इयत्ता सहावीच्या नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तकातील आपले समाज जीवन हा एक घटक आहे. या घटकांमध्ये माणसाला समाजाची गरज का असते? त्याचबरोबर समाजाच्या साह्याने आपला विकास कसा होतो. याविषयीची माहिती देण्यात आली आहे. या ठिकाणी आपण आपले समाजजीवन स्वाध्याय प्रश्नोत्तर स्वरूपात अभ्यासणार आहोत.
आपले समाजजीवन स्वाध्याय
१) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
१) समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली.
२) माणसातील कलागुणांचा विकास समाजात होतो.
३) आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजा ही असतात.
(२) खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) आपल्या मूलभूत गरजा कोणत्या?
उत्तर-अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत.
२) आपल्याला कोणाचं सहवास आवडतो?
उत्तर- आपल्या कुटुंबातील लोक, नातेवाईक आणि मित्र मैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो.
३) समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते.
उत्तर- समाजामुळे आपल्याला आपले विचार मांडण्याची आणि आपल्या क्षमता कौशल्याचा विकास घडवून आणण्याची संधी मिळते.
आपले समाजजीवन स्वाध्याय
३) तुम्हाला काय वाटते? दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा.
१) समाज कसा तयार होतो?
उत्तर- समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्याचा समाज बनतो . समाजात सर्व स्त्री पुरुष प्रौढ, वृद्ध, लहान मुले मुली यांचा समावेश असतो. आपली कुटुंबे समाजाचा घटक असतात. समाजात विविध गट संस्था संघटना असतात. लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार, परस्पर देवाणघेवाण यांचाही समाजात समावेश होतो.
२) समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते?
अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि सुरक्षितता यासारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. कायमस्वरूपी व्यवस्थे शिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत. समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी कायम स्वरुपी व्यवस्थेची गरज आहे.
३) माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते?
समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. यातून रुढी, परंपरा, नीतिमूल्य, नियम आणि कायदे अस्तित्वात आले. त्यामुळे माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर झाले.
४) समाजव्यवस्था अस्तित्वात नसती तर कोणत्या अडचणी आल्या असत्या?
माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि सुरक्षितता या गरजा समाजातूनच पूर्ण होतात. त्याचबरोबर वेगवेगळे उद्योग आणि व्यवसायातून आपण आपल्या गरजा पूर्ण करतो. समाजातील नियमांमुळे आणि कायद्यामुळे समाज व्यवस्था निर्माण झाली आहे. जर ही समाज व्यवस्था अस्तित्वात नसती तर माणसाच्या गरजा पूर्ण झाल्या नसत्या. दैनंदिन व्यवहारांमध्ये अनेक अडचणी आल्या असत्या.
४) पुढील प्रसंगी काय कराल?
१) तुमच्या मित्राची/मैत्रिणीचे शालेय वस्तू घरी विसरली आहे.
उत्तर – माझ्याकडे असणारी वस्तू माझ्या मित्रास देईन. अथवा एकच वस्तू असल्यास दोघे मिळून वापरेन.
२) रस्त्यात एखादी अंध/ दिव्यांग व्यक्ती भेटली.
रस्त्यात भेटलेल्या दिव्यांग व्यक्तीस मदतीची आवश्यकता असल्यास त्याला मदत करेन. तिच्या स्वाभिमानाला ठेच पोहचता सहकार्य करेन.
आपले समाजजीवन स्वाध्याय