रानपाखरू
- गोजिरी रत्ने – रानपाखराचे डोळे
प्र. ५. कवितेतल्या मुलीला रानपाखरू गाणे गाऊन उठवते. खालील मुले कशी उठत असतील, याची कल्पना करून रिकाम्या जागा भरा.
उदा: रेश्माला तिची आई उठवते. ती ‘रेश्मा, ऊठ लवकर,’ अशा हाका मारून उठवते.
१) सतीशला मोबाइलच्या गजराने जाग येते. मोबाइल ……….. असा आवाज करून उठवतो.
उत्तर: सतीशला मोबाइलच्या गजराने जाग येते. मोबाइल ट्रिंग ट्रिंग असा आवाज करून उठवतो.
२) भिकूचे घर दाट जंगलात आहे. त्याला ……….. च्या आवाजामुळे जाग येते.
उत्तर-: भिकूचे घर दाट जंगलात आहे. त्याला पक्ष्याच्या किलबिलाटामुळे जाग येते.
३) रफीकच्या घरामागून रेल्वेची लाइन जाते. तो दररोज ……….. च्या आवाजामुळे उठतो. रेल्वे ……….. आवाज करत जाते.
उत्तर: रफीकच्या घरामागून रेल्वेची लाइन जाते. तो दररोज रेल्वेच्या आवाजाने उठतो. रेल्वे झुक झुक आवाज करत जाते.
४) रेवतीचे घर घाऊक भाजी बाजारासमोर आहे. बाजार पहाटेच सुरू होतो. रेवती दररोज ……….. अशा आवाजांमुळे उठते.
उत्तर: रेवतीचे घर घाऊक भाजीबाजारासमोर आहे. बाजार पहाटेच सुरू होतो. रेवती दररोज भाजी घ्या भाजी अशा आवाजांमुळे उठते.
५) जानकीचे घर एस. टी. स्टँडच्या अगदी मागे आहे. त्यामुळे ती दररोज ……….. च्या ……….. अशा आवाजामुळे उठते.
उत्तर:- जानकीचे घर एस. टी. स्टँडच्या अगदी मागे आहे. त्यामुळे ती दररोज बसच्या पोंपों अशा आवाजामुळे उठते.
६) जमिलाची आई चादरीच्या कारखान्यात काम करते. त्यांचे घर कारखान्याच्या आवारातच आहे. जमिला रोज ……….. च्या आवाजामुळे उठते.
उत्तर: जमिलाची आई चादरीच्या कारखान्यात काम करते. त्यांचे घर कारखान्याच्या आवारातच आहे. जमिला रोज यंत्राच्या धडधड आवाजामुळे उठते.
७) दिनेशचे बाबा नगरपालिकेच्या बागेचे रखवालदार आहेत. बागेच्या एका कोपऱ्यातच त्यांचे घर आहे. दिनेशला रोज ……….. च्या ……….. अशा आवाजामुळे जाग येते.
उत्तर:- दिनेशचे बाबा नगरपालिकेच्या बागेचे रखवालदार आहेत. बागेच्या एका कोपऱ्यातच त्यांचे घर आहे. दिनेशला रोज पक्षांच्या किलबिल आवाजामुळे जाग येते.
रानपाखरा स्वाध्याय इयत्ता तिसरी | Ranpakhara Swadhyay