संत रोहिदास: संत रोहिदास हे भारतातील महान संत आहेत. 1377 च्या सुमारास त्यांचा जन्म झाला असावा असे म्हणतात. संत रोहिदास त्यांच्या महान कार्यांसाठी भारतभर ओळखले जातात. कवी असण्याबरोबरच ते त्या काळातील लोकप्रिय सामाजिक अभ्यासक होते. गुरु ग्रंथसाहिबमधील त्यांची रचना आजही लोकप्रिय आहे. संत रोहिदास हे संत रविदास या नावानेही ओळखले जातात.
संत रविदास कोण होते?
संत रोहीदास यांना रविदास असेही म्हणतात. त्यांचा जन्म 1377 मध्ये उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसीजवळील गोवर्धनपूर गावात माघ पौर्णिमेच्या दिवशी झाला. त्यांचा जन्मदिवस रोहिदास जयंती म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या आईचे नाव कसला देवी आणि वडिलांचे नाव संतोख दास होते. त्यांच्या कुटुंबाचा चामड्याच्या व्यवसाय होता. हे कुटुंब अस्पृश्य जातीतील मानले जात असे. रविदासजींचा विवाह 12 व्या वर्षी लोना देवीशी झाला होता. त्यांच्या मुलाचे नाव विजय दास होते.
समतेचा सिद्धांत मांडणारे ते जगातील पहिले संत मानले जातात. संत रविदासजी हे अतिशय दयाळू व्यक्ती होते. आपल्या दोहे आणि श्लोकांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील जातीभेद दूर करून सामाजिक ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जन्मामुळे कोणीही नीच समजले जात नाही, तर त्याच्या कृतीमुळेच कोणी उच्च-नीच समजले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. शीख धर्माचा पवित्र धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिबमध्ये रोहिदासांच्या सुमारे 40 श्लोकांचा समावेश करण्यात आला होता.
संत कबीर हे संत रविदासांचे गुरू मानले जातात. संत रोहिदासांनी संत कबीरांच्या समतावादी विचारसरणीचे पालन केले आहे. वाराणसीमध्ये संत रविदासांचे भव्य मंदिर आहे. संत रविदासांचे अनुयायी भारतभर पसरलेले आहेत. त्यांच्या विचारसरणीचे पालन करणारे अनेक लोक आहेत. राज्यानुसार त्याला काही ठिकाणी रोहिदास, काही ठिकाणी रैदास आणि काही ठिकाणी रविदास म्हणून ओळखले जाते.
संत रोहिदास जयंती
एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला होतो त्या तारखेला जयंती साजरी जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त लोक त्यांचे स्मरण करतात. त्यांच्या जयंती दिवशी त्यांच्या प्रतिमेला फुलांचा हार घालून त्यांची पूजा केली जाते.
संत रविदास पुण्यतिथी
संत रविदासजींचे वाराणसी येथे डिसेंबर १५२८ मध्ये निधन झाले असे सांगितले जाते. यावर्षी रविवार ८ डिसेंबर २०२४ रोजी संत रविदासजींची पुण्यतिथी आहे. या दिवशी देशभरात संत रविदासांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. त्यांचे विचार सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्याबद्दलची माहिती दिली जाते.
आपल्या देशात संतांचे फार महत्त्व राहिले आहे. लोकांना चांगलं-वाईट शिकायला लावण्यासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे. संत रोहिदास हे महान संत होते. ज्याचा जन्म उत्तर प्रदेशात झाला पण त्यानी आपल्या विचारांचा प्रसार देशभर केला.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQ
संत रोहिदास बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे.
१) संत रोहिदास यांचा जन्म कधी व कुठे झाला?
इतिहासकारांच्या मते संत रोहिदास यांचा जन्म 1377 मध्ये वाराणसीजवळील गोवर्धनपूर गावात झाला.
2) 2024 मध्ये संत रविदासांची पुण्यतिथी कधी आहे?
2024 मध्ये संत रविदासजींची पुण्यतिथी रविवार 8 डिसेंबर 2024 रोजी आहे.
3) संत रविदासजींचे गुरू कोण होते?
संत रविदासजींचे गुरू कबीर साहेब मानले जातात.
4) संत रविदासजींच्या आईचे नाव काय होते?
त्यांच्या आईचे नाव कसला देवी होते.
५) संत रविदास यांचा मृत्यू कधी झाला?
संत रविदास यांचा मृत्यू १५२८ च्या सुमारास वाराणसी येथे झाला असे मानले जाते.
६) संत रविदासांची इतर कोणती नावे आहेत?
संत रविदास हे रविदास, संत रोहिदास, संत रैदास म्हणून ओळखले जातात.